Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 257
ऋषिः - नृमेधपुरुमेधावाङ्गिरसौ देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

प्र꣢ व꣣ इ꣡न्द्रा꣢य बृह꣣ते꣡ मरु꣢꣯तो꣣ ब्र꣡ह्मा꣢र्चत । वृ꣣त्र꣡ꣳ ह꣢नति वृत्र꣣हा꣢ श꣣त꣡क्र꣢तु꣣र्वज्रेण श꣣त꣡प꣢र्वणा ॥२५७॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । वः꣢ । इ꣡न्द्रा꣢꣯य । बृ꣣हते꣢ । म꣡रु꣢꣯तः । ब्र꣡ह्म꣢꣯ । अ꣣र्चत । वृत्र꣢म् । ह꣢नति । वृत्रहा꣢ । वृ꣣त्र । हा꣢ । श꣣त꣡क्र꣢तुः । श꣣त꣢ । क्र꣣तुः । व꣡ज्रे꣢꣯ण । श꣣त꣡प꣢र्वणा । श꣣त꣢ । प꣣र्वणा ॥२५७॥


स्वर रहित मन्त्र

प्र व इन्द्राय बृहते मरुतो ब्रह्मार्चत । वृत्रꣳ हनति वृत्रहा शतक्रतुर्वज्रेण शतपर्वणा ॥२५७॥


स्वर रहित पद पाठ

प्र । वः । इन्द्राय । बृहते । मरुतः । ब्रह्म । अर्चत । वृत्रम् । हनति । वृत्रहा । वृत्र । हा । शतक्रतुः । शत । क्रतुः । वज्रेण । शतपर्वणा । शत । पर्वणा ॥२५७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 257
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) हे (मरुतः) माझ्या प्राणांनो, (वः) तुम्ही (बृहते) महान (इन्द्राय) परमेश्वरासाठी त्याच्याप्रत (ब्रह्म) साम- स्तोत्र (५ अर्चत) प्रेरित करा (त्याच्या वंदनेकरिता सोमगान गा) तो (वृत्रहा) पापहन्ता (शतक्रतुः) अनंत प्रज्ञावान आणि अनंत कर्मे करणारा परमेश्वर आपल्या (शतपर्वणा) बहुमुखी (वज्रेण) पराक्रमाद्वारे (वृत्रम्) पाप (हनति) नष्ट करो।। द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) हे (मरुतः) राष्ट्रवासी प्रजाजनहो, (वः) तुम्ही (बृहते) महान (इन्द्राय) वीर सेनाध्यक्षाप्रत (ब्रह्म) स्तोत्र म्हणणे प्रार्थना वचन (अर्चत) म्हणा व इतरांना म्हणण्यासाठी प्रवृत्त करा) तो (वृत्रहा) सेनाध्यक्ष अत्याचारी लोकांचा संहारक असून (शतक्रतुः) अनेक शत्रुविध्वंसक कार्ये करणारा आहे. (शत पर्वणा) शेकडो खिळे लावलेल्या गदा आदी शक्त्राद्वारे या शेकडो प्रहार करणाऱ्या वज्राद्वारे अथवा शंभर तोफगोळे वा गोळ्या सोडणाऱ्या तोफ, बंदूक आदी शस्त्राद्वारे (वृत्रम्) राष्ट्रोन्नातील बाधक अशा मायावी शत्रूला (हनति) ठार करतो.।।५।।

भावार्थ - जसा परमेश्वर उपासकाच्या काम, क्रोध आदी दोषांचा व पाप आदी शत्रूंचा संहार करतो, तद्वत सेनाध्यक्षाचे कर्तव्य आहे की त्याने राष्ट्राच्या सर्व शत्रूंचे / समूळ उन्मूलन करावे.।।५।।

इस भाष्य को एडिट करें
Top