Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 193
ऋषिः - वत्सः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
त्वा꣡व꣢तः पुरूवसो व꣣य꣡मि꣢न्द्र प्रणेतः । स्म꣡सि꣢ स्थातर्हरीणाम् ॥१९३॥
स्वर सहित पद पाठत्वा꣡व꣢꣯तः । पु꣣रूवसो । पुरु । वसो । वय꣣म् । इ꣣न्द्र । प्रणेतः । प्र । नेतरि꣡ति । स्म꣡सि꣢꣯ । स्था꣣तः । हरीणाम् ॥१९३॥
स्वर रहित मन्त्र
त्वावतः पुरूवसो वयमिन्द्र प्रणेतः । स्मसि स्थातर्हरीणाम् ॥१९३॥
स्वर रहित पद पाठ
त्वावतः । पुरूवसो । पुरु । वसो । वयम् । इन्द्र । प्रणेतः । प्र । नेतरिति । स्मसि । स्थातः । हरीणाम् ॥१९३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 193
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात इन्द्र या नावाने परमात्मा, जीवात्मा आणि विद्वान या सर्वांना संबोधून कथन केले आहे -
शब्दार्थ -
(पुरुवसो) प्रभूत संपदेचे स्वामी (प्रणेतः) आणि आणि उत्कृष्ट नेता, (हरिणाम्) आकर्षण्णुणयुक्त पृथ्वी, सूर्य आदी लोकांचे अधिष्ठाता हे (इन्द्र) परमात्मन् / विषयांकडे प्रवृत्त करणाऱ्या इंद्रियांना नियंत्रित करणाऱ्या हे जीवात्मा अथवा विमानादी वाहनांचे (स्थातः) स्वामी व प्रमुख असलेले हे विद्वान वैज्ञानिक, (वयम्) आही मनुष्य (त्वावतः) तुमच्यासारखा कोणी इतर रक्षक नसल्यामुळे तुमचेच केवळ तुमचेचे (स्मसि) होऊन गेलो आहोत. कारण तुम्ही अद्वितीय आहात. ।। ९।।
भावार्थ - विश्वात असलेल्या सर्व संपदाचा जो स्वामी, सर्वांचे जो नेता, सूर्यादी लोकांचा जो अधिष्ठाता, अनुपम असा परमेश्वर जसा सर्वांसाठी वंदनीय आहे, तसेच विविध ज्ञान, कर्म आदी धनांचा स्वामी, मार्गदर्शक, ज्ञानेन्द्रियें, कर्मेंद्रियांचा, प्राण, मन, बुद्धी आदीचा अधिष्ठाता जीवात्मादेखील सर्वांसाठी सेवनीय आहे. याचप्रमाणे अति वेगवान विमानादी यानांचे निर्माता, चालन कलेत निपुण, विविध विद्या पारंगत शिल्प शास्त्रज्ञाता विद्वान (म्हणजे वैज्ञानिक, वैमानिक, यांत्रिक जन) देखील सर्व मनुष्यांद्वारे सेवनीय व वंदनीय आहेत. ।। ९।। या दशतीध्ये इन्द्राशी संबंधित वरुण, मित्र आणि अर्यमाकडून रक्षण मिळावे याविषयी प्रार्थना, इन्द्राच्या गायींची प्रशंसा इन्द्राकडून गौ, अश्व आदींची याचना, इंद्राच्या सरस्वतीचे आवाहन, इंद्राचे स्तुतिगान तसेच इंद्र या शब्दाने राजा, विद्वान, आचार्य आदी विषय वर्णित आहेत. त्यामुळे या दशतीच्या अर्थाची संगती या पूर्वीच्या दशतीच्या अर्थाशी आहे, असे जाणावे.।। द्वितीय प्रपाठकाच्या द्वितीय अर्धातील पाचवी दशती समाप्त। इथे द्वितीय प्रपाठक संपूर्ण. द्वितीय अध्यायातील अष्टम खंड समाप्त. तृतीय प्रपाठक आरंभ
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ङ्गकमळ पुष्प कमळ पुष्पाप्रमाणे आहेफ या अलंकारोक्तीप्रमाणे असल्यामुळे ङ्गत्वावतःफ या शब्दात अनन्वय अलंकार आहे. (तुझ्यासारखा तूच आहेस) ।। ९।।