Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 169
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
क꣡या꣢ नश्चि꣣त्र꣡ आ भु꣢꣯वदू꣣ती꣢ स꣣दा꣡वृ꣢धः꣣ स꣡खा꣢ । क꣢या꣣ श꣡चि꣢ष्ठया वृ꣣ता꣢ ॥१६९॥
स्वर सहित पद पाठक꣡या꣢꣯ । नः꣣ । चित्रः꣢ । आ । भु꣣वत् । ऊती꣢ । स꣣दा꣡वृ꣢धः । स꣣दा꣢ । वृ꣣धः । स꣣खा꣢꣯ । स । खा꣣ । क꣡या꣢꣯ । श꣡चि꣢꣯ष्ठया । वृ꣣ता꣢ ॥१६९॥
स्वर रहित मन्त्र
कया नश्चित्र आ भुवदूती सदावृधः सखा । कया शचिष्ठया वृता ॥१६९॥
स्वर रहित पद पाठ
कया । नः । चित्रः । आ । भुवत् । ऊती । सदावृधः । सदा । वृधः । सखा । स । खा । कया । शचिष्ठया । वृता ॥१६९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 169
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - आता इन्द्र परमेश्वराच्या आणि नृपतीच्या कृपेची याचना केली आहे -
शब्दार्थ -
(हे न कळे की) तो (चित्रः) अद्भुत गुण- कर्म- स्वभाव असणारा इन्द्र नाम परमेश्वर आणि राजा (कया) कशा प्रकारच्या वा कोणत्या अद्भुत (ऊती) रक्षण- क्रियाद्वारे आणि (कया) कशा प्रकारच्या अद्भुत (शचिष्टया) अतिशय विवेकपूर्ण (वृहा) विद्यमान क्रियेद्वारे (नः) आमचा (सदावृधः) सदा वाढत जाणारा (सदैव ज्याची मैत्री वाढत जाते, असा) तो आमचा (सखा) मित्र कशा प्रकारे (आ भुवत्) झालेला आहे. (तो अहोरात्र आमचा हृदयस्थ मित्र म्हणून सोबतच राहतो आणि प्रत्येक क्षणी आमचे रक्षण करतो. हे तो कसे करतो, हे त्याचे त्यालाच ठाऊक !) ।। ५।।
भावार्थ - ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्या विलक्षण रक्षण शक्तीने आणि अद्भुत क्रियाशीलतेने सर्वांची रक्षा करतो व सर्वांवर उपकार रतो, तद्वत राजानेही प्रजेचे रक्षण केले पाहिजे व प्रजेला उपकृत केले पाहिजे ।। ५।।
विशेष -
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे ।। ५।।