Loading...
ऋग्वेद मण्डल - 7 के सूक्त 100 के मन्त्र
1 2 3 4 5 6 7
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
  • ऋग्वेद का मुख्य पृष्ठ
  • ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 100/ मन्त्र 1
    ऋषिः - वसिष्ठः देवता - विष्णुः छन्दः - निचृत्त्रिष्टुप् स्वरः - धैवतः

    नू मर्तो॑ दयते सनि॒ष्यन्यो विष्ण॑व उरुगा॒याय॒ दाश॑त् । प्र यः स॒त्राचा॒ मन॑सा॒ यजा॑त ए॒ताव॑न्तं॒ नर्य॑मा॒विवा॑सात् ॥

    स्वर सहित पद पाठ

    नु । मर्तः॑ । द॒य॒ते॒ । स॒नि॒ष्यन् । यः । विष्ण॑वे । उ॒रु॒ऽगा॒याय॑ । दाश॑त् । प्र । यः । स॒त्राचा॑ । मन॑सा । यजा॑ते । ए॒ताव॑न्तम् । नर्य॑म् । आ॒ऽविवा॑सात् ॥


    स्वर रहित मन्त्र

    नू मर्तो दयते सनिष्यन्यो विष्णव उरुगायाय दाशत् । प्र यः सत्राचा मनसा यजात एतावन्तं नर्यमाविवासात् ॥

    स्वर रहित पद पाठ

    नु । मर्तः । दयते । सनिष्यन् । यः । विष्णवे । उरुऽगायाय । दाशत् । प्र । यः । सत्राचा । मनसा । यजाते । एतावन्तम् । नर्यम् । आऽविवासात् ॥ ७.१००.१

    ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 100; मन्त्र » 1
    अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 25; मन्त्र » 1
    Acknowledgment

    संस्कृत (1)

    विषयः

    अथ परमात्मना सुमतिरुपदिश्यते।

    पदार्थः

    (यः, मर्तः) यो जनः (उरुगायाय) अतिभजनीयाय (विष्णवे) व्यापकायेश्वराय (सनिष्यन्) कामयमानो (दाशत्) प्रमाणं करोति तमेव, (नु) शीघ्रं स नरः (दयते) प्राप्नोति यश्च (सत्राचा मनसा) शुद्धमनसा (यजाते) तं समर्चेत् (एतावन्तम्, नर्यम्) सर्वप्रणेतारं सः (आविवासात्) प्राप्नोत्येव ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें

    हिन्दी (3)

    विषय

    अब परमात्मा सुमति अर्थात् शुभ नीति का उपदेश करते हैं।

    पदार्थ

    (यः) जो पुरुष (उरुगायाय) अत्यन्त भजनीय (विष्णवे) व्यापक परमात्मा की (सनिष्यन्) प्राप्ति के लिये इच्छा (दशत्) करते हैं, (नु) शीघ्र ही वे मनुष्य उसको (दयते) प्राप्त होते हैं और जो (सत्राचा) शुद्ध मन से (यजाते) उस परमात्मा की उपासना करता है, वह (एतावन्तं, नर्य्यं) उक्त परमात्मा का जो सब प्राणिमात्र का हित करनेवाला है (आविवासात्) अवश्यमेव प्राप्त होता है ॥१॥

    भावार्थ

    परमात्मप्राप्ति के लिये सबसे प्रथम जिज्ञासा अर्थात् प्रबल इच्छा उत्पन्न होनी चाहिये। तदनन्तर जो पुरुष निष्कपटभाव से परमात्मपरायण होता है, उस पुरुष को परमात्मा का साक्षात्कार अर्थात् यथार्थ ज्ञान अवश्यमेव होता है ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें

    विषय

    विष्णु, व्यापक प्रभु की स्तुति-उपासना।

    भावार्थ

    ( यः ) जो ( मर्त्तः ) मनुष्य, ( सनिष्यन् ) दान देने की इच्छा से ( दयते ) दान देता और दया करता है वही ( उरु-गायाय ) बहुतों से, अति स्तुतियोग्य ( विष्णवे ) व्यापक परमेश्वर के निमित्त ही ( दाशत् ) दान करे । ( यः ) जो मनुष्य (सत्राचा मनसा) सत्यनिष्ठ मन से ( प्र यजाते) अच्छी प्रकार यज्ञ, दान करता वा परम देव की पूजा करता वह ( एतावन्तं ) उतना ही ( नर्यम् ) मनुष्यों के हितकारी वा सब मनुष्यों में व्यापक परमेश्वर की ( आ विवासत् ) सेवा किया करता है।

