Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 337
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

यं꣢ वृ꣣त्रे꣡षु꣢ क्षि꣣त꣢य꣣ स्प꣡र्ध꣢माना꣣ यं꣢ यु꣣क्ते꣡षु꣢ तु꣣र꣡य꣢न्तो ह꣡व꣢न्ते । य꣡ꣳ शूर꣢꣯सातौ꣣ य꣢म꣣पा꣡मुप꣢꣯ज्म꣣न्यं꣡ विप्रा꣢꣯सो वा꣣ज꣡य꣢न्ते꣣ स꣡ इन्द्रः꣢꣯ ॥३३७

स्वर सहित पद पाठ

य꣢म् । वृ꣣त्रे꣡षु꣢ । क्षि꣣त꣡यः꣣ । स्प꣡र्ध꣢꣯मानाः । यम् । यु꣣क्ते꣡षु꣢ । तु꣣र꣡य꣢न्तः । ह꣡व꣢꣯न्ते । यम् । शू꣡र꣢꣯सातौ । शू꣡र꣢꣯ । सा꣣तौ । य꣢म् । अ꣣पा꣢म् । उ꣡प꣢꣯ज्मन् । उ꣡प꣢꣯ । ज्म꣣न् । य꣢म् । वि꣡प्रा꣢꣯सः । वि । प्रा꣣सः । वाज꣡य꣢न्ते । सः । इ꣡न्द्रः꣢꣯ ॥३३७॥


स्वर रहित मन्त्र

यं वृत्रेषु क्षितय स्पर्धमाना यं युक्तेषु तुरयन्तो हवन्ते । यꣳ शूरसातौ यमपामुपज्मन्यं विप्रासो वाजयन्ते स इन्द्रः ॥३३७


स्वर रहित पद पाठ

यम् । वृत्रेषु । क्षितयः । स्पर्धमानाः । यम् । युक्तेषु । तुरयन्तः । हवन्ते । यम् । शूरसातौ । शूर । सातौ । यम् । अपाम् । उपज्मन् । उप । ज्मन् । यम् । विप्रासः । वि । प्रासः । वाजयन्ते । सः । इन्द्रः ॥३३७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 337
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) ( राजापर अर्थ) - (वृत्रेषु) अविद्या, भ्रष्टाचार, दुचाराच वाढल्यानंतर (स्पर्धमानाः) त्यावर विजय मिळविण्याकरिता (क्षितयः) प्रजाजन (यं हवन्ते) ज्या जननायकाला हाक मारतात, तसेच तेच प्रजानन (मुक्तेषु) महान कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी (तरयन्तः) कार्यसिद्धीसाठी त्वरा करीत (यं हवन्ते) ज्या कार्यसाधकाला बोलावतात त्याचप्रकारे (शूरस्तवौ) शूर ज्यात विजय प्राप्त करण्यासाठी यत्न करतात, त्या युद्धामध्ये (यं हवन्ते) वीरजन ज्या वीरश्रेष्ठाला पुकारतात (अपाम्) तसेच सरोवर, कालवे आदींच्या (उपज्मन्) निर्माणासाठी (यं हवन्ते) प्रजाजन (वा अभियंता, कृषकजन) ज्या राष्ट्र निर्मात्याला हाक मारतात, तसेच (विप्रासः) ज्ञानी ब्राह्मण (यं वाजयन्ते) ज्याला परामर्श वा मंत्रणा देऊन शक्तिशाली करतात, (सः) दुःखविदारक, सुखदाता राजा इंद्र आहे. (त्याचेच नाव वा पद इंद्र असे आहे.) ।। द्वितीय अर्थ - (परमात्मपर अर्थ) (वृत्रेषु) योग साधनेच्या मार्गात व्याधी, स्त्यान (दुर्लक्ष), संशय, प्रमाद, आलस्य आदी विघ्ने उपस्थित झाल्यानंतर (स्पर्धमानाः) त्या विघ्नांवर विजय प्राप्त करण्यासाठी इच्छा बाळगणारे योगीजन (यं हवन्ते) साह्याकरिता ज्याला हाक मारतात, तसेच (युक्तेषु) इंद्रिये, मन, प्राण आदींचा योगासी संयोग झाल्यानंतर (तुरयन्तः) योगसिद्धी प्राप्तीकरिता योगीजन (यं हवन्ते) त्या सिद्धिप्रदात्याला पुकारतात, तसेच (शूरसातौ) आंतरिक देवासुर- संग्रामामध्ये (यं हवन्ते) ज्या विजय प्रदात्याला हाक देतात आणि (अपाम्) प्राणांच्या वर-वरच्या चक्रामध्ये शिरण्यासाठी (यं हवन्ते) ज्या योग सहाय्यकास पाचारण करात आणि (यं) ज्याला (विप्रासः) विद्वान योगीजन (वाजयन्ते) ज्याची अर्चना करतात. (सः) त्या ध्यान- धारणा समाधीद्वारे प्राप्तव्य असलेला परमेश्वराला (इंद्रः) इंद्र म्हणतात. ।। ६।।

भावार्थ - वेदांमध्ये इंद्र नाव अनेक ठिकाणी आले आहे. तो इंद्र कोण आहे ? तो विग्नविदारक, प्रारब्ध कार्यांचा सिद्धिदायक, देवासुर- संग्रामामध्ये विजय प्रदाता, जलधारा प्रवाहित करविणारा आणि ज्ञानीजनांसाठी स्तवनीय असून ब्रह्मांडामध्ये इंद्र म्हणजे परमेश्वर आणि राष्ट्रात राजा याचे नाव इंद्र. त्याची यथोचित उपासना / प्रार्थना / सत्कार करून सर्वांनी अभीष्ट लाभ प्राप्त केले पाहिजेत. ।। ६।। या मंत्रावर भाष्य करताना विवरणकाराने कल्पनेनेच एक इतिहास - कथा रचली आहे. ती अशी की इंद्राचे परम भक्त असल्यामुळे वामदेव ऋषीने इंद्राचे रूप धारण केले. त्यालाच खरा इंद्र समजून असुरगण त्याला ठार करण्यासाठी त्याच्यावर चालून गेले. तेव्हा तो असुरांना म्हणतो - ‘मी इंद्र नाही, मी इंद्र नाही’ प्रस्तुत प्रसंगी ऋषी हा मंत्र म्हणत आहे. अशाच प्रकारचा इतिहास ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलातील १२ व्या सूक्ताविषयीदेखील कल्पिला आहे. गृत्समद ऋषी ङ्गस जनास इंद्रःफ कहकर अथवा वास्तविक रूप बता रहा है। सायण आचार्यांच्या ऋग्वेद भाष्यामध्येही ही कथा उद्घृत आहे. या कथा वा हा इतिहास प्रमाणांवर आधारित नसून केवळ कथाकारांना कल्पनाविलास आहे.।।

इस भाष्य को एडिट करें
Top