Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 20
ऋषिः - वत्सः काण्वः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
आ꣢꣫दित्प्र꣣त्न꣢स्य꣣ रे꣡त꣢सो꣣ ज्यो꣡तिः꣢ पश्यन्ति वास꣣र꣢म् । प꣣रो꣢꣫ यदि꣣ध्य꣡ते꣢ दि꣣वि꣢ ॥२०॥
स्वर सहित पद पाठआ꣢त् । इत् । प्र꣣त्न꣡स्य꣢ । रे꣡त꣢꣯सः । ज्यो꣡तिः꣢꣯ । प꣣श्यन्ति । वासर꣢म् । प꣣रः꣢ । यत् । इ꣣ध्य꣡ते꣢ । दि꣣वि꣢ ॥२०॥
स्वर रहित मन्त्र
आदित्प्रत्नस्य रेतसो ज्योतिः पश्यन्ति वासरम् । परो यदिध्यते दिवि ॥२०॥
स्वर रहित पद पाठ
आत् । इत् । प्रत्नस्य । रेतसः । ज्योतिः । पश्यन्ति । वासरम् । परः । यत् । इध्यते । दिवि ॥२०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 20
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - योगीजन परमेश्वराची अलौकिक ज्योती केव्हा पाहतात, याविषयी सांगत आहेत. -
शब्दार्थ -
त्या (प्रत्नस्य) सनातन (रेतस:) वीर्यवान् परमसामर्थ्यवान परमात्म सूर्याच्या ज्योतीला की जी (वासरम्) राग, द्वेष, मोह आदीचा अंध:कार दूर करणारी आहे. जी अणिमा आदी ऐश्वर्याची निवासक आहे अथवा दिव्य दिन उत्पन्न करणारी आहे. त्या (ज्योति:) ज्योतीला, योगदर्शनात ज्याला ज्योतिष्मती वृत्ती म्हटले आहे, त्या ज्योतीला ज्ञानदीप्ती अथवा विवेकख्यातीला योगीजन (आत् इत्) त्यानंतरच (पश्यन्ति) पाहू शकतात की (यत्) जेव्हा तो परमात्म सूर्य (पर:) पलीकडे (दिवि) आत्मारूप भुलोकात (इध्यते) प्रदीप्त होतो. ।।१०।।
भावार्थ - सकाळी उदित झालेला सूर्य माध्यान्हकाळी जेव्हा आकाशात उंचावर पोहोचतो, तेव्हाच लोक त्याच्या अंधकारनिवारक देदीप्यमान, दिवस निर्माण करणाऱ्या संपूर्ण प्रभामंडळाला पाहू शकतात. त्याप्रमाणेच योगिजनांद्वारे ध्यात परमात्मा जेव्हा त्यांच्या आत्मलोकात जगमग दीप्त होतो, तेव्हाच योगीजन परमेश्वराच्या रागद्वेषादी निवारक, योगसिद्धीप्रदायक तसेच जीवन्मुक्तिरूप दिवस उत्पन्न करणाऱ्या दिव्य प्रकाशाचा साक्षात्कार करण्यास यशस्वी होतात. ।।१०।। या दशतीमध्ये परमेश्वराच्या गुण, कर्म, स्वभावाचा वर्णन करीत त्याला प्रसन्न करणे त्याच्याप्रत नमस्कार, त्याला स्त्रोतांचे समर्पण, मनुष्यांनी परमेश्वराची स्तुतीसह त्या व्यतिरिक्त कर्माविषयी प्रेरणा, आणि परम ज्योतीचे दर्शन या विषयांचे वर्णन आहे. यामुळे या दशतीच्या अर्थाशी पूर्व दशतीच्या (प्रथम दशतीच्या) अर्थाशी संगती आहे, असे जाणावे. ।। प्रथम प्रपाठक, प्रथम अर्ध्यातील द्वितीय दशति समाप्त.
विशेष -
श्लेषाने या मंत्रशचा सूर्यपरक अर्थही करता येतो. ।।१०।।