Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 601
ऋषिः - नृमेधपुरुमेधावाङ्गिरसौ देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0

य꣡ज्जाय꣢꣯था अपूर्व्य꣣ म꣡घ꣢वन्वृत्र꣣ह꣡त्या꣢य । त꣡त्पृ꣢थि꣣वी꣡म꣢प्रथय꣣स्त꣡द꣢स्तभ्ना उ꣣तो꣡ दिव꣢꣯म् ॥६०१॥

स्वर सहित पद पाठ

य꣢त् । जा꣡य꣢꣯थाः । अ꣣पूर्व्य । अ । पूर्व्य । म꣡घ꣢꣯वन् । वृ꣣त्रह꣡त्या꣢य । वृ꣣त्र । हत्या꣢꣯य । तत् । पृ꣣थिवी꣢म् । अ꣣प्रथयः । त꣢त् । अ꣣स्तभ्नाः । उत꣢ । उ꣣ । दि꣡व꣢꣯म् ॥६०१॥


स्वर रहित मन्त्र

यज्जायथा अपूर्व्य मघवन्वृत्रहत्याय । तत्पृथिवीमप्रथयस्तदस्तभ्ना उतो दिवम् ॥६०१॥


स्वर रहित पद पाठ

यत् । जायथाः । अपूर्व्य । अ । पूर्व्य । मघवन् । वृत्रहत्याय । वृत्र । हत्याय । तत् । पृथिवीम् । अप्रथयः । तत् । अस्तभ्नाः । उत । उ । दिवम् ॥६०१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 601
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अपुर्ण्य) अद्वितीय (मघवन्) ऐश्वर्यवान परमेश्वर, (वृत्रहत्याय) सृष्टीच्या उत्पत्तिसाठी घूलोकाचा आणि पृथ्वीचा विस्तार करण्यात व त्यांना आकाशात अवस्थित करण्यासाठी जे विघ्न म्हणून होते, त्या मेघमंडळाचा वध करण्यासाठी तुम्ही (यत्) जेव्हा तत्पर झाला होता (तत्) तेव्हाच तुम्ही (पृथिवीन्) भूमीला (अप्रथयः) विस्तीर्ण केले (उत उ) आणि (तत्) तेव्हाच (दिवम्) सूर्याला (उत् अस्तभ्नाः) आकाशात स्थित केले वा धारण केले.।।७।।

भावार्थ - आमच्या सौरमंडळाच्या उत्पत्तिपूर्वी आकाशात प्रज्वलित अशा गॅसचा (वायूचा) समूह असलेली प्रकाश-पुंजमयी एक नीहारिका होती. कालान्तराने आमची भूमी आणि इतर ग्रह तय नीहारिकेपासून वेगळे झाले. नीहारिकेचा अवशेष भाग सूर्य म्हणून ओळखला जाऊ लागला. नाहारिकेपासून वेगळी झालेली आमची भूमीदेखील आरंभी प्रज्वलित वायू-पिंड वा गॅसचा गोळा मात्र होती. हळू हळू ती थंड होत गेली आणि द्रवरूप झाली. त्यावेळी बरीच जलराशीचे सूर्याचा तील उष्णतेने वाफ होऊ ती जलराशी मेघांचे रूप धारण करून सूर्याच्या व भूमीच्या मधे स्थित झाली. तेव्हां मेघमंडळाने उत्पन्न केलेल्या प्रगाढ अंधकारामुळे भूमीवर सर्वचिरस्थायिनी रात्रीचे साम्राज्य पसरले. सूर्याच्या तत्पतेचा स्पर्श न झाल्यामुळे द्रवरूप झालेली भूमी थंड होत होत स्थलरूपात अस्तित्वात आली. तदनन्तर ईश्वरीय नियमांप्रमाणे ती विकराल मेघ-राशी पुन्हा वृष्ठिरूपाने बरसत बरसत भूमीवर समुद्ररूपात स्थित झाली. मेघ नावाच्या या अशा वृत्रासुराचा याप्रकारे वध झाल्यानंतर स्थलरूप पृथ्वीवर ग्रीष्म, वर्षा आदी विविध ऋतू आदी त्यामुळे नद्या, पर्वत, वनस्पती आदीने संपन्न होऊन आमची पृथ्वी अत्यंत विस्तृत झाली. सूर्यदेखील स्वतःच्या आकर्षणशक्तीने पृथ्वीला आपल्याभोवती फिरवीत राहिला आणि परमेश्वराच्याच महिमेने तो आधाराशिवाय आकाशात स्थित राहिला. हीच माहिती वरील मंत्रामधे संक्षेपात सांगितली आहे.।। या दशतीमधे इन्द्र, पवमान, धाता, सविता, विष्णु, वायू, या नावांनी परमेश्वराचेच स्मरण केले असल्यामुळे यापूर्वीच्या दशतीतील विषयांशी या दशतीशी संगती आहे, असा जाणावे।।

इस भाष्य को एडिट करें
Top