Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 62
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः देवता - अग्निः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

स꣡खा꣢यस्त्वा ववृमहे दे꣣वं꣡ मर्ता꣢꣯स ऊ꣣त꣡ये꣢ । अ꣣पां꣡ नपा꣢꣯तꣳ सु꣣भ꣡ग꣢ꣳ सु꣣द꣡ꣳस꣢सꣳ सु꣣प्र꣡तू꣢र्तिमने꣣ह꣡स꣢म् ॥६२॥

स्वर सहित पद पाठ

स꣡खा꣢꣯यः । स꣢ । खा꣣यः । त्वा । ववृमहे । देवम्꣢ । म꣡र्ता꣢꣯सः । ऊ꣣त꣡ये꣢ । अ꣣पा꣢म् । न꣣पा꣢꣯तम् । सु꣣भ꣡ग꣢म् । सु꣣ । भ꣡ग꣢꣯म् । सु꣣दँ꣡ऽस꣢सम् । सु꣣ । दँ꣡स꣢꣯सम् । सु꣣प्र꣡तू꣢र्तिम् । सु꣣ । प्र꣡तू꣢꣯र्त्तिम् । अ꣣नेह꣡स꣢म् । अ꣣न् । एह꣡स꣢म् ॥६२॥


स्वर रहित मन्त्र

सखायस्त्वा ववृमहे देवं मर्तास ऊतये । अपां नपातꣳ सुभगꣳ सुदꣳससꣳ सुप्रतूर्तिमनेहसम् ॥६२॥


स्वर रहित पद पाठ

सखायः । स । खायः । त्वा । ववृमहे । देवम् । मर्तासः । ऊतये । अपाम् । नपातम् । सुभगम् । सु । भगम् । सुदँऽससम् । सु । दँससम् । सुप्रतूर्तिम् । सु । प्रतूर्त्तिम् । अनेहसम् । अन् । एहसम् ॥६२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 62
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(मतसि:) यदणधर्मा (सखाय:) व समान ख्याती असलेले आम्ही मित्र वा सोबती त्या (देवम्) ज्योतिर्मय आणि ज्योतिप्रदायक परमेश्वराचा स्वीकार करीत आहोत. तो कसा आहे? (अपां नपातम्) प्रकृतीचा आणि जीवात्म्यांचा नाश न करणारा आहे. (सुभगम्) उत्तम ऐश्वर्यवान असून (सुदंसत्सम्) शुभ कर्म करणारा आहे. तो (सुप्रतूर्तिम्) कार्य अत्यंत शीघ्रतेने करणारा असून (अनेहसम्) ज्याची कोणी कधी हिंसा करू शकत नाही. जो सर्वथा पापरहित असून सज्जनांवर कधीही कोप करीत नाही, हे परमात्मन अशा (त्वा) तुला परमेश्वररूप अग्नीला (ऊतये) आत्मरक्षेसाठी व प्रगतीसाठी आम्ही (ववृमहे) वरत आहोत. तुझा स्वीकार करीत आहोत. ।।८।।

भावार्थ - आपल्या कल्याणाचे इच्छुक असलेल्या कल्याणकामी लोकांनी सर्वांची मिळून परम तेजस्वी, तेजप्रदाता, प्रलयकाळी नश्वर पदार्थांचा विनाश करणाऱ्या परमेश्वराची श्रद्धाभावनेने उपासना केली पाहिजे. ते परमैश्वर्यवान्, शुभकर्मकर्ता, सