Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 486
ऋषिः - असितः काश्यपो देवलो वा
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
प꣢रि꣣ प्रा꣡सि꣢ष्यदत्क꣣विः꣡ सिन्धो꣢꣯रू꣣र्मा꣡वधि꣢꣯ श्रि꣣तः꣢ । का꣣रुं꣡ बिभ्र꣢꣯त्पुरु꣣स्पृ꣡ह꣢म् ॥४८६॥
स्वर सहित पद पाठप꣡रि꣢꣯ । प्र । अ꣣सिष्यदत् । कविः꣢ । सि꣡न्धोः꣢꣯ । ऊ꣣र्मौ꣢ । अधि꣢꣯ । श्रि꣣तः꣢ । का꣣रु꣢म् । बि꣡भ्र꣢꣯त् । पु꣣रुस्पृ꣡ह꣢म् । पुरु । स्पृ꣡ह꣢꣯म् ॥४८६॥
स्वर रहित मन्त्र
परि प्रासिष्यदत्कविः सिन्धोरूर्मावधि श्रितः । कारुं बिभ्रत्पुरुस्पृहम् ॥४८६॥
स्वर रहित पद पाठ
परि । प्र । असिष्यदत् । कविः । सिन्धोः । ऊर्मौ । अधि । श्रितः । कारुम् । बिभ्रत् । पुरुस्पृहम् । पुरु । स्पृहम् ॥४८६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 486
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - सोम परमेश्वरासह आनंद - तरंग रूप झोक्यात जोके घेणे, हा विषय -
शब्दार्थ -
(कविः) वेदकाव्यकर्ता काव्य जनित आनंदाने तरंगित हृदय झालेला सोम परमेश्वर (सिन्दोः) स्वतः आनंद सागराच्या (ऊर्मो) लहरींवर (अधि श्रितः) स्थित होऊन (पुरुस्पृहम्) अतिप्रिय (कारुम्) स्तुतिकर्ता जीवाला (विभ्रत्) आपल्यासह घेत (परि प्रासिष्यदत्) आनंद लहरीवर झोके घेत आहे वा देत आहे.।। १०।।
भावार्थ - या मंत्रात उपासक अशी कल्पना करीत आहे की सच्चिदानंद सागर परमेश्वर त्याचा सहचर जो मी जीवात्मा, त्याचा हात धरून मलाही आनंद सागराच्या लहरींवर जोके घेत आहे. अहा... त्याच्यासह असा आनंद सोहळा मी यापूर्वी कधीही अनुभवलेला नाही. खरंच, मी आज कृतकृत्य झालो आहे. माझे जीवन सफल झाले आहे.।। १०।। या दशतीमध्येदेखील रसागार परमेश्वराचे व तज्जनित आनंद रसाचे वर्णन आहे. त्यामुळे या दशतीतील विषयांसी मागील दशतीच्या वियांचा संबंध आहे.।। पंचम प्रपाठकातील द्वितीय अर्धाची पाचवी दशती समाप्त. पंचम प्रपाठक पूर्ण पंचम अध्यायातील द्वितीय खंड समाप्त.
विशेष -
वास्तविक पाहता निराकार परमेश्वराचा जोके आदी पदार्थांशी काही संबंध नाही, तरी पण या मंत्रात असबन्धात संबंध दाखविला आहे. त्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार आहे.।। १०।।