Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 271
ऋषिः - मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
क्वे꣢꣯यथ꣣ क्वे꣡द꣢सि पुरु꣣त्रा꣢ चि꣣द्धि꣢ ते꣣ म꣡नः꣢ । अ꣡ल꣢र्षि युध्म खजकृत्पुरन्दर꣣ प्र꣡ गा꣢य꣣त्रा꣡ अ꣢गासिषुः ॥२७१॥
स्वर सहित पद पाठक्व꣢꣯ । इ꣣यथ । क्व꣢꣯ इत् । अ꣣सि । पुरुत्रा꣢ । चि꣣त् । हि꣢ । ते꣣ । म꣡नः꣢꣯ । अ꣡ल꣢꣯र्षि । यु꣣ध्म । खजकृत् । खज । कृत् । पुरन्दर । पुरम् । दर । प्र꣢ । गा꣣यत्राः꣢ । अ꣣गासिषुः ॥२७१॥
स्वर रहित मन्त्र
क्वेयथ क्वेदसि पुरुत्रा चिद्धि ते मनः । अलर्षि युध्म खजकृत्पुरन्दर प्र गायत्रा अगासिषुः ॥२७१॥
स्वर रहित पद पाठ
क्व । इयथ । क्व इत् । असि । पुरुत्रा । चित् । हि । ते । मनः । अलर्षि । युध्म । खजकृत् । खज । कृत् । पुरन्दर । पुरम् । दर । प्र । गायत्राः । अगासिषुः ॥२७१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 271
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - परमात्म्याला आणि राजाला आवाहन
शब्दार्थ -
हे इन्द्र जगदीश्वर अथवा हे राजा, आपण (क्व) कुठे (इयथ) गेला आहात ? (क्व इत्) (असि) आहात. (पुरुत्रचित्) अनेकांच्या उद्धार कार्यामध्ये (ते) तुझे (मनः) मन लागलेले आहे का ? हे (युघ्म) युद्धकुशल, हे (खजकृत्० शत्रुमंथन करणाऱ्या हे (पुरन्दर) शत्रुनगरी उद्ध्वस्त करणारे हे राजा, आपण (अलर्षि) गतिमान (शीघ्र आक्रमणकारी) व कर्मण्य आहात (हे परमेश्वरा, तू आमच्या मनातील काम, क्रोधादी शत्रूचा नाश करणारा आणि शीघ्ररक्षक आहेस) (गायत्राः) प्रभूची स्तुती करणारे अथवा राष्ट्रभक्तीचे गायकजन (आगासिषुः) हे परमेश्वर आणि हे राज्य तुमचे निरतेर यशोगान करीत आहेत.
खरे पाहता परमात्मा आम्हाला सोडून कुठे जात नाही. आम्हीच त्याला सोडतो, विसरतो. भाषेची ही अशी विशिष्ट अभिव्यक्ती शैली आहे. यात स्वतःला उपालम्भ न देता परमेश्वराला उपालंभाचा विषय केला आहे, पण इतर अनेक ठिकाणी परमेश्वराचा अनुग्रह न झाल्यामुळे भक्ताने स्वतःला उपालंभ दिला आहे - ‘‘हे वरुण परमेश्वरा, माझ्याकडून असा कोणता गुन्हा घडला की ज्यामुळे जो तुझा सर्वाहून मोठा स्तोता आहे (म्हणजे मी). तू माझा वध करू पाहतोस ? माझा अपराध तरी कळू दे, कारण त्यामुळे तो गुन्हा करणे सोडून नमस्कारपूर्वक तुझे शरण स्वीकारीन.’’ (ऋ ७/८६/४) वेदांमध्ये अशा प्रकारे दोन्ही प्रकारची शैली प्रयुक्त आहे. राजापर अर्थ करताना असा संदर्भ घ्यावा लागेल की पीडित प्रजानन रक्षणासाठी राजाचे आवाहन करीत आहे अथवा त्याला उद्बोधित करती आहेत.।। ९।।
भावार्थ - जसे काम, क्रोध आदी दोषांनी त्रस्त जन परमेश्वराला साह्यासाठी हाक मारतात, तद्वत मानव शत्रूंपासून पीडित वा भयभीत प्रजाजन आपल्या राजाचे आवाहन करतात. ।। ९।।
विशेष -
या मंत्रात अर्थवलेष अलंका आहे. ङ्गक्वे क्वेफमध्ये छेकानुप्रास आणि (युघ्म, खजकृत्, पुरंदरफ या शब्दामध्ये पुनरुक्तवदाभास अलंकार आहे. ।। ९।।