Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 502
ऋषिः - असितः काश्यपो देवलो वा
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
अ꣡नु꣢ प्र꣣त्ना꣡स꣢ आ꣣य꣡वः꣢ प꣣दं꣡ नवी꣢꣯यो अक्रमुः । रु꣣चे꣡ ज꣢नन्त꣣ सू꣡र्य꣢म् ॥५०२॥
स्वर सहित पद पाठअ꣡नु꣢꣯ । प्र꣣त्ना꣡सः꣢ । आ꣣य꣡वः꣢ । प꣣द꣢꣯म् । न꣡वी꣢꣯यः । अ꣣क्रमुः । रुचे꣢ । ज꣣नन्त । सू꣡र्य꣢꣯म् ॥५०२॥
स्वर रहित मन्त्र
अनु प्रत्नास आयवः पदं नवीयो अक्रमुः । रुचे जनन्त सूर्यम् ॥५०२॥
स्वर रहित पद पाठ
अनु । प्रत्नासः । आयवः । पदम् । नवीयः । अक्रमुः । रुचे । जनन्त । सूर्यम् ॥५०२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 502
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - सोम परमेश्वराच्या साह्याने लोकांना काय काय मिळते, याविषयी -
शब्दार्थ -
सोम परमेश्वराच्या साह्याने (प्रत्नासः) ज्ञानाच्या दृष्टीने पुरातन मनुष्य म्हणजे वयोवृहृजन (नवीयः) नवीनतर (पदम्) राजमंत्री, न्यायाधीश आदी पद अथवा मोक्षपद (अनु अक्रमुः) अनुकूलतेने प्राप्त करतात आणि ते (रूचे) प्रकाशासाठी (सूर्यम्) विद्येच्या वा अध्यात्म्याच्या सूर्याला (जनन्त) प्रकट करतात. (अथवा असा अर्थही होतो की (नवीयः) नवीन तरुण (प्रत्नासः) पुरातन वा महत्त्वाच्या जबाबदारीचे (पदम्) पद प्रयत्नाने प्राप्त करतात आणि (रूचे) यासाठी आपल्यातील प्रकाश, गुण व पात्रता सूर्याप्रमाणे प्रकाशित करतात.)।। ६।।
भावार्थ - परमेश्वराची कृपा व स्वतः केलेला पुरुषार्थ, याद्वारे मनुष्य गण सांसारिक सर्वोच्च पददेखील प्राप्त करू शकतात आणि मोक्षसिद्धीही करू शकतात. शिवाय राष्ट्रात व जगात मनुष्य गण ज्ञान - विज्ञान आणि सदाचार रूप सूर्याचा प्रकाश सर्वत्र विस्तारू शकतात.।। ६।।
विशेष -
या मंत्रातील ‘वृद्धी जीर्ण लोक नवीन पद प्राप्त करतात’ या कथनात नवीन पदाच्या प्राप्तीचे कारण उपस्थित नसतानाही त्याची प्राप्ती दाखविली आहे. त्यामुळे येथे विभावना अलंकार ध्वनित होत आहे. तसेच ‘मनुष्य सूर्याला उत्पन्न करतात’ अध्यात्म - प्रकाश’ वा ‘विद्या - प्रकाश’ उत्पन्न करतात’ असा लक्ष्यार्थ घ्यावा लागत आहे.।। ६।।