Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 401
ऋषिः - सौभरि: काण्व:
देवता - मरुतः
छन्दः - ककुप्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
आ꣡ ग꣢न्ता꣣ मा꣡ रि꣢षण्यत꣣ प्र꣡स्था꣢वानो꣣ मा꣡प꣢ स्थात समन्यवः । दृ꣣ढा꣡ चि꣢द्यमयिष्णवः ॥४०१॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । ग꣣न्ता । मा꣢ । रि꣣षण्यत । प्र꣡स्था꣢꣯वानः । प्र । स्था꣣वानः । मा꣢ । अ꣡प꣢꣯ । स्था꣣त । समन्यवः । स । मन्यवः । दृढा꣢ । चि꣣त् । यमयिष्णवः ॥४०१॥
स्वर रहित मन्त्र
आ गन्ता मा रिषण्यत प्रस्थावानो माप स्थात समन्यवः । दृढा चिद्यमयिष्णवः ॥४०१॥
स्वर रहित पद पाठ
आ । गन्ता । मा । रिषण्यत । प्रस्थावानः । प्र । स्थावानः । मा । अप । स्थात । समन्यवः । स । मन्यवः । दृढा । चित् । यमयिष्णवः ॥४०१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 401
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - मरुतः (अने मरुत) देवता। त्यांना संबोधित केले आहे.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सैनिकपर) - राष्ट्रावर युद्धाचे संकट (शत्रूचे आक्रमण) उभे राहिले आहे, अशा प्रसंगी राष्ट्र सैनिकांना आवाहन केले जात आहे. हे (प्रस्थावानः) रणक्षेत्राकडे प्रस्थान करणाऱ्या सैनिकहो, तुम्ही शत्रूविरुद्ध युद्ध करण्यासाटी (आ गन्त) या, तत्पर व्हा. वेळेवर न येऊन (मा रिषण्यत) राष्ट्राची हानी होऊ देऊ नका. हे (समन्यवः) मन्युवान (उत्साही, वीर व क्रोधाने ज्वलि) सैनिकहो, (दृढा चित्) दृढ व बलशाली शत्रुदलालाही (यमयिष्णवः) रोकण्यात समर्थ असलेल्या वीरजनहो, तुम्ही (मा अपस्यात्) युद्धापासून दूर जाऊ नका.।।
द्वितीय अर्थ - (प्राणपर अर्थ) - पूरक, कुम्भक - रेचक आदींच्या पद्धतीने प्राणायामाचा अभ्यास करणारा एक योगसाधक आपल्या प्राणांना उद्देशून म्हणत आहे - हे (प्रस्थावानः) प्राणायामासाठी तत्पर माझ्या प्राणांनो, तुम्ही (आ गन्त) रेचक प्राणायामाने बाहेर जाऊन पूरक प्राणायामाद्वारे पुन्हा आत या (मा रिषण्यात) माझ्या स्वास्थ्याची हानी करू नका. हे (समन्वयः) तेजस्वी प्राणांनो, (दृढा चित्) रोग, मालिन्य आदी दोष दृढतेने शरीरात जडलेले असतील, त्यांना (यमयिष्णवः) दूर करण्यात समर्थ असलेल्या हे प्राणांनो, तुम्ही (मा अपस्यात्) शरीराच्या बाहेरच थांबू नका, तर पूरक, कुंभक, रेचक, स्तम्भवृत्ती आदी व्यापारांद्वारे प्राणसिद्धी करण्यात माझे साह्य करा. तात्पर्य हे की आम्ही प्राणयामापासून विरत न होता नियमितपणे त्याचा अभ्यास करावा. प्रकाश अडविणारे आवरण दूर करून, धारणा, मनोनिग्रह आदी स्थिती साध्य करावी. ।। ३।।
भावार्थ - शत्रूने जर राष्ट्रावर आक्रमण केले, तर वीर योद्धा सैनिकांचे कर्तव्य आहे की त्यानी शत्रूला इतःस्ततः पळवून लावावे अथवा ठार करावे आणि अशा प्रकारे राष्ट्राची कर्ती दिग्दिगन्तापर्यंत विस्तारावी. अशाच प्रकारे शरीरावर रोग, मालिन्य आदी दोषांनी आक्रमण केले, तर पूरक, कुंभक आदी प्राणायाम क्रमाक्रमाने करून शरीर - प्रकृती सुधारावी आणि दीर्घायू व्हावे. ।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ३।।