Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 18
ऋषिः - प्रयोगो भार्गवः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0

औ꣣र्वभृगुव꣡च्छुचि꣢꣯मप्नवान꣣व꣡दा हु꣢꣯वे । अ꣣ग्नि꣡ꣳ स꣢मु꣣द्र꣡वा꣢ससम् ॥१८॥

स्वर सहित पद पाठ

औ꣣र्वभृगुव꣢त् । औ꣣र्व । भृगुव꣢त् । शु꣡चि꣢꣯म् । अ꣣प्नवानव꣢त् । आ । हु꣣वे । अग्नि꣢म् स꣣मुद्र꣡वा꣢ससम् । स꣣मुद्र꣢ । वा꣣ससम् ॥१८॥


स्वर रहित मन्त्र

और्वभृगुवच्छुचिमप्नवानवदा हुवे । अग्निꣳ समुद्रवाससम् ॥१८॥


स्वर रहित पद पाठ

और्वभृगुवत् । और्व । भृगुवत् । शुचिम् । अप्नवानवत् । आ । हुवे । अग्निम् समुद्रवाससम् । समुद्र । वाससम् ॥१८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 18
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
मी (और्वभृगुवत्) पार्थिव पदार्थांना तप्त करणाऱ्या सूर्याप्रमाणे आणि (अप्नवानवत्) क्रियासेवी गमनशील वायूप्रमाणे (शुचिम्) स्वत: पवित्र तसेच पवित्रताकारक आणि (समुद्रवाससम) हृदयाकाशामध्ये तसेच ब्रह्माण्डाकाशामध्ये निवास करणाऱ्या (अग्निम्) ज्योतिष्यान् व ज्योतिप्रद परमात्म्यास (आहुवे) हाक देत आहे. ।।८।। द्वितीय अर्थ : विद्युत परक विद्युते विषयी सांगतात मी (और्वभृगुवत्) जसे सूर्याचा म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा मंत्रादीमध्ये उपयोग करतो आणि (अप्नवानवत्) पाककर्म आदी कार्यांसाठी पार्थिव अग्नीचा यंत्रादीमध्ये उपयोग करतो, तसेच (शुचिम्) प्रदीप्त (समुद्रवाससम) अंतरिक्षात असणाऱ्या वैद्युत अग्नीचा (आहुवे) प्रकाशासाठी व यानादीमध्ये वापर करण्यासाठी (आहुवे) जवळ आणत आहे. (शक्ती वा ऊर्जा म्हणून त्याचा उपयोग करीत आहे.) ।।८।। या मंत्रात उपमा आणि श्लेष अलंकार आहेत. ।।८।।

भावार्थ - ज्याप्रमाणे सूर्य आणि वायू पवित्र असून शुद्धीकारक आहेत, सर्वांचे जीवनाधार आहेत, तद्वत परमेश्वरही तसाच आहे. जसे सूर्य आणि वायू आकाशात राहतात, तसेच परमेश्वरही हृदयाकाशात आणि विश्व ब्रह्माण्डाकाशात आहे. अशा परमेश्वराचा सर्वांनी साक्षात्कार केला पाहिजे. याशिवाय सूर्याग्नी, पार्थिवाक्षी आणि वैद्युताग्नीद्वारा यान आदींचे संचालन केले पाहिजे. ।।८।। जसे और्वऋषि, भृगुऋषि आणि अप्नवान ऋषि शुचि अग्नीला आमंत्रित करतात, तसेच मीही बोलावत आहे विवरणकाराने या मंत्राची अशी व्याख्या केली आहे. भरतस्वामींनीही हाच अर्थ ग्रहीत केला आहे. सायणाचार्य ने और्व आणि भृगु ही वेगळी नावे न मानता एकच नाव और्वभृगु असे रूप केले आहे. वरील ही सर्व व्याख्याने असंगत आहेत. कारण की सृष्टीच्या आरंभकाळात प्रादुर्भाव वेदांमध्ये पश्चाद्ववर्ती ऋषी आदींचा इतिहास असणे शक्य नाही. ।।

इस भाष्य को एडिट करें
Top