    टिप्पणी

    missing

    ऋषि | देवता | छन्द | स्वर

    वसिष्ठ ऋषिः॥ विष्णुर्देवता॥ छन्दः—१, २, ५, ६, ७ निचृत् त्रिष्टुप्। ३ विराट् त्रिष्टुप्। ४ आर्षी त्रिष्टुप्॥ सप्तर्चं सूक्तम्॥

    इस भाष्य को एडिट करें

    विषय

    यशस्वी दान

    पदार्थ

    पदार्थ- (यः) = जो (मर्त्तः) = मनुष्य, (सनिष्यन्) = दान देने की इच्छा से (दयते) = दान देता, दया करता है वही (उरु-गायाय) = बहुतों से स्तुतियोग्य (विष्णवे) = परमेश्वर के निमित्त (दाशत्) = दान करे ! (यः) = जो मनुष्य (सत्राचा मनसा) = सत्यनिष्ठ मन से (प्र यजाते) = दान करता वा देव पूजा करता है वह (एतावन्तं) = उतना ही (नर्यम्) = मनुष्यों के हित की (आ विवासत्) = सेवा करता है।

    भावार्थ

    भावार्थ- जब मनुष्य दान देना चाहे तो मन में श्रद्धा रखकर ही देवें केवल दिखावे के लिए न देवे। वह अपने हृदय में यह भाव उत्पन्न करे कि ईश्वर सर्वव्यापक है, ये धन उसीका है अतः उसी को समर्पित है। उसी की प्रजाओं- जीवों के लिए मैं दे रहा हूँ। यह दान देवपूजा कहलाएगा। ऐसे निरभिमानी दानी की लोग प्रशंसा करेंगे।

    इस भाष्य को एडिट करें

    इंग्लिश (1)

    Meaning

    That mortal for sure finds success and fulfilment who, while he loves Vishnu, lord omnipresent, gives in charity in service to the lord, and who, with concentrated mind, meditates, worships and exalts the lord of such universal love of infinite measure.

    इस भाष्य को एडिट करें

    मराठी (1)

    भावार्थ

    परमात्मप्राप्तीसाठी सर्वांत प्रथम जिज्ञासा अर्थात प्रबल इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. त्यानंतर जो पुरुष निष्कपट भावाने परमात्म परायण बनतो त्या पुरुषाला परमात्म्याचा साक्षात्कार अर्थात यथार्थ ज्ञान अवश्य होते. ॥१॥

