Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 615
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - अग्निः
छन्दः - पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
भ्रा꣡ज꣢न्त्यग्ने समिधान दीदिवो जि꣣ह्वा꣡ च꣢रत्य꣣न्त꣢रा꣣स꣡नि꣢ । स꣡ त्वं नो꣢꣯ अग्ने꣣ प꣡य꣢सा वसु꣣वि꣢द्र꣣यिं꣡ वर्चो꣢꣯ दृ꣣शे꣡ऽदाः꣢ ॥६१५
स्वर सहित पद पाठभ्रा꣡ज꣢꣯न्ती। अ꣣ग्ने । समिधान । सम् । इधान । दीदिवः । जिह्वा꣢ । च꣣रति । अन्तः꣢ । आ꣣स꣡नि꣢ । सः । त्वम् । नः꣣ । अग्ने । प꣡य꣢꣯सा । व꣣सुवि꣢त् । व꣣सु । वि꣢त् । र꣣यि꣢म् । व꣡र्चः꣢꣯ । दृ꣣शे꣢ । दाः꣣ ॥६१५॥
स्वर रहित मन्त्र
भ्राजन्त्यग्ने समिधान दीदिवो जिह्वा चरत्यन्तरासनि । स त्वं नो अग्ने पयसा वसुविद्रयिं वर्चो दृशेऽदाः ॥६१५
स्वर रहित पद पाठ
भ्राजन्ती। अग्ने । समिधान । सम् । इधान । दीदिवः । जिह्वा । चरति । अन्तः । आसनि । सः । त्वम् । नः । अग्ने । पयसा । वसुवित् । वसु । वित् । रयिम् । वर्चः । दृशे । दाः ॥६१५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 615
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - अग्नी देवता। अग्नी नावाने परमेश्वर, आचार्यन राजा यांची प्रार्थना
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) परमात्मपर) (समिधान) अतिशय प्रकाशवान (कीर्तिवान) (दीदिवः) सर्वांना प्रकाशित करणारे (प्रेरणा व उत्साह देणारे) हे (अग्ने) जगन्नायक परमेश्वर, तुमच्या कृपेने (आसनिअन्तः) आमच्या मुखात (भ्राजन्ती) शोभित होणारी (जिह्वा) जीभ (चरति) विविध रसांचा आस्वाद घेत आहे आणि शब्दांचे उच्चारण करीत आहे. (वसुविव्) ऐश्वर्य देणारे (सः) (त्वम्त) असे तुम्ही, हे (अग्ने) परमेश्वर, (नः) आम्हाला (पयसा) दूध, जल, घृत आदींनी संयुक्त असे (रयिम्) धन सः देत आहात आणि (दृशे) कर्तव्य अरूर्तव्यचा निर्णय करण्यासाठी (वर्चः) ज्ञानरूप तेज (दाः) देत आहात वा दिलेले आहा.।।
द्वितीय अर्थ - (आचर्यपर) अग्निरूप आचार्यात स्वतःला झोकून देण्यासाठी (विद्या-प्राप्तीसाठी) गुरूकुलात देणारे सश्रद्ध शिष्य हाती समिधा धरून आचार्यास विनंती करीत आहेत. (समिधान) स्वतः ज्ञानाने प्रदीप्त आणि (दीदिवः) शिष्यांना ज्ञानाने प्रदीप्त करणाऱ्या हे (अग्ने) विद्वान, आचार्यप्रवर, तुमच्या (आसानि अन्तः) मुखात (भ्राजन्ती) शास्त्रांचा उपदेश करणारी म्हणूनच कीर्तीने चमकणारी (जिह्वा) जिह्वा (चरति) शब्दोच्चारणासाठी ताल, दंत आदी स्थानांत संचार करते. (सः) असे महिमावान (वसुवित्) आम्हाला विविध विद्याधन देणारे (त्वम्) तुम्ही हे आचार्यप्रवर, (नः) आम्हा शिष्यांना (दृशे) कर्तव्य जाणून घेण्यासाठी (वयस्त) वेदज्ञानरूप दुधासह (रयिम्) सदाचाररूप संपदा आणि (वर्चः) ब्रह्मवर्चस्व (दाः) द्या.।।
तृतीय अर्थ - (राजापर) सिंहासनावर आसीन राजाला उद्देशून प्रजाजन म्हणत आहेत- (समिधान) राजोचित प्रतापाने देदीप्यमान तसेच (दीदिवः) प्रजेला आपल्या यशाने प्रदीप्त करणारे हे (अग्ने) अग्रनायक राजा, (आस नि अन्तः) तुमच्या धनुष्यावर (भ्राजन्ती) चमकणारी (जिह्वा) दोरर (चरति) चालते म्हणजे ओढली जाते सुटते आणि बाण फेकते. (सः) असे ते (वसुवित्) प्रजाननांना निवासस्थान देणारे (त्वम्) तुम्ही (अग्ने) अग्निसम तळपणारे हे जाज्वल्यवान राष्ट्राधिपती, (दृशे) राष्ट्राच्या ख्यातीसाठी प्रजेला (पयसा) दूध आदी रसांसह (रयिम्) धन, धान्य आदी संपत्ती आणि (वर्चः) ब्राह्म तेज (दाः) प्रदान करा.।।
चतुर्थ अर्थ - (यज्ञाग्नीपर) यजमान म्हणत आहेत- (समिधान) प्रज्वलित व (दीदिवः) याज्ञिकाला तेजाने प्रज्वलित (उत्साहित) करणारी हे (अग्ने) यज्ञाग्नी, (आसनि अन्तः) यज्ञकुंडरूप मुखात (भ्राजन्ती) दीप्तिमान असणारी (जिह्वा) तुझी ज्वालारूप जीभ (चरति) फडफड करीत आहे. (सः) ती (वसुवित्) हविरूप धन प्राप्त करणारी (त्वम्) तू हे (अग्ने) यज्ञाग्नी, (पयसा) वृष्टिजलासह (रयिम्) धान्य-संपदा तसेच शक्ती, बुद्धी, दीर्घायू आदी रूप धन आम्हाला दे आणि (दृशे) पाहण्यासाठी (वर्चः) प्रकाश (दाः) दे.।।
मुण्डक उपनिषदाच्या ऋषीने अग्नीच्या विविध जिह्वा याप्रकारे सांगितल्या आहेत- काली, कराली, मनवत, वेगवती, अत्यंत लाल, धुरकट रंगाच्या ठिणग्या सोडणारी आणि सर्व रंगाच्या ज्वाळा, या सात जिह्वा अग्नीच्या आहेत. (मुण्डक २/४) अग्नीच मुख आणि जिह्वा यांचे वर्णन असल्यामुळे येथे यज्ञाग्नीपर अर्थ करताना असं वेधात संबंध दाखविला आहे. त्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार आहे.।।१।।
भावार्थ - ज्याप्रमाणे जगदीश्वर मनुष्यांना जल, दूध, घृत, ज्ञान आदी देतो आणि यज्ञाग्नी मनुष्यांना वृष्टी, जल, बल, बुद्धी व दीर्घायुष्य आदी देतो, तद्वत आचार्याने शिष्यांना वेदविद्या, सदाचार ब्रह्मतेज आदी दिले पाहिजेत आणि राजाने राष्ट्रात ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्यांची उन्नती घडवीत सर्व प्रजेला आनंदी केले पाहिजे.।।१।।
इस भाष्य को एडिट करें