Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 163
ऋषिः - शुनः शेप आजीगर्तिः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

यो꣡गे꣢योगे त꣣व꣡स्त꣢रं꣣ वा꣡जे꣢वाजे हवामहे । स꣡खा꣢य꣣ इ꣡न्द्र꣢मू꣣त꣡ये꣢ ॥१६३॥

स्वर सहित पद पाठ

यो꣡गे꣢꣯योगे । यो꣡गे꣢꣯ । यो꣣गे । तव꣡स्त꣢रम् । वा꣡जे꣢꣯वाजे । वा꣡जे꣢꣯ । वा꣣जे । हवामहे । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । इ꣡न्द्र꣢म् । ऊ꣣त꣡ये꣢ ॥१६३॥


स्वर रहित मन्त्र

योगेयोगे तवस्तरं वाजेवाजे हवामहे । सखाय इन्द्रमूतये ॥१६३॥


स्वर रहित पद पाठ

योगेयोगे । योगे । योगे । तवस्तरम् । वाजेवाजे । वाजे । वाजे । हवामहे । सखायः । स । खायः । इन्द्रम् । ऊतये ॥१६३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 163
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) ()परमात्मपर) - (योगेयोगे) योग साधनेच्या विविध स्तरांवर म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी (सविल्पक आणि निर्विकल्प) या (तवस्तरम्) क्रमाक्रमाने वाढत जाणाऱ्या, (इन्द्रम्) त्या सिद्धिप्रदायक ईश्वराला (सखायः) आम्ही सर्व साथी सहकारी योगीजन (वाजेवाजे) प्रत्येक आंतरिक देवासुर- संग्रामाच्या वेळी (आईट वा चांगले विचारांचा हृदयात चालणाऱ्या मानसिक युद्धाच्या वेळी) (ऊतये) रक्षणासाठी व विजयप्ऱ्प्तीसाठी (हवामहे) बोलवीत आहोत.।। द्वितीय अर्थ - (सेनाध्यक्षपर) - (योगेयोगे) राष्ट्राच्या प्रत्येक अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीसाठी (तवस्तरम्) अतिशय क्रियाशील, बली व विघ्नविनाशक (इन्द्रम्) दुष्ट शत्रूंचे विदारक, विजयप्रद, धार्मिक व वीर सेनाध्यक्षाला (सखायः) आपसात अत्यंत मैत्री भावाने एकत्र राहणाऱ्या आम्ही प्रजाजनांनी (वाजेवाजे) प्रत्येक युद्धाच्या वेळी (अतये) रक्षणासाठी व विजयप्राप्तीसाठी (हवामहे) बोलवावे. तसेच प्रसंग पडल्यास आम्ही त्याला प्रोत्साहित पण केले पाहिजे. ।। ९।।

भावार्थ - योगाभ्यासी मनुष्याच्या मार्गात माधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आल्प्सम आदी अनेक विघ्ने येतात. ती विघ्ने ईश्वर प्रणिधान व प्रणवजपद्वारे दूर सारता येतात. यामुळे जेव्हा जेव्हा आमच्या अंतःकरणात देवासुर- संग्राम सुरू होतो, त्या त्या वेळी आम्ही विघ्नांना पराजित करण्यासाठी आणि योगसिद्धीच्या प्राप्तीसाठी त्या बली परमेश्वराला हाक मारतो. याचप्रमाणे राष्ट्रावर जेव्हा शत्रू आक्रमण करतो, त्या त्या वेळी त्यांना पराजित करण्यासाठी व राष्ट्र रक्षणासाठी आम्ही प्रजानन शूरवीर सेनाध्यक्षाला प्रोत्साहित केले पाहिजे. कारण की त्यामुळे राष्ट्र शत्रूरहित व उन्नतीशील होईल. ।। ९।।

इस भाष्य को एडिट करें
Top