Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 261
ऋषिः - मेधातिथिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

व꣣यं꣡ घ꣢ त्वा सु꣣ता꣡व꣢न्त꣣ आ꣢पो꣣ न꣢ वृ꣣क्त꣡ब꣢र्हिषः । प꣣वि꣡त्र꣢स्य प्र꣣स्र꣡व꣢णेषु वृत्रह꣣न्प꣡रि꣢ स्तो꣣ता꣡र꣢ आसते ॥२६१॥

स्वर सहित पद पाठ

व꣣य꣢म् । घ꣣ । त्वा । सुता꣡व꣢न्तः । आ꣡पः꣢꣯ । न । वृ꣣क्त꣡ब꣢र्हिषः । वृ꣣क्त꣢ । ब꣣र्हिषः । पवि꣡त्र꣢स्य । प्र꣣स्र꣡व꣢णेषु । प्र꣣ । स्र꣡व꣢꣯णेषु । वृ꣣त्रहन् । वृत्र । हन् । प꣡रि꣢꣯ । स्तो꣣ता꣡रः꣢ । आ꣣सते ॥२६१॥


स्वर रहित मन्त्र

वयं घ त्वा सुतावन्त आपो न वृक्तबर्हिषः । पवित्रस्य प्रस्रवणेषु वृत्रहन्परि स्तोतार आसते ॥२६१॥


स्वर रहित पद पाठ

वयम् । घ । त्वा । सुतावन्तः । आपः । न । वृक्तबर्हिषः । वृक्त । बर्हिषः । पवित्रस्य । प्रस्रवणेषु । प्र । स्रवणेषु । वृत्रहन् । वृत्र । हन् । परि । स्तोतारः । आसते ॥२६१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 261
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे इन्द्र परमेस्वर, अशा (आपःन) मेघजलाप्रमाणे की ज्यानी (वृक्तबर्हिषः) अंतरिक्ष- स्थान सोडले आहे (म्हणजे जे भूमीला जल देण्यासाठी आपल्या उच्च स्थानापासून खाली भूमीकडे आले आहेत) त्या जलाप्रमाणे (वृक्तबर्हिषः) ज्यानी सांसारिक एषणांचा त्याग केला आहे आणि जे (सुताघन्तः) उपासना- रस अभिष्युत करून (हृदयी आपले ध्यान जागृत करून) (वयं घ) आम्ही (त्वा) आपली स्तुती करीत आहोत. कारण की हे) वृत्रहन्) पापनाशक परमेश्वर (स्तोतारः) तुमचे स्तोतागण (पवित्रस्य) शुद्ध सात्त्विक आनंदाच्या (प्रस्रवणेषु) प्रवाहामद्ये (परि आसवे) पोहत असतात. जरी अंतरिक्ष स्थान सोडून खाली उतरलेले मेघजल (प्रस्रवणेषु) नद्या, निर्झर आदींमध्ये (परि आसते) प्रवाहित होतात, (तद्वत तुमचे उपासक भक्तीच्या आनंद प्रवाहात मग्न होतात)।।९।।

भावार्थ - जसे मेघजल आकाशाचे आपले स्थान सोडून भूमीवर येऊन धान्य, वनस्पती आदी पदार्थ उत्पन्न करतात, तद्वत आम्ही पुत्रैषणा, वित्तैषणा, लोकैषणा आदी इच्छांचा त्याग करून परमेश्वराची प्राप्ती करून हृदयात आनंद रस उत्पन्न करावा, अनुभवावा.।।९।।

इस भाष्य को एडिट करें
Top