Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 216
ऋषिः - त्रिशोकः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

आ꣢ बु꣣न्दं꣡ वृ꣢त्र꣣हा꣡ द꣢दे जा꣣तः꣡ पृ꣢च्छा꣣द्वि꣢ मा꣣त꣡र꣢म् । क꣢ उ꣣ग्राः꣡ के ह꣢꣯ शृण्विरे ॥२१६॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । बु꣣न्द꣢म् । वृ꣣त्रहा꣢ । वृ꣣त्र । हा꣢ । द꣣दे । जातः꣢ । पृ꣣च्छात् । वि꣢ । मा꣣त꣡र꣢म् । के । उ꣣ग्राः꣢ । के । ह꣣ । शृण्विरे ॥२१६॥


स्वर रहित मन्त्र

आ बुन्दं वृत्रहा ददे जातः पृच्छाद्वि मातरम् । क उग्राः के ह शृण्विरे ॥२१६॥


स्वर रहित पद पाठ

आ । बुन्दम् । वृत्रहा । वृत्र । हा । ददे । जातः । पृच्छात् । वि । मातरम् । के । उग्राः । के । ह । शृण्विरे ॥२१६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 216
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (जीवात्मा पर अर्थ) - (जातः मानव देह घेऊन जन्माला आलेल्या (वृत्रहा) आणि दुष्टांचा संहार करण्यात समर्थ अशा जीवात्म्याने (बुन्दम्) वाण अथवा शस्त्रसमूह (आददे) धारण करावा आणि आपल्या (मातरम्) आईला (वि पृच्छात्) विचारावे की हे माते सांग, (के) कोण ते (उग्राः) दुष्टजन आहेत आणि (के ह) कोणते (शृण्विरे) सद्वुण व सत्कर्मांमुळे प्रख्यात असे लोक आहेत ? तुझ्या सांगण्यामुळे मी त्या दुष्टांना दंड देईन आणि सज्जनांचा सन्मान करीन.।। (वीर पुत्राने आईला विचारत असावे. ती सांगू शकते की समाजात कोण दुर्जन व कोण सज्जन आहेत.)।। द्वितीय अर्थ ( अर्थ) - (जातः) वेग, चांचल्य आदीविषयी प्रसिद्ध आणि (वृत्रहा) पापरूप वृत्राचा विनाश करणाऱ्या इन्द्राने अर्थात सद्विचारशील मनाने (बुन्दम्) शिवसंकल्परूप बाण (आददे) धारण करावा आणि (मातरम्) सत- असतविषयी विवेक असणाऱ्या बुद्धीला (वि पृच्छत्) विचारावे की (के) कोणते ते विचार आहेत की जे (उग्राः) उत्कट पापमय आहेत आणि (के ह) कोणते ते विचार आहेत की (शृण्विरे, ज्यांची कीर्ती वा प्रसिद्धी आहे. हे बुद्धी, तू सांग, कारण त्यामुळे मी, मन, पापात्मक विचारांचे खंडन आणि पुण्यात्मक विचारांचे मंडन करू शकेन.।। तृतीय अर्थ - (राजापर) - (जातः) प्रजेद्वारे राजा पदावर अभिषिक्त झालेल्या आणि (वृत्रहा) बाह्य आणि आंतरिक शत्रूपासून राष्ट्राचे रक्षण करण्यात समर्थ असलेल्या राजाने (बुन्दम्) हाती बाण घ्यावा वा शासन- व्यवस्था आणि शस्त्रसमूह (आद्दे) हाती घ्यावा आणि (मातरम्) राजाची जी निर्माती म्हणजे प्रजा, तिला (वि पृच्छात्) विचारावे की (के) कोण ते शत्रू आहेत की जे (उग्राः) प्रचंड क्रोधी आहेत वा जे तुम्हाला त्रास देतात, हे सांगा आणि (के ह) कोण ते लोक आहेत की जे (शृण्विरे) सद्वुण, सत्कर्म आयीविषयी विश्रुत आहेत आणि जे तुमच्याशी मित्रवत आचरण करतात. हे सांगा, म्हणजे आम्ही (प्रजाजन) दुष्टांना दंडित करू शकू आणि मित्रांचा सत्कार करू शकू.।। ३।।

भावार्थ - सर्व मानव देहधारी सज्जनांचे व राजाचे कर्तव्य आहे की त्यांनी दुष्टांना दंडित करावे आणि पुण्यात्माजनांना सम्मानित करावे. तसेच हेदेखील सर्वांच्या हिताचे आहे की त्यांनी मन आणि बुद्धीच्या साह्याने पाप दूर सारावेत आणि पुण्य कर्मांचा प्रसार करावा.।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top