Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 544
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

अ꣣पा꣢मि꣣वे꣢दू꣣र्म꣣य꣣स्त꣡र्त्तुराणाः꣢ प्र꣡ म꣢नी꣣षा꣡ ई꣢रते꣣ सो꣢म꣣म꣡च्छ꣢ । न꣣मस्य꣢न्ती꣣रु꣡प꣢ च꣣ य꣢न्ति꣣ सं꣡ चाच꣢꣯ विशन्त्युश꣣ती꣢रु꣣श꣡न्त꣢म् ॥५४४॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣पा꣢म् । इ꣣व । इ꣢त् । ऊ꣣र्म꣡यः꣢ । त꣡र्त्तु꣢꣯राणाः । प्र । म꣣नीषाः꣢ । ई꣣रते । सो꣡म꣢꣯म् । अ꣡च्छ꣢꣯ । न꣣मस्य꣡न्तीः꣢ । उ꣡प꣢꣯ । च꣣ । य꣡न्ति꣢꣯ । सम् । च꣣ । आ꣢ । च꣣ । विशन्ति । उशतीः꣢ । उ꣣श꣡न्त꣢म् ॥५४४॥


स्वर रहित मन्त्र

अपामिवेदूर्मयस्तर्त्तुराणाः प्र मनीषा ईरते सोममच्छ । नमस्यन्तीरुप च यन्ति सं चाच विशन्त्युशतीरुशन्तम् ॥५४४॥


स्वर रहित पद पाठ

अपाम् । इव । इत् । ऊर्मयः । तर्त्तुराणाः । प्र । मनीषाः । ईरते । सोमम् । अच्छ । नमस्यन्तीः । उप । च । यन्ति । सम् । च । आ । च । विशन्ति । उशतीः । उशन्तम् ॥५४४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 544
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
(अपाम्) जलाच्या (ऊर्मयः) लहरी (इव) प्रमाणे (वर्तुराणाः) अत्यंत वेगाने उठणाऱ्या (मनीषा) माझ्या (मज उपासकाच्या) बुद्धी - प्रवृत्ती (इत्) अवश्यमेव (सोमम् अच्छ) रस भंडार परमेश्वराकडे (प्र ईरते) प्रकृष्ठ रूपेण जातआहेत. (नमस्यन्तीः) परमेश्वराला नमस्कार करीत त्या प्रवृत्ती (उपयन्ति च) एकमेकाजवळ जातात. (सं यन्तिच) एकमेकात मिसळतात आणि (उशतीः) परमेश्वराशी प्रीती करीत त्या (उशन्तम्) प्रेम करणाऱ्या परमेश्वरात (आ विशन्तिच) प्रविष्ट होतात.।। १२।।

भावार्थ - ज्याप्रमाणे नदी - जलाच्या लहरी कुठे उंच तर कुठे कमी उंच होत, कुठे एकमेकाच्या जवळ जात, कुठे एकमेकात मिसळत एक अत्यंत दीर्घ यात्रामार्ग आक्रमित शेवटी समुद्रात प्रविष्ट होतात. तद्वत स्तोत्याच्या बुद्धी - प्रवृत्ती कधी एकमेकाशी सान्निध्य घेत, मिसळत परमेश्वराकडे जातात आणि शेवटी त्यातच लीन होतात. ।।१२।। या दशतीमध्ये परमात्म रूप सोमाचे सेनापती रूपात तर कधी आंद धारा प्रविाहत करणाऱ्या रूपात, कधी पापनाशकाच्या रूपात तर कधी ज्योती उत्पन्न करणाऱ्याच्या रूपाने त्याचे वर्णन केले असल्यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांशी संगती आहे, असे जाणावे.।। षष्ठ प्रपाठकातील प्रथम अर्धाची पाचवी दशती समाप्त. पंचम अध्यायातील सप्तम खंड समाप्त. द्वितीय अर्ध

इस भाष्य को एडिट करें
Top