Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 592
ऋषिः - अमहीयुराङ्गिरसः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1

स꣢ न꣣ इ꣡न्द्रा꣢य꣣ य꣡ज्य꣢वे꣣ व꣡रु꣢णाय म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣡त्परि꣢꣯स्रव ॥५९२॥

स्वर सहित पद पाठ

सः꣢ । नः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । य꣡ज्य꣢꣯वे । व꣡रु꣢꣯णाय । म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣢त् । व꣣रिवः । वि꣢त् । प꣡रि꣢꣯स्र꣣व ॥५९२॥


स्वर रहित मन्त्र

स न इन्द्राय यज्यवे वरुणाय मरुद्भ्यः । वरिवोवित्परिस्रव ॥५९२॥


स्वर रहित पद पाठ

सः । नः । इन्द्राय । यज्यवे । वरुणाय । मरुद्भ्यः । वरिवोवित् । वरिवः । वित् । परिस्रव ॥५९२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 592
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्मपर)- हे पनमान सोम अर्थात सर्वोत्पादक, सन्मल ऐश्वर्याधिपती, रसेश्वर, पवित्रतादायक परमेश्वर, (सः) ते जे आपण (नः) आमच्या (यज्यवे) देहरूप यज्ञाचे संचालक आहात, म्हणून (इन्द्राय) माझ्य जीवात्म्यासाठी, (वरूणाय) श्रेष्ठ व संकल्प करणाऱ्या मनासाठी आणि (सरूद्भ्यः) प्राणांसाठी (वरिरोवित्) बलदायक होऊन माझ्या हृदयात (परिस्रव) संचार करा।। द्वितीय पक्ष - (राष्ट्रपर)- हे पवमान सोम अचति सर्व राज्याधिकाऱ्यांना आपापल्या कर्तव्य- कर्मांविषयी प्रेरणा देणारे व त्यांच्यातील दोष, चुका दूर करून पावित्र्य देणारे हे राजा, (सः) ते आपण प्रजाजनांद्वारे राजापदावर अभिषिक्त आहात. आपण (नः) आमच्या (यज्यवे) राष्ट्र-यज्ञाच संचालकासाठी (इन्द्राय) सेनाध्यक्षासाठी (वरूणाय) असल्याचरण करणाऱ्यांना बंधनात टाकणारे कारागार अधिकाऱ्यासाठी आणि (मरूद्भ्यः) योद्धा सैनिकांसाठी (वरिवोखित्) दातव्य वेतन देणारे होऊन (परिस्रव) राष्ट्रात सर्वत्र संचार करा.।।७।।

भावार्थ - परमेश्वराने कृपा करून आमच्या आत्मा, मन, प्राण, इंद्रिये आदीसाठी हे शरीर-राज्य संचलित करण्यासाठी आम्हास शक्ती द्यावी आणि राजाने नियुक्त राज्याधिकाऱ्यांना देव वेतनरूप धन द्यावे. जो राजा सेवकांना योग्य व अधिकृत वेतन देत नाही, त्याचे सेवक त्या अन्यायाविरुद्ध बंड करतात.।।७।।

इस भाष्य को एडिट करें
Top