Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 461
ऋषिः - परुच्छेपो दैवोदासिः देवता - विश्वेदेवाः छन्दः - अत्यष्टिः स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣢स्तु꣣ श्रौ꣡ष꣢ट्पु꣣रो꣢ अ꣣ग्निं꣢ धि꣣या꣡ द꣢ध꣣ आ꣡ नु त्यच्छर्धो꣢꣯ दि꣣व्यं꣡ वृ꣢णीमह इन्द्रवा꣣यू꣡ वृ꣢णीमहे । य꣡द्ध꣢ क्रा꣣णा꣢ वि꣣व꣢स्व꣢ते꣣ ना꣡भा꣢ स꣣न्दा꣢य꣣ न꣡व्य꣢से । अ꣢ध꣣ प्र꣢ नू꣣न꣡मुप꣢꣯ यन्ति धी꣣त꣡यो꣢ दे꣣वा꣢꣫ꣳअच्छा꣣ न꣢ धी꣣त꣡यः꣢ ॥४६१॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡स्तु꣢꣯ । श्रौ꣡ष꣢꣯ट् । पु꣣रः꣢ । अ꣣ग्नि꣢म् । धि꣣या꣢ । द꣣धे । आ꣢ । नु । त्यत् । श꣡र्धः꣢꣯ । दि꣣व्य꣢म् । वृ꣣णीमहे । इन्द्रवायू꣢ । इ꣣न्द्र । वायू꣡इति꣢ । वृ꣣णीमहे । य꣢त् । ह꣣ । क्राणा꣢ । वि꣣व꣡स्व꣢ते । वि꣣ । व꣡स्व꣢꣯ते । ना꣡भा꣢꣯ । स꣣न्दा꣡य꣢ । स꣣म् । दा꣡य꣢꣯ । न꣡व्य꣢꣯से । अ꣡ध꣢꣯ । प्र । नू꣣न꣢म् । उ꣡प꣢꣯ । य꣣न्ति । धीत꣡यः꣢ । दे꣡वा꣢न् । अ꣡च्छ꣢꣯ । न । धी꣣त꣡यः꣢ ॥४६१॥


स्वर रहित मन्त्र

अस्तु श्रौषट्पुरो अग्निं धिया दध आ नु त्यच्छर्धो दिव्यं वृणीमह इन्द्रवायू वृणीमहे । यद्ध क्राणा विवस्वते नाभा सन्दाय नव्यसे । अध प्र नूनमुप यन्ति धीतयो देवाꣳअच्छा न धीतयः ॥४६१॥


स्वर रहित पद पाठ

अस्तु । श्रौषट् । पुरः । अग्निम् । धिया । दधे । आ । नु । त्यत् । शर्धः । दिव्यम् । वृणीमहे । इन्द्रवायू । इन्द्र । वायूइति । वृणीमहे । यत् । ह । क्राणा । विवस्वते । वि । वस्वते । नाभा । सन्दाय । सम् । दाय । नव्यसे । अध । प्र । नूनम् । उप । यन्ति । धीतयः । देवान् । अच्छ । न । धीतयः ॥४६१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 461
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्म पक्ष) - (अस्तु श्रौषट्) आमची प्रार्थना ऐकली जावी म्हणजे आमची प्रार्थना पूर्ण व्हावी (असे मी इच्छितो). मी (अग्निम्)अग्रनायक परमेश्वराला (पुरः दधे) समोर स्थापित करतो. आम्ही सर्व जण (त्यत्) त्या अति उपयोगी (दिव्यं शर्धः) प्रकाशपूर्ण आत्मशक्तीचा (तु) शीघ्र (आवृणीमहे) उपयोग करतो. आम्ही (इन्द्र वायू) मनाचा आणि प्राणशक्तीचा (वृणीमहे) उपयोग करतो. (यत् ह) जेव्हा ते मन व प्राण (नाभा) केंद्रीभूत हृदय प्रदेशात (सन्दाय) स्वतःला बांधून घेतात व (नव्यसे) अतिशय प्रशंसनीय (विवस्वते) अज्ञान - अंधकार - निवारक आत्म्यासाठी (क्राणा) उच्च संकल्प, प्राणवशीकरण आदी कर्मे करतात, (अध) तेव्हा (नूनम्) अवश्यमेव (धीतयः) धारणा, ध्यान, समाधी या स्थिती (उप प्रयन्ति) योगी मनुष्याजवळ येतात. (न) ज्याप्रमाणे (धीतयः) अंगुली (देवान् अच्छ) माता, पिता, अतिथी आदी विद्वानांना ‘नमस्ते’ करण्यासाठी (उप प्रयन्ति) तत्पर होतात (त्याप्रमाणे योगी मनुष्याला समाधी आदी स्थिती प्राप्त होतात.)।। द्वितीय अर्थ - (आधिदैवत - पक्ष) - (अस्तु श्रौषट्) माझे म्हणणे ऐकले जावे (लक्ष देऊन ऐकावे, म्हणजे वाया जाऊ नये) मी (अग्निम्) भौतिक (घिवा) मोठ्या कल्पकतेने वा बुद्धीने (पुरः दधे) शिल्प, यंत्र आदी कार्यात उपयोग करतो. आम्ही सर्वजण (त्यत्) त्या (दिव्यम्) द्युलोकात असणाऱ्या (शर्धः) शक्तिमान सूर्याचा (सौर शक्तीया) (नु) शीघ्रमेव (आवृणीमहे) शिल्प कर्मात उपयोग करतो. (इन्द्र वायू) आम्ही विजेचा आणि वायूचा (वृणीमहे) उपयोग करतो. (यद् ह) जेव्हा ते विद्युत आणि वायू (नाभा) केंद्रीभूत अंतरिक्षात (सन्दाम) पृथ्वी आदी ग्रहृ- उपग्रहांना आकर्षण शक्तीद्वारे बांधून (नव्यसे) प्रत्येक ऋतूमध्ये नव्या रूपात प्रकट होणाऱ्या (विवस्वते) अंधकार - निवारक सूर्याच्या भोवती (क्राणा) परिक्रमा करतात (अघ) तेव्हा (नूनम्) अवश्यमेव (धीतयः) सूर्यकिरणे (उप प्रयन्ति) त्या पृथ्वी आदी लोकांपर्यंत जातात.।। यापुढे प्रथम अर्थातील वाक्य वाचावे.।। ५।।

भावार्थ - जसे शिल्पविद्येच्या प्रगतीमुळे अग्नी, सूर्य, विद्युत आणि वायू यातील शक्तीचा ऊर्जेचा यंत्र, यान आदीमध्ये योग्य प्रकारे उपयोग करून मनुष्य महान सुख, (समाधान, सोयी आनंद) प्राप्त करू शकतात. तद्वत योगविद्येच्या उन्नतीमुळे जीवात्मा, मन, प्राण व इंद्रिये यांच्या सामंजस्याद्वारे योगसमाधी आणि मोक्ष स्थिती प्राप्त करता येते.।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top