Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 380
ऋषिः - कुत्स आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
प्र꣢ म꣣न्दि꣡ने꣢ पितु꣣म꣡द꣢र्च꣣ता व꣢चो꣣ यः꣢ कृ꣣ष्ण꣡ग꣢र्भा नि꣣र꣡ह꣢न्नृ꣣जि꣡श्व꣢ना । अ꣣वस्य꣢वो꣣ वृ꣡ष꣢णं꣣ व꣡ज्र꣢दक्षिणं म꣣रु꣡त्व꣢न्तꣳ स꣣ख्या꣡य꣢ हुवेमहि ॥३८०॥
स्वर सहित पद पाठप्रं꣢ । म꣣न्दि꣡ने꣢ । पि꣣तुम꣢त् । अ꣣र्चत । व꣡चः꣢꣯ । यः । कृ꣣ष्ण꣡ग꣢र्भाः । कृ꣣ष्ण꣢ । ग꣣र्भाः । निर꣡ह꣢न् । निः꣣ । अ꣡ह꣢꣯न् । ऋ꣣जि꣡श्व꣢ना । अ꣣वस्य꣡वः꣢ । वृ꣡ष꣢꣯णम् । व꣡ज्र꣢꣯दक्षिणम् । व꣡ज्र꣢꣯ । द꣣क्षिणम् । मरु꣡त्व꣢न्तम् । स꣣ख्या꣡य꣢ । स꣣ । ख्या꣡य꣢꣯ । हु꣣वेमहि ॥३८०॥
स्वर रहित मन्त्र
प्र मन्दिने पितुमदर्चता वचो यः कृष्णगर्भा निरहन्नृजिश्वना । अवस्यवो वृषणं वज्रदक्षिणं मरुत्वन्तꣳ सख्याय हुवेमहि ॥३८०॥
स्वर रहित पद पाठ
प्रं । मन्दिने । पितुमत् । अर्चत । वचः । यः । कृष्णगर्भाः । कृष्ण । गर्भाः । निरहन् । निः । अहन् । ऋजिश्वना । अवस्यवः । वृषणम् । वज्रदक्षिणम् । वज्र । दक्षिणम् । मरुत्वन्तम् । सख्याय । स । ख्याय । हुवेमहि ॥३८०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 380
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - परमेश्वराच्या आणि आचार्याच्या गुण - कर्मांने वर्णन
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) हे मनुष्यानो, तुम्ही (मन्दिने) आनंदमय व आनंद प्रदाता इंद्र जगदीश्वराकडे (पितुमत्) अऩातील श्रद्धारूप रसाने भरलेली (वचः) स्तुतिवचने (प्र अर्चत) पाठवा (यः) तो जगदीश्वर (ऋजिश्वजा) सरळ जाणाऱ्या किरणे असलेला सूर्याच्या माध्यमातून (कृष्णगर्भाः) अंधाऱ्या रात्री (निरहन्) नष्ट करतो. तेव्हा लोकहो, या (अवस्यवः) रक्षणाची इच्छा करणारे आम्ही व तुम्ही (वृषणम्) मेघाद्वारे पाऊस पाडणाऱ्या अथवा सुखाची वृष्टी करणाऱ्या (वज्रदक्षिणम्) आणि ज्याचे न्याय व्यवस्था त्याचा प्रताप अधिकच वाढवते, अशा (मरुत्वसम्) प्रशस्त प्राणवान इंद्र परमेश्वराच्या (सख्याय) मैत्रीसाठी त्याला (हुवेमहि) हाक मारू या.।।
द्वितीय अर्थ - (गुरू- शिष्यपर) हे सहाध्यायी मित्रहो, तुम्ही (मन्दिने) आनंददाता आणि विद्यारूप ऐश्वर्याने संपन्न आचार्यसाठी (पितुमत्) उत्कृष्ट अन्न (आणा) व (वचः) आदरयुक्त वचन (प्र अर्चत) उच्चारा. (यः) तो आचार्य (ऋविश्वना) सरल शिक्षण पद्धतीद्वारे (कृष्णगर्भाः) ज्यांच्या गर्भात काळे अज्ञान लपलेले आहे, अशा अविद्यारूप रात्रीद्वनां (निरहन्) विनष्ट करतो. (अवत्मवः) विद्येने तृप्ती इच्छिणारे आम्ही - तुम्ही (वृषणम्) सद्गुण - वर्षक आणि (वज्रदक्षिणम्) ज्याचे विद्यादान कुमार्गापासून परावृत्त करणारा आहे, अशा (मरुत्वन्तम्) विद्या यज्ञाचे, ऋत्विज प्रशस्त विद्वान अध्यापक ज्यांच्याकडे आहेत, अशा आचार्याच्या (सख्याय) मैत्रीसाठी (हुवेमहि) त्यांचा स्वीकार करू या.।। ११।।
