Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 288
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

य꣣दा꣢ क꣣दा꣡ च꣢ मी꣣ढु꣡षे꣢ स्तो꣣ता꣡ ज꣢रेत꣣ म꣡र्त्यः꣢ । आ꣡दिद्व꣢꣯न्देत꣣ व꣡रु꣢णं वि꣣पा꣢ गि꣣रा꣢ ध꣣र्त्ता꣢रं꣣ वि꣡व्र꣢तानाम् ॥२८८

स्वर सहित पद पाठ

य꣣दा꣢ । क꣣दा꣢ । च꣣ । मीढु꣡षे꣢ । स्तो꣣ता । ज꣣रेत । म꣡र्त्यः꣢꣯ । आत् । इत् । व꣣न्देत । व꣡रु꣢꣯णम् । वि꣣पा꣢ । गि꣣रा꣢ । ध꣣र्त्ता꣡र꣢म् । वि꣡व्र꣢꣯तानाम् । वि । व्र꣣तानाम् ॥२८८॥


स्वर रहित मन्त्र

यदा कदा च मीढुषे स्तोता जरेत मर्त्यः । आदिद्वन्देत वरुणं विपा गिरा धर्त्तारं विव्रतानाम् ॥२८८


स्वर रहित पद पाठ

यदा । कदा । च । मीढुषे । स्तोता । जरेत । मर्त्यः । आत् । इत् । वन्देत । वरुणम् । विपा । गिरा । धर्त्तारम् । विव्रतानाम् । वि । व्रतानाम् ॥२८८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 288
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(यदा कदा च) जेव्हा केव्हा (स्तोता) स्तोता (मर्त्यः) माणूस (मीढुषे) मेघाप्रमाणे ऐश्वर्याची वृष्टी करणाऱ्या परमैश्वर्यशाली परमेश्वराला अनुकूल करून घेण्यासाठी (जरेत) त्याची अर्चना करील (आत इत्) त्यानंतर त्याने (स्तोत्याने) (विव्रतानाम्) व्रत- रहित लोकांना (धर्तारम्) कर्म- पाशाने बांधून टाकणाऱ्या (वरुणम्) कर्माप्रमाणे फळ देऊन पापापासून वाचविणाऱ्या वरुण परमेश्वराची देखील (विपा) मेधायुक्त (गिरा) वाणीने (वन्देत) वंदना अवश्य करावी. ।। ६।।

भावार्थ - इंद्र व वरुण दोन्ही परमेश्वराचीच नावे आहेत. इंद्र नावाने त्याचे परमैश्वर्यत्व आणि ऐश्वर्य वर्षकत्व व्यक्त होत आहे, तर वरुण नावाने तो पाशधारी आहे. कर्म-पाशाने बांधून जिवाला दंड देऊन तो पाप निवारण करतो, हा अर्थही सूचित होत आहे. परमेश्वराच्या या दोन्ही स्वरूपांचे चिंतन, स्मरण केल्यामुळे आणि सदा त्याचे ते स्वरूप समोर ठेवल्यामुळे मनुष्य जीवनात सन्मार्गागामी ह्तो आणि नेहमी यशस्वी होतो. ऐश्वर्य प्राप्त झाल्यामुळे माणूस कुमार्गगामी होऊ नये, यासाठी परमेश्वराच्या वरु रूपाचेही स्मरण सदा ठेवले पाहिजे. ।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top