Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 53
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - अग्निः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
का꣡य꣢मानो व꣣ना꣢꣫ त्वं यन्मा꣣तॄ꣡रज꣢꣯गन्न꣣पः꣢ । न꣡ तत्ते꣢꣯ अग्ने प्र꣣मृ꣡षे꣢ नि꣣व꣡र्त꣢नं꣣ य꣢द्दू꣣रे꣢꣫ सन्नि꣣हा꣡भुवः꣢ ॥५३॥
स्वर सहित पद पाठका꣡य꣢꣯मानः । व꣣ना꣢ । त्वम् । यत् । मा꣣तॄः꣢ । अ꣡ज꣢꣯गन् । अ꣣पः꣢ । न । तत् । ते꣣ । अग्ने । प्रमृ꣡षे꣢ । प्र꣣ । मृ꣡षे꣢꣯ । नि꣣ । व꣡र्त्त꣢꣯नम् । यत् । दू꣣रे꣢ । दुः꣣ । ए꣢ । सन् । इ꣣ह꣢ । अ꣡भु꣢꣯वः ॥५३॥
स्वर रहित मन्त्र
कायमानो वना त्वं यन्मातॄरजगन्नपः । न तत्ते अग्ने प्रमृषे निवर्तनं यद्दूरे सन्निहाभुवः ॥५३॥
स्वर रहित पद पाठ
कायमानः । वना । त्वम् । यत् । मातॄः । अजगन् । अपः । न । तत् । ते । अग्ने । प्रमृषे । प्र । मृषे । नि । वर्त्तनम् । यत् । दूरे । दुः । ए । सन् । इह । अभुवः ॥५३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 53
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - त्या परमात्म अग्नी हृदयात प्रदीप्त करण्याची इच्छा करणारा उपासक सांगत आहे. -
शब्दार्थ -
हे (अग्ने) प्रकाशक परमात्मरूप अग्नी, (त्वम्) तुम्ही (वना) तुमच्या तीव्र किरणांद्वारे (कायभान:) प्रकट होण्याची इच्छा करीत असूनही अर्थात स्वत: आमच्या आत्म्यात, मन आणि बुद्धीत प्रज्वलित होण्यास इच्छुक आहात. तरीही (मत्) जे (मात: अप:) मातृभूत जलामध्ये (अजगन्) प्रविष्ट झालेले आहात अर्थात जलाने शांत झालेला अग्नी जसा शांत असतो, (तद्वत तुम्ही माझ्या हृदयात शांत वा सुप्त स्थितीत आहात.) (वत्) (ते) तुमची ती वा ही अशी (निवर्तयम्) निवृत्ती म्हणजे माझ्याविषयी औदासीन्य वा असलेली उपेक्षा मी आता (व) (प्रृत्ये) सहन करू शकत नाही. (यत्) कारण असे की, (वूरे मन्) यावेळी तुम्ही माझ्यापासून दूर आहात तरीही पूर्वी (इह) इथे माझ्याजवळ (अभुव:) राहात होता. पण आता तुमच्या त्या तेजोरश्मी आता पूर्वीप्रमाणेच माझ्यात प्रकाशित का होत नाहीत? (तुमच्या या अशा उपेक्षेमुळे मी दु:खी कष्टी झालो आहे. ।।९।।)
भावार्थ - ज्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाला आहे असा (योगी वा उपासक) मनुष्य बेसावधपणामुळे त्या परमेश्वराला विसरला आहे व अशा मन:स्थितीत वरील उद्गार प्रकट करीत आहे. हे देव पूर्वी तुम्ही सदा सर्वदा माझ्या आत्म्यात मन व बुद्धीत प्रदीप्त राहत होता. पण हा आता पाण्याने विझलेल्या अग्नीप्रमाणे शांत झाला आहात. तुमच्याकडून माझी होणारी ही उपेक्षा वा औदासीन्य मला आता असह्य होत आहे. कृपा करून अशी प्रस्तुप्तावस्था त्यागून पूर्वीप्रमाणेच माझ्या हृदयात प्रदीप्त व्हा. ।।९।।
विशेष -
विरोध अलंकार व्यजित आहे, पण वर केलेल्या स्पष्टीकरणामुळे विरोधाचा परिहार झाला आहे. ।।९।।