Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 440
ऋषिः - त्रसदस्युः
देवता - इन्द्रः
छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
अ꣡न꣢वस्ते꣣ र꣢थ꣣म꣡श्वा꣢य तक्षु꣣स्त्व꣢ष्टा꣣ व꣡ज्रं꣢ पुरुहूत द्यु꣣म꣡न्त꣢म् ॥४४०॥
स्वर सहित पद पाठअ꣡न꣢꣯वः । ते꣣ । र꣡थ꣢꣯म् । अ꣡श्वा꣢꣯य । त꣣क्षुः । त्व꣡ष्टा꣢꣯ । व꣡ज्र꣢꣯म् । पु꣣रुहूत । पुरु । हूत । द्युम꣡न्त꣢म् ॥४४०॥
स्वर रहित मन्त्र
अनवस्ते रथमश्वाय तक्षुस्त्वष्टा वज्रं पुरुहूत द्युमन्तम् ॥४४०॥
स्वर रहित पद पाठ
अनवः । ते । रथम् । अश्वाय । तक्षुः । त्वष्टा । वज्रम् । पुरुहूत । पुरु । हूत । द्युमन्तम् ॥४४०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 440
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - इंद्राच्या रथाचे आणि वज्राचे निर्माण - याविषयी
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (जीवात्मापर) हे (पुरुहूत) अनेकांनाद्वारे ज्याचे गुण संकीर्तन केले जात आहे. अशा हे जीवात्मा, (ते) तुझ्यासाठी (अनवः) प्राण (अश्वाय) शीघ्रमयनाकरिता (रथम्) शरीररूप रथ (तक्षुः) तयार करतात (त्वष्टा) जगाचा निर्माता तो शिल्पी परमेश्वर (घुमन्तम्) तेजोमय (वज्रम्) वाणीरू वज्राची निर्मिती करतो. त्या यशोमय शरीर- रथावर आरूढ होऊन जीवन गायन करीत तू वाणीरूप वज्राने पाखंडीजनांचे खंड कर.।।
द्वितीय अर्थ (राजापर) - हे (पुरुहूत) अनेक प्रजाजनांद्वारे सत्कार स्वीकारणाऱ्या असीम ऐश्वर्यवान राजा, (ते) तुमच्यासाठी (अनवः) शिल्पीजनांनी (कारागीर वा वाहन उत्पादकानी) (अश्वाय) लवकर प्रवास करण्यासाठी तसेच (रथम्) यात्रेसाठी व युद्धासठी उपयुक्त अशा भूमी, जल व आकाशात चालणाऱ्या वाहनांची (तक्षुः) निर्मिती करावी. (त्वष्टा) शस्त्रास्त्र - निर्माता शिल्पीजनांनी (द्युमन्तम्) चमचमणाऱ्या (वज्रम्) शस्त्रास्त्र समूहांची रचना करावी. अशा प्रकारे रथ, शस्त्रास्त्र आदी युद्योपयोगी साधनांचे उत्पादन निर्माण करून हे राजा, तुम्ही शत्रूंना पराजित करा व प्रजेला सुख द्या.।। ४।।
भावार्थ - जसे जीवात्मा शरीर रथावर स्वार होऊन वाणीरूप वज्राने कुतर्क वाद विवादांचे खंडन करतो व सत्य - पत्राचे रक्षण करतो. तद्वत राजाने भूयाम, जलयान आणि अंतरिक्ष यानात बसून वज्राने शत्रूंचा उच्छेद करावा. अशा प्रकारे राष्ट्राची रक्षा करावी.।। ४।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे.।। ४।।