    टिप्पणी

    याच अभिप्रायाने जेथे जेथे वेदांमध्ये ईश्वर योगाचे निरूपण येते तेथे तेथे सर्वत्र निराकार परमेश्वराबरोबर योगवर्णन आढळते. साकाराचे नव्हे. जसे ‘‘युञ्जन्ति ब्रन्धमरुषं चरन्त परि तस्थुष:’’ ॥ऋ. मं. १। सू.६ ॥१॥ $ ‘‘युञ्जते मन उत युञ्जते धियो विप्रा विप्रस्य बृहतो विपश्चित:’’ ॥ऋ.५ ।८१।१॥ इत्यादी मंत्रांनी चित्त परमात्म्यात स्थिर करावे, असे वर्णन आहे. एखाद्या साकार वस्तूच्या आधारावर चित्ताची स्थिती स्थिर करता येत नाही, तर स्थावर जङ्गमात्मक संपूर्ण ब्रह्मांडाची जो एकमात्र आत्मा परमात्मा आह.े त्याच्यातच चित्त स्थिर होऊ शकते. याचेच नाव ईश्वरयोग आहे. $ चित्ताच्या स्थिरतेसाठी योग अनेक प्रकारचे आहेत. जसे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, ईश्वरयोग. जेव्हा मनुष्य फळाची इच्छा सोडून कर्म करू लागतो तेव्हा ते कर्म आत्म सुधाराचे असो किंवा देशसुधाराचे असो जेव्हा त्याच्यापेक्षा वेगळ्या योग्याला अर्थात् कर्माबरोबर जुडणाऱ्या माणसाला इतर कोणतीही वस्तू त्यापेक्षा प्रिय किंवा कल्याणदायक वाटत नसेल व ते कर्म करताना आत्मपरिश्रम किंवा कष्ट न समजणारा पुरुष हे माझे परम कर्तव्य आहे, असे समजतो. कर्मापेक्षा आपले जीवन वेगळे आहे, असे तो मानत नाही. वास्तविक जीवन नावच कर्माचे आहे. जीवनाचा अर्थ प्राण धारण करणे व प्राणाचा अर्थ प्रयत्न, कर्म करणे होय. कर्मयोगाचा अर्थ जीवन असेपर्यंत कर्म करणे. त्यामुळेच वेदात आज्ञा केलेली आहे. ‘‘कुर्वन्नेवेह कर्म्माणि जिजीविषेच्छत–समा:’’ ॥ यजु. ४४।२॥ कर्म करीत शंभर वर्षे जगण्याची इच्छा करावी. $ त्याचप्रमाणे ज्ञानयोगही माणसाचे परम कर्तव्य आहे. जरी ज्ञानात कर्तव्य नाही तरी जाणणे आहे; परंतु हे कर्माशिवाय अपंग आहे. ज्या प्रकारे पाच ज्ञानेंद्रिय यथायोग्य असूनही कर्मेंद्रियरूपी पादानीरहित माणूस चालण्या फिरण्यास असमर्थ असतो व कर्मरहित पुरुष ज्ञानी असूनही अभ्युदय व नि:श्रेयस दोन्ही प्रकारच्या फळांपासून वंचित होतो. त्यासाठी कर्मयोग हा ज्ञानयोगाचे साधन आहे. $ ज्ञानयोग व विद्यायोग एकाच गोष्टीची दोन नावे आहेत. जो पुरुष विद्येशी जुडतो अर्थात चित्तप्रवत्तींना सगळीकडून हटवून एकमेव विद्येला आपले लक्ष्य मानतो त्याला ‘‘ज्ञानयोगी’’ म्हणतात. $ ध्यानयोग यापेक्षा भिन्न आहे. तो सदैव ईश्वरविषयक व्यवहारात केला जातो. जेव्हा माणूस सत्कर्मी व ज्ञानी बनून ईश्वराला आपले लक्ष्य मानतो. त्या अवस्थेचे नाव ध्यानयोग आहे. ध्यानयोग व ईश्वरयोग हे दोन्ही एकार्थवाची शब्द आहेत. ‘‘ध्यानाच्च ’’ ॥ब्र.सू. ४।१।८॥ या सूत्रात चांगल्या प्रकारे निरूपण केलेले आहे, की ईश्वरात ध्यान लावण्याने चित्तवृत्ती स्थिर होते. याचेच वर्णन योगदर्शनात ‘‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’’ ॥योग. १।२॥ चित्तवृत्तीला रोखण्याचे नाव ‘योग’ आहे. $ वास्तविक हे आहे, की ईश्वरयोग तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा पुरुष एक मात्र परमात्मसत्तेमध्ये चित्ताला लावतो. त्यावेळी त्या पुरुषाला आपल्या आत्मवत् परमात्मसत्ता वाटू लागते. अर्थात, सर्वव्यापक विष्णू, परमात्मा त्याला आपल्या आत्म्यात अंतरात्मरूपाने वाटू लागतो. त्या अंतरात्म्याचे वर्णन अंतर्यामी ब्राह्मणामध्ये स्पष्ट आहे. त्याच अंतर्यामीचे नाव येथे विष्णू व बृहस्पती आहे. विष्णू व बृहस्पती हे एक अर्थवाची शब्द आहेत. हे दोन्ही शब्द सर्वव्यापक आत्मशक्तीचे निरूपक आहेत. एखाद्या व्यक्तीचे नाही. $ या ध्यानयोगाला वितर्क, विचार, आनंद, अस्मिता चा चार प्रकारे वर्णिलेले आहे. $ ध्यानावस्थेत प्रथम नाना प्रकारचे तर्क उत्पन्न होतात. एखादा म्हणतो निराकारात ध्यान कसे लागू शकते. एखादा निराकाराची सत्ता स्वीकार करीत नाही. अर्थात, ज्याचा आकार नाही ती वस्तु नसतेच हा संशय उत्पन्न होऊ लागतो. या प्रकारे तर्करूपमल निर्मल चित्तवृत्तीमध्ये समल जलाप्रमाणे अति तेजस्वी पदार्थालाही प्रतिबिंबित होऊ देत नाही. $ जरी ‘‘तर्काऽप्रतिष्ठानात्’’ ब्र. मू. २।१।११॥ मध्ये तर्काची प्रतिष्ठा मानलेली नाही. अर्थात, वरील सूत्रात महर्षी व्यासांनी तर्काची निंदा केलेली आहे. तर्काची कुठेही योग्य स्थिती नसते. आज एक विद्वान एका गोष्टीला एका प्रकारे स्थापित करतो. उद्या त्याच्यापेक्षा एखादा बुद्धिमान येतो. तो वेगळ्या प्रकारेच प्रतिपादन करतो. एकापेक्षा एक बुद्धिमान या जगात आहेत. जर बुद्धीवर अवलंबून राहून धर्माचा निर्णय घेतला गेला, तर अति कठीण होईल. या प्रकारे तर्काची प्रतिष्ठा मानली जात नाही. $ तरीसुद्धा ऋषींनीही तर्काचा स्वीकार केलेला आहे व म्हटले आहे की ‘‘ऋषयो मन्त्रद्रष्टार:’’ मंत्रांद्वारे जे लोक समाधीद्वारे अनुसंधान करतात तेच ऋषी म्हणविले जातात. जेव्हा या प्रकारचे योगी ऋषी राहिले नाहीत तेव्हा वैदिक लोकांनी विचार केला, की आता काय करावे? वेदाच्या अर्थाचा निश्चय कसा करता येईल, की अमुक अर्थ ठीक आहे, अमुक नाही. असे म्हटले जाते, की त्यांना तर्क ऋषी प्राप्त झाला. अर्थात, ज्या गोष्टीचा निर्णय तर्क=युक्ती करता येते तीच गोष्ट सत्य समजली पाहिजे अन्य नाही. या सिध्दान्ताबरोबर ‘‘तर्काऽप्रतिष्ठानात्’’ या व्यासांच्या कथनाचा विरोध होतो. जर प्रत्येक गोष्ट किंवा निर्णय तर्काप्रमाणे घेतला, तर वेदाला कोण प्रमाण मानील? व त्या तर्काचे दुसऱ्या तर्काने खंडन केल्यास त्याला कोण मानील? त्यासाठी एखादी व्यवस्था असावी. ती अशी की ‘‘वेदशास्त्रविरोधिना यस्तर्केणानुसन्धते स धर्म्म वेद नेतर: ॥’’ मनु. १२।१०६॥ जो वेदशास्त्राच्या अनुकूल तर्काने धर्माचा निर्णय करतो तो धर्माला जाणतो अन्य नव्हे. $ तेव्हा शंका निर्माण होते, की कसा निर्णय घ्यावा? यह तर्क वेदशास्त्राचा विरोधी आहे किंवा नाही? $ याचे उत्तर हे आहे, की या गोष्टीचा निर्णय तर स्वत: वेद भगवान करतात की ‘‘को अद्धा वेद क इह प्रवोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टि:’’ ॥ऋ. मं. ।१०। सू. १२९।६॥ कोण ठीक ठीक जाणू शकतो, की ही सृष्टी कोणत्या वस्तूने बनलेली आहे व का या प्रकारे विचित्र आहे. अर्थात, कोणी याची विविध प्रकाराने रचना केलेली आहे? $ हा तर्क आहे, की कोणीही ठीक ठीक जाणू शकत नाही, की सृष्टी कोणी कोणत्या वस्तूंनी, कशा प्रकारे उत्पन्न केली? $ याचे उत्तर स्वत: वेदाने पुढे मंत्रात दिलेले आहे. ‘‘योऽस्याध्यक्ष: परमे व्योमन्’’ जो याचा स्वामी या महान आकाशात परिपूर्ण होत आहे. तो स्वत: जाणतो. हे वेदानुकूल तर्काचे स्वरूप आहे. $ जर कोणी यात म्हटले, की तो काय जाणतो? व जर जाणतो तर त्या जाणणाऱ्याचे डोके किती मोठे आहे? कारण इतक्या मोठ्या ‘‘ब्रह्मांडा’’ला जाणण्यासाठी डोकेही मोठे असावे लागते. या प्रकारच्या तर्काचे नाव वेदशास्त्रविरोधी तर्क आहे, कुतर्क आहे. $ मुख्य गोष्ट ही की ‘‘वितर्कयोग:’’ची आज्ञा स्वत: वेद देतो, की माणसाने प्रथम तर्क करून वस्तूचा निर्णय करावा, कुतर्क करू नये. ध्यानाच्या प्रथम अवस्थेचे नाव वितर्कयोग आहे. अर्थात्, त्यात नाना प्रकारचे तर्क असतात. ज्यामध्ये परमात्म्याच्या गुणांचा विचार केला जातो, की परमात्मा या प्रकारे या ब्रह्मांडात व्यापक आहे. ज्या प्रकारे विद्युच्छक्ती स्थूल वस्तूमध्ये व्यापक आहे किंवा जशी जीवात्म्याची शक्ती या शरीररूपी ब्रह्मांडात व्यापक आहे. तसा परमात्मा सर्वत्र व्यापक आहे. या विचाराचे नाव ‘आनंदयोग’ आहे. $ जेव्हा पुरुषाचे चित्त बाह्यविषयांपासून दूर होऊन अंतर्मुख होऊन विचारयोगात सिद्धी प्राप्त करतो तेव्हा त्याला एक प्रकारचा आनंद होऊ लागतो, त्यासाठी वरील ध्यानयोगाच्या तिसऱ्या अवस्थेचे नाव ‘आनंदयोग’ आहे. त्या आनंदाच्या पुढे चौथ्या अवस्थेचे नाव अस्मितायोग आहे. अर्थात्, या अवस्थेत पुरुष परमात्म्यात आपल्या चित्तवृत्तीचा असा योग करतो, की ज्यामुळे त्याला परमात्म्याचा व आपला भेदभाव प्रतीत होत नाही. $ त्यावेळी परमात्मरूपी अगाध सागरात तो या प्रकारे निमग्न होतो, की त्याला आनंदच आनंद हा भावनिर्माण होतो. आनंदाशिवाय त्यावेळी त्याच्या दृष्टीत कोणती दुसरी सत्ता राहत नाही. अर्थात्, त्यावेळी तो कोणत्याही वस्तूचा अनुभव घेत नाही. याच अवस्थेला ‘‘ब्राह्मेण जैमिनिरूपन्यासादिभ्य:’’ ब्र. रू. ४-४-५ ॥ यात असे वर्णन केलेले आहे. त्या अवस्थेत परब्रह्माला प्राप्त होऊन जीव सत्य संकल्प इत्यादी धर्मांना धारण करतो. ज्या प्रकारे ब्रह्म सत्य संकल्प आहे त्याच प्रकारे ब्रह्माचे सत्य काम इत्यादी धर्म त्याला साक्षात् वाटतात. त्या ब्रह्माचा आनंद त्याला आत्मानंदाप्रमाणे वाटतो. $ यात युक्ती ही की ज्या प्रकारे चित्तवृत्तिनिरोधाने आत्मगत आनंद इत्यादी गुण प्रतीत होतात त्याच प्रकारे अस्मिता योगाने उपासकाला ब्रह्मानंद आपलाच आनंद भासतो. हाच आनंद प्राप्त करून उपासकाला इतर कोणत्याही वस्तू प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही. याच अवस्थेचे निरूपण उपनिषदात नदी व समुद्राच्या दृष्टीने दृष्टान्त रूपाने केलेला आहे. ज्या प्रकारे नदी महासागराला मिळाल्यावर तिच्यात व महासागरात भेदभाव उरत नाही. वास्तविक त्यावेळी नदीचे लघुत्व व समुद्राचे महानत्व एकरूप झाल्यासारखे वाटते. हाच भाव ‘‘पुरुष एवेद* सर्वं यद्भुतं यच्च भाव्यम् उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति’’॥ यजु. ३१।२॥ इत्यादी मंत्रात वर्णन केलेले आहे, की जे चराचर जगत आहे ते सर्व ईश्वराश्रित आहे. याचेच नाव अद्वैतावस्था आहे. यालाच महर्षी व्यासांनी ‘‘अविभागेन तु दृष्टत्वात्’’ ॥ ब्र. सू. ४।४।४॥ इत्यादी सूत्रात निरूपण केलेले आहे. त्या ब्रह्मात उपासक अविभागावस्था प्राप्त करून एकत्व योग प्राप्त करतो व स्थिर होतो. या अवस्थेचे ऋग्वेदात या प्रकारे वर्णन आहे. $ ‘‘अनीददातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न पर: कि चनास॥’’ ॥ऋ. १०।१२९।२॥ प्रलयकाळात ब्रह्म आपली प्रकृती व जीवरूप शक्तीला आपल्यामध्ये लय करून घेतो. त्यावेळी त्यांची वेगळी सत्ता उरत नाही. याच प्रकारे अस्मितायोग, समाधी, ब्रह्मभाव हे सर्व एकार्थवाची शब्द आहेत. याच अवस्थेला ‘‘तत्त्वमसि’’ ‘‘अहंब्रह्मास्मि’’ इत्यादी वाक्ये निरूपण करतात. या अवस्थेला प्राप्त करून योगी स्वत:मध्ये अपरिमित सत्तेचा अनुभव करतो. त्या अपार सत्तेच्या आश्रयाने तो स्वत:ला किंचितही दुर्बल समजत नाही. या ईश्वर योगाच्या शिखरावर आरूढ होऊन श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे ‘‘पश्य मे योगमैश्वरम्’’ माझ्या ईश्वरविषय योगाचा अनुभव घ्या. या अवस्थेत उपासक दृढतेने हे म्हणू शकतो की ‘‘मी ईश्वराचे ध्यान करतो किंवा मी त्याला जाणतो’’ याचा प्रतिपादक वेदाचा हा मंत्र आहे. ‘‘वेदाहमेतं पुरुषं महान्तादित्यवर्णं तमस: परस्तात् तमेव विदित्वाऽतिमृत्युमेति नान्य: पन्था विद्यतेऽयनाय’’ । यजु. ३१।१८॥’’ $ जो काळोखाच्या पलीकडे प्रकाशाप्रमाणे अविद्येपासून दूर आहे, ज्याची सत्ता अखंडनीय आहे व सर्वात मोठा अर्थात विष्णू-व्यापक रूपाने सर्वांत व्यापक आहे त्या पूर्ण पुरुषाला मी जाणतो. ही ध्यानयोगाची चौथी अवस्था आहे. तिला अस्मिता योगही म्हणतात. $ हा विषय वेद या प्रकारे वर्णन करतो ‘‘योगाय योक्तारम् ’’ ॥ यजु. ३०।१४॥ ‘‘सह योगं भजन्तु मे’’ ॥अथर्व का. १९।८।२॥ योगे योगे तवस्तरं वाजे वाजे हवामहे’’ ॥ अथर्व १९।२४।७॥ सीरा युञ्जन्ति कवयो युगा वितन्वते पृथक्’’ ॥ यजु. १२।६७॥ $ ‘‘युञ्जेवाचं शतपदीम्’’ ॥ सा. उ.९।२।७॥ परमात्मा आध्यात्मिक विद्येसाठी योगीजनांना उत्पन्न करतो व जीवांच्या प्रार्थनेत अभ्युदय इत्यादी सुखांबरोबरच योगानंद इत्यादी सुखांची प्रार्थना आढळते. ऋग्वेद व यजुर्वेदात योगविद्येचे विधानही आढळून येते. जसे ‘‘सीरा युञ्जन्ति कवय:’’ विद्वान लोक सुषुम्ना इत्यादी नाड्यांद्वारे योग करतात व योगविद्येबाबत ऋग्वेदातील दोन मंत्र प्रमाण म्हणून दिलेले आहेत. या प्रकारे व्यापक परमात्म्यामध्ये चित्त स्थिर करण्याचे नाव योग आहे व तो व्यापक परमात्मा येथे विष्णू नावाने संबोधलेला आहे. ‘‘यो ववेष्टि व्याप्नोति चराचरं जगत् स विष्णू:’’ जो परमात्मा या चराचर ब्रह्मांडाला (व्याप्य) एका देशात (स्थाना) स्थिर करून अधिकरणरूपाने विराजमान आहे, त्याचे नाव येथे ‘विष्णू’ आहे. $ या अंतरात्म्याला अंतर्यामी ब्राह्मणात विशेष रूपाने वर्णित केलेले आहे. त्याचेच नाव येथे विष्णू किंवा बृहस्पती आहे. विष्णू, बृहस्पती, अंतर्यामी ही सर्व नावे सर्वव्यापक आत्मशक्तीची आहेत. एखाद्या व्यक्तीची नाहीत.

    इस भाष्य को एडिट करें
    Top