Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 240
ऋषिः - भर्गः प्रागाथः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
त्व꣢꣫ꣳ ह्येहि꣣ चे꣡र꣢वे वि꣣दा꣢꣫ भगं꣣ व꣡सु꣢त्तये । उ꣡द्वा꣢वृषस्व मघव꣣न्ग꣡वि꣢ष्टय꣣ उ꣢दि꣣न्द्रा꣡श्व꣢मिष्टये ॥२४०॥
स्वर सहित पद पाठत्व꣢म् । हि । आ । इ꣣हि । चे꣡र꣢꣯वे । वि꣣दाः꣢ । भ꣡ग꣢꣯म् । व꣡सु꣢꣯त्तये । उत् । वा꣣वृषस्व । मघवन् । ग꣡वि꣢꣯ष्टये । गो । इ꣣ष्टये । उ꣢त् । इ꣣न्द्र । अ꣡श्व꣢꣯मिष्टये । अ꣡श्व꣢꣯म् । इ꣣ष्टये ॥२४०॥
स्वर रहित मन्त्र
त्वꣳ ह्येहि चेरवे विदा भगं वसुत्तये । उद्वावृषस्व मघवन्गविष्टय उदिन्द्राश्वमिष्टये ॥२४०॥
स्वर रहित पद पाठ
त्वम् । हि । आ । इहि । चेरवे । विदाः । भगम् । वसुत्तये । उत् । वावृषस्व । मघवन् । गविष्टये । गो । इष्टये । उत् । इन्द्र । अश्वमिष्टये । अश्वम् । इष्टये ॥२४०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 240
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला व राजाला प्रार्थना
शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमेश्वर अथवा हे राजा, (चेरवे) मी एका पुरुषार्थी मनुष्य, अशा माझ्यासाठी (त्वं हि) आपण (आ इहि) माझ्याकडे (मला साह्य देण्यासाठी) या. माझे सहायायकर्ता व्हा. (वसुत्तये) मी एक दानी स्वभावाचा मनुष्य, मला दान देण्यासाठी आपण (भगम्) धनसंपत्ती (विदाः) मिळेल, असे करा. हे (मधवन) ऐश्वर्यशाली ईश्वर वा राजा, (गविष्टये) मला शांत इंद्रियें, पृथ्वीचे राज्य, विद्या प्रकाश मिळण्यासाठी (उद् वा वृषस्व) धन, विद्या आदींची पुनः पुनः वृष्टी करीत रहा. (अश्वमिष्यमे) घोडे, शक्ती, वेग, प्राण आदींचा मी एक इच्छुक, माझ्यासाठी आपण (उद् वावृषस्व) अत्यधिकरूपाने वरील सर्व पदार्थ मिळण्यास सहाय्यभूत व्हा. (मला हे सर्व पुन्हा पुन्हा मिळत राहतील, असे करा.)।।८।।
भावार्थ - परमेश्वर आणि राजा तसेच राज्याधिकारी त्याचीच सहायता करतात, जो ङ्गचरे वैति, चरे वैतिफ ङ्गपुरुषार्थ कराफ ङ्गपुरुषार्थ कराफ (ऐतरेय ब्राह्मण ७/३/३) या उपदेशाला आपल्या जीवनात आचरतात. परमेश्वर व राजा त्यालाच मदत करतात, जो पुरुषार्थाद्वारे धन अर्जित करून सत्पात्री दान करतो.।।८।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे।।८।।
‘या’ ‘व्हा’ ‘करा’ आदी क्रियापदांचा कर्ता एकच (म्हणजे आपण) असल्यामुळे येथे दीपक अलंकार आहे. ‘ष्ट्य’ ‘ष्ट्ये’ येथे छेदानुप्रसा आणि द्वितीय व चतुर्थ पादाच्या अंती ‘अये’ शब्द असल्यामुळे येथे अन्त्यानुप्रासही आहे.।।८।।