Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 471
ऋषिः - त्रित आप्त्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
ति꣣स्रो꣢꣫ वाच꣣ उ꣡दी꣢रते꣣ गा꣡वो꣢ मिमन्ति धे꣣न꣡वः꣢ । ह꣡रि꣢रेति꣣ क꣡नि꣢क्रदत् ॥४७१॥
स्वर सहित पद पाठति꣣स्रः꣢ । वा꣡चः꣢꣯ । उत् । ई꣣रते । गा꣡वः꣢꣯ । मि꣣मन्ति । धेन꣡वः꣢ । ह꣡रिः꣢꣯ । ए꣣ति । क꣡नि꣢꣯क्रदत् ॥४७१॥
स्वर रहित मन्त्र
तिस्रो वाच उदीरते गावो मिमन्ति धेनवः । हरिरेति कनिक्रदत् ॥४७१॥
स्वर रहित पद पाठ
तिस्रः । वाचः । उत् । ईरते । गावः । मिमन्ति । धेनवः । हरिः । एति । कनिक्रदत् ॥४७१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 471
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - आनंद रसाच्या निर्झराचे वर्णन
शब्दार्थ -
(तिसः वाचः) ऋक्, यजु, साम या रूपाच्या तीन वाणी (उदीरते) उठत आहेत, असे मला (उपासकाला) वाटत आहे. हा अनुभव असा आहे की जणू (धनवः) नव प्रसूता (गावः) गायी (मिमन्ति) आपल्या वासराकडे जाण्यासाठी हंबरत आहे. (हरिः) पापहारी आनंदमय रसाचे सोम रसाचे निर्झर (कनिक्रदत्) झर झर नाद करीत (एति) उपासकांच्या मनोभूमीवर बरसत आहे. (मन त्या आनंदात न्हाऊन निघत आहे. अशा त्या दिव्य आध्यात्मिक अनुभवाचे वर्णन एक उपासक करीत आहे.)।। २।।
भावार्थ - (पहा, केवढे रमणीय दृष्य आहे हे) परमेश्वर- आराधनेत लीन उपासक जन ऋक्, यजु, साम या तीन वाणीचे उच्चारण करीत आहेत, जणू काही आपल्या वासराच्या प्रेमाने गायी हंबरत आहेत. रसनिधी परमेश्वराकडून येणाऱ्या आनंद रसाच्या निर्झरात उपासकांच्या मनोभूमी न्हाऊन निघत आहेत. अहा, केवढे आनंदमय वातावरण आहे हे. (केवढा दिव्य अनुभव घेत आहे उपासक योगी)।। ५।।
विशेष -
या मंत्रात व्यंगोत्प्रेक्षा, स्वभावोक्ती आणि अनुप्रास अलंकार आहेत.।। ५।