Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 305
ऋषिः - अश्विनौ वैवस्वतौ
देवता - अश्विनौ
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
कु꣢ष्ठः꣣ को꣡ वा꣢मश्विना तपा꣣नो꣡ दे꣢वा꣣ म꣡र्त्यः꣢ । घ्न꣣ता꣡ वा꣢मश्न꣣या꣡ क्षप꣢꣯माणो꣣ꣳशु꣢ने꣣त्थ꣢मु꣣ आ꣢द्व꣣न्य꣡था꣢ ॥३०५
स्वर सहित पद पाठकु꣢ । स्थः꣣ । कः꣢ । वा꣣म् । अश्विना । तपानः꣢ । दे꣢वा । म꣡र्त्यः꣢꣯ । घ्न꣣ता꣢ । वा꣣म् । अश्नया꣢ । क्ष꣡प꣢꣯माणः । अं꣣ऽशु꣡ना꣢ । इ꣣त्थ꣢म् । उ꣣ । आ꣢त् । उ꣣ । अन्य꣡था꣢ । अ꣣न् । य꣡था꣢꣯ ॥३०५॥
स्वर रहित मन्त्र
कुष्ठः को वामश्विना तपानो देवा मर्त्यः । घ्नता वामश्नया क्षपमाणोꣳशुनेत्थमु आद्वन्यथा ॥३०५
स्वर रहित पद पाठ
कु । स्थः । कः । वाम् । अश्विना । तपानः । देवा । मर्त्यः । घ्नता । वाम् । अश्नया । क्षपमाणः । अंऽशुना । इत्थम् । उ । आत् । उ । अन्यथा । अन् । यथा ॥३०५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 305
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - अश्विनौ का संत्पत वा रूष्ट होतात ?
शब्दार्थ -
हे (देवा) दान आदी गुणांनी युक्त, तेजामुले प्रकाशवंत (अश्विना) परमात्मा- जीवात्मा आणि अध्यापक - उपदेशकहो, (युवाम्) तुम्ही (कु) (स्थ) कुठे आहात ? (कः मर्त्यः) कोण माणूस (वाम्) तुम्हाला संतप्त करणारा आहे ?तुम्ही कुठे आहात ? आम्हाला प्रेरणा, शिक्षण वा उपदेश वा करीत नाहीत ? आमच्यावर रागावला आहात का ? तुमच्या रोषाचे काय कारण आहे ? पुढे उपासक /शिष्य स्वतःच उत्तर देतो -
प्रथम अर्थ (जीवात्मा परमात्मापर) - (अश्वया) मनात व्याप्त (वाम् घ्नता) तुमच्यापर्यंत येणारा (अंथुना) ज्ञान, कर्म, क्षद्धारूप सोमरसापासून (क्षपमाणः) तुम्हाला वंचित करणारा माणूसच तुमचा संतापक आहे. (जो तुमची भक्ती वा जो मनन- चिंतन करीत नाहीत तोच तुमचा विरोधक आहे.) द्वितीय अर्थ - (अध्यापन- उपदेशकपर) - तुम्ही (अश्नया) भुकेमुळे (घ्नता) व्याकूळ असताना जो (वाम्) तुम्हाला (अंशुना) भोजन, वस्त्र, वेतन आदी देयांशापासून श्रक्षपमाणः) वंचित ठेवणारा मनुष्य आहे, तोच तुमचा संतापक आहे. (पुढे उभयपक्षी) - (इत्थम् उ) असेच आहे ना ? (अत् उ) अथवा (अन्यथा) तुमच्या संतापाचे वा रोषाचे अन्य कोणते तरी कारण आहे ?सारांश - यापेक्षा इतर कोणते कारण असूच शकत नाही.।। ३।।
भावार्थ - परमात्मा- जीवात्मारूप अश्वी मनुष्याच्या हृदयात सदा उपस्थित असतात. जो माणूस त्यांना ज्ञान, कर्म, श्रद्धा, भक्ती आदींचा सोमरस यथोचित रूपाने अर्पित करतो, त्याला ते सदैव स्प्रेरणा देत असतात, पण जो कुणी त्यांची उपेक्षा करतो, त्यास ते कष्ट असल्याप्रमाणे होतात. तसेच शिक्षण आणि उपदेश देऊन सर्वांवर उपकार करणाऱ्या अध्यापक- उपदेशकांना जो दक्षिणारूपेण भोजन, वस्त्र आदी देत नाही अथवा त्यांना योग्य वेतन देत नाही, असा माणूस त्यांचा अपराधी जाणावा.।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे ।। ३।।