Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 130
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣡न्द्रं꣢ व꣣यं꣡ म꣢हाध꣣न꣢꣫ इन्द्र꣣म꣡र्भे꣢ हवामहे । यु꣡जं꣢ वृ꣣त्रे꣡षु꣢ व꣣ज्रि꣡ण꣢म् ॥१३०॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्र꣢꣯म् । व꣣य꣢म् । म꣣हाधने꣣ । महा । धने꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् अ꣡र्भे꣢꣯ । ह꣣वामहे । यु꣡ज꣢꣯म् । वृ꣣त्रे꣡षु꣢ । व꣣ज्रि꣡ण꣢म् ॥१३०॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रं वयं महाधन इन्द्रमर्भे हवामहे । युजं वृत्रेषु वज्रिणम् ॥१३०॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रम् । वयम् । महाधने । महा । धने । इन्द्रम् अर्भे । हवामहे । युजम् । वृत्रेषु । वज्रिणम् ॥१३०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 130
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात युद्ध क्षेत्रात रक्षणासाठी आम्ही काय केले पाहिजे, हे सांगितले आहे -
शब्दार्थ -
(वयम्) परमेश्वराने उपासक / राज्याचे राजभक्त आम्ही लोक (वृत्रेषु) धर्मनाशक दुष्टांच्या वा दुर्गुणांच्या / आक्रमणाच्या वेळी (वज्रिणम्) वज्रदंड धारण करणाऱ्या आमच्या (युजम्) सहयोगी मित्राला म्हणजे (इन्द्रम्) त्या वीर परमेश्वराला / (महाधने) योगसिद्धीची प्राप्ती करून देणाऱ्या त्या महान आंतरिक संघर्षामध्ये परमेश्वराला हाक मारतो आणि बाह्य विकरात ऐहिक संघर्षाच्या वेळी सुवर्ण, चांदी आदी धन देणाऱ्या राजाला (हवामहे) पुकारतो. त्याच परमेश्वराला वा राजाला (अर्भे) लहान आध्यात्मिक युद्धात व बाह्य संघर्षाच्या वेळीदेखील आम्ही साह्यासाठी पुकारतो. ।। ६।।
या मंत्राचा अर्थ विद्युतपर देखील करता येतो. (इन्द्रम्) आम्ही लहान- मोठ्या संघर्षाच्या वेळी (अडचणी आल्यावर) विद्युतेच्या (हवामहे) उपयोग केला पाहिजे. कोणती विद्युत ? (युजम्) ज्याचा उपयोग विमान आदी यानांमध्ये केला जातो वा शस्त्रास्त्र- संचालनासाठी ज्या विजेचा प्रयोग केला जातो आणि जी विद्युत शक्ती (वृत्रेषु) शत्रूंवर (वज्रिणम्) विजेचा गोळा होऊन अस्त्र शस्त्रांच्या रूपाने फेकली जाते. ।। ६।।
भावार्थ - मनुष्यांसाठी हेच हितकर आहे की त्यानी सामान्य प्रसंगी वा विकट प्रसंगी बाह्य संघर्षाच्या वेळी विजयासाठी राजाला आवाहन करावे आणि आंतरिक देवासुर-संग्रामप्रसंगी विजयी होम्याकरिता अत्यंत पराक्रमी परमेश्वराला हाक मारावी. तसेच युद्धप्रसंगी विद्युत संचलित अस्त्रांची निर्मित करून शत्रूंचा समूल उच्छेद करावा. ।। ६।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ६।।