Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 279
ऋषिः - देवातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
य꣡दि꣢न्द्र꣣ प्रा꣢꣫गपा꣣गु꣢द꣣꣬ग्न्य꣢꣯ग्वा हू꣣य꣢से꣣ नृ꣡भिः꣢ । सि꣡मा꣢ पु꣣रू꣡ नृषू꣢꣯तो अ꣣स्या꣢न꣣वे꣢ऽसि꣢ प्रशर्ध तु꣣र्व꣡शे꣢ ॥२७९॥
स्वर सहित पद पाठय꣢त् । इ꣣न्द्र । प्रा꣢क् । अ꣡पा꣢꣯क् । अ꣡प꣢꣯ । अ꣣क् । उ꣡द꣢꣯क् । उत् । अ꣣क् । न्य꣢꣯क् । नि । अ꣣क् । वा । हूय꣡से꣢ । नृ꣡भिः꣢꣯ । सि꣡म꣢꣯ । पु꣣रू꣢ । नृ꣡षू꣢꣯तः । नृ । सू꣣तः । असि । आ꣡न꣢꣯वे । अ꣡सि꣢꣯ । प्र꣣शर्ध । प्र । शर्द्ध । तु꣡र्वशे꣢ ॥२७९॥
स्वर रहित मन्त्र
यदिन्द्र प्रागपागुदग्न्यग्वा हूयसे नृभिः । सिमा पुरू नृषूतो अस्यानवेऽसि प्रशर्ध तुर्वशे ॥२७९॥
स्वर रहित पद पाठ
यत् । इन्द्र । प्राक् । अपाक् । अप । अक् । उदक् । उत् । अक् । न्यक् । नि । अक् । वा । हूयसे । नृभिः । सिम । पुरू । नृषूतः । नृ । सूतः । असि । आनवे । असि । प्रशर्ध । प्र । शर्द्ध । तुर्वशे ॥२७९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 279
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - मनुष्य परमेश्वराचे चारही दिशांत आवाहन करीत आहेत -
शब्दार्थ -
हे (इंद्र) जगदीश्वर, (यत्) ज्याअर्थी (प्राक्) पूर्व दिशेत (अपाक्) पश्चिम दिशेत (उदक) उत्तर दिशेत (न्यक् वा) आणि दक्षिण दिशेत (नृभिः) उपासक गण वा स्तोतागण तुझे (हूयसे) आवाहन करतात (हृदयी जागृत होण्यासाठी तुला हाक मारतात) तुझे महिमा गान करतात, त्यामुळे तू (नृषूतः) त्या स्तोतागणाद्वारे प्रेरित व प्रचारित होऊन तू (पुरू) अनेक रूपात (सिमा) सर्वत्र (आनवे) मानव जातीमध्ये (असि) प्रसिद्ध होतोस. (सर्वांना तुझ्या अस्तित्वाची जाणीव होते.( (प्रशर्ध) हे प्रकृष्ट रूपाने शत्रूंना (काम- क्रोधादींना) परास्त करणाऱ्या जगदीश्वरा, तू (तुर्वशे) मार्गात येणाऱ्या विघ्न- बाधांना विभष्ट करणाऱ्या पुरुषार्थी मनुष्यात (त्याच्या हृदयात) त्याला साह्य करण्यासाठी तू (असि) सदा विद्यमान असतोस. ।। ७।।
भावार्थ - आम्ही सर्व दिशांमध्ये, सर्व देश प्रदेशात परमात्म्याचा, त्याच्या विद्यमानतेचा प्रचार केला पाहिजे, तरच मानव जातीचे कल्याण संभवनीय आहे. ।। ७।। या मंत्रावर भाष्य करताना सायणाचार्याने म्हटले आहे की अनु नावाचा एक राजा होता. त्याचा राजर्षि पुत्र ‘आनव’ होता. तसेच ङ्गतुर्वशफ हेदेखील एका राजाचे नाव आहे. सायणाचे हे व्याख्यान असंगत आहे. कारण सृष्टीच्या आदिकाळात प्रादुर्भूत वेदांमध्ये परवर्ती मानवाच्या इतिहासाचे वर्णन असणे शक्य नाही. निघंटुमध्येही अनु व तुर्वश हे शब्द मनुष्यत्वाची असल्याचा उल्लेख आहे.
इस भाष्य को एडिट करें