भावार्थ - हे बांधवांनो, पहा, परमेश्वर आमच्याशी मैत्रीचा निर्वाह कसा करतो ? सर्वत्र व्यापलेल्या रात्रीच्या अंधकाराला दूर करण्याचे व आणि वृष्टी करणे असी कामे करण्याचे सामर्थ्य आत्मच्यासारख्यांजवळ आहे का ? तोच परमेश्वर आम्हांवर उपकार करण्यासाठी म्हणून वरील प्रकारची अनेक कार्ये करीत आहे आणि तेही काही शुल्क न आकारता. आमच्याप्रत गुरूदेखील कसा मोठा उपकार करीत आहे, हे पहा. जो समस्त अविद्या - रात्री दूर करून ज्ञानरूप यावसाद्वारे आमची हृदय- भूमी सरस करीत असतो. यामुळे आम्ही सर्वात्मना परमेश्वराचे व गुरूचे पूजन व सत्कार केला पाहिजे. ।। १।। या मंत्रावर भरत स्वामीने हा इतिहास लिहिला आहे - ही गर्भस्राविणी उपनिषद आहे. कृष्ण नावाचा एक असुर होता. कृष्णाकडून गर्भधारणा झालेल्या त्याच्या बायकांना इंद्राने ठार केले. यासाठी की त्यांच्या गर्भातील संतती संपावी. ऋजिश्वा नावाचा एक राजर्षी कृष्णासुराचा शत्रू होता. त्याच्या मदतीसाठी म्हणून इंद्राने कृष्णासुरालाही ठार केले आणि त्याच्यापासून त्याच्या बायकांच्या पोटी जन्मणारे पुक्षही जन्मा येऊ नये म्हणून इंद्राने गर्बवती बायकांचाही वध केला. सायणाचार्यानेही आपल्या भाष्यात असाच त्तिहास दाखविला आहे, पण हे सर्व केवळ कल्पना- प्रसूत असून या कथेत इंच मात्रही तथ्य नाही. श्री सत्यव्रत सामश्रमी यांनी सायणाच्या भाष्याविषयी अरुची दाखविताना असे लिहेल आहे, ‘‘येथे विवरणकाराची केलेली व्याख्या वा विवेचन अधिक चांगले आहे. कारण की त्याने मंत्राचा आधि दैनिक अर्ध करताना लिहिले आहे की ‘कृष्णगर्भाः’ म्हणजे कृष्ण मेघात असणारे पाणी, इंद्र ते पाणी मेघांतून काढून खाली फेकतो. ‘विरहन्’ या शब्दात हन् धातू अन्तर्णीतण्यर्थ आहे, ज्याचा अर्थ आहे - काढणे वा खाली फेकणे.’’ या दशतीमध्ये इंद्राचा महिमा, त्याचे स्तोत्रगान करण्यासाटी प्रेरणा, द्यावा - पृथिवी यांचे इंद्राच्याच भियमाने धृत असणे, तसेच इंद्र नावाने राजाच्या कर्तव्याचे वर्णन हे विषय आहेत. करिता या दशतीच्या विषयांचा पूर्व दशतीच्या विषयांशी संगती आहे, असे जाणावे.।। चतुर्थ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची चतुर्थ दशती समाप्त. चतुर्थ अध्यायाचा तृतीय खंड समाप्त.
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।