Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 564
ऋषिः - गृत्समदः शौनकः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
अ꣣ञ्ज꣢ते꣣꣬ व्य꣢꣯ञ्जते꣣ स꣡म꣢ञ्जते꣣ क्र꣡तु꣢ꣳ रिहन्ति꣣ म꣢ध्वा꣣꣬भ्य꣢꣯ञ्जते । सि꣡न्धो꣢रुऽच्छ्वा꣣से꣢ प꣣त꣡य꣢न्तमु꣣क्ष꣡ण꣢ꣳ हिरण्यपा꣣वाः꣢ प꣣शु꣢म꣣प्सु꣡ गृ꣢भ्णते ॥५६४॥
स्वर सहित पद पाठअ꣣ञ्ज꣡ते꣢ । वि । अ꣣ञ्जते । स꣢म् । अ꣣ञ्जते । क्र꣡तु꣢꣯म् । रि꣣हन्ति । म꣡ध्वा꣢꣯ । अ꣣भि꣢ । अ꣣ञ्जते । सि꣡न्धोः꣢꣯ । उ꣣च्छ्वासे꣢ । उ꣣त् । श्वासे꣢ । प꣣त꣡य꣢न्तम् । उ꣣क्ष꣡ण꣢म् । हि꣣रण्यपावाः꣢ । हि꣣रण्य । पावाः꣢ । प꣣शु꣢म् । अ꣣प्सु꣢ । गृ꣣भ्णते ॥५६४॥
स्वर रहित मन्त्र
अञ्जते व्यञ्जते समञ्जते क्रतुꣳ रिहन्ति मध्वाभ्यञ्जते । सिन्धोरुऽच्छ्वासे पतयन्तमुक्षणꣳ हिरण्यपावाः पशुमप्सु गृभ्णते ॥५६४॥
स्वर रहित पद पाठ
अञ्जते । वि । अञ्जते । सम् । अञ्जते । क्रतुम् । रिहन्ति । मध्वा । अभि । अञ्जते । सिन्धोः । उच्छ्वासे । उत् । श्वासे । पतयन्तम् । उक्षणम् । हिरण्यपावाः । हिरण्य । पावाः । पशुम् । अप्सु । गृभ्णते ॥५६४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 564
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - विद्वानांची कर्तव्य-कर्में
शब्दार्थ -
उपासकगण (क्रतुम्) कर्मनान आणि प्रज्ञानान परमात्मरुप सोम याला (अज्जुते) आपल्या हृदयात प्रगट करतात (व्यज्जुते) विविध रूपात त्याला व्यक्त करतात (अनुभवतात) समज्जुते) त्यासह संगम करतात (रिहन्ति) त्याचा आस्वाद घेतात म्हणजे त्यापासून प्राप्त होणाऱ्या आनंद-रस पितात (मध्वा) मधुर श्रद्धारसाने (अभ्युज्जते) जणू काय त्याला लिप्त करतातः (सिन्धो:) आनंद सागराच्या (उच्छवासे) तरंगांवर (पठयन्तम् हेलकावे घेत ते उपासक जणू झोका घेत (उक्षणम्) आपल्या सखा-मित्रांनादेखील त्या रसाने संचित करी (पशुम्) सर्वद्रष्टा वा सर्संजा दृष्टी देणाऱ्या परमेश्वराला त्याच्या (हिरण्यपावाः) ज्योती, सत्य व आनंदामृताने स्वतः पवित्र होणारे ते विद्वजुन (अप्सु) आपल्या प्राणांमधे (गृभ्णते) ग्रहण करतात. ।।११।।
भावार्थ - परमेश्वराचे उपासक योगाजन त्याला हृदयात अभिव्यक्त करून, जणू काय त्याला भक्तिरासाने स्नान घालून आपल्या प्राणांचा एक भागच करून घेतात, तेव्हांच त्यांची उपासना सफल होते.।।११।।
विशेष -
या मंत्रात ‘ज्जुते’ या अर्थहीन शब्दांशाची अनेकवेळा आवृत्ती झाली असल्यामुळे येथे यमक अलंकार आहे. ‘अज्जुते, व्यज्जुते, समज्जुते, रिहन्ति, अभ्यज्जुते, गृभ्णते, या अनेक क्रियांचा एकच कारक असल्यामुळे येथे दीपक अलंकारही आहे. ‘समुद्राच्या उच्छ्वासात उडणाऱ्या तरंगणाऱ्या बैलाला पाण्यात बुडी मारण्यास विवश करतात, त्याला चिक्कण करतात’. या शब्दाचा जो वाच्यार्थ प्रतीत होत आहे, तो खरा नाही- व्यंगार्थ सत्य आहे. आणि तो प्रहेलिका अलंकाराद्वारे व्यक्त होत आहे. ‘अभ्यज्जुते’ (जणू लिप्त करतात) ‘पतयन्तम्’ (जणू झोके घेत) या शब्दा गम्योत्प्रेक्षा आहे. समुद्र अचेतन पदार्थ आहे. तो उच्छ्वास म्हणजे बाहेर श्वास सोडत नाही, म्हणून या वर्णनात तरंग समूहात लक्षणा शक्ती आहे. तरंगांचे अर्ध्वगमन व्यंङ्ग्य आहे.।।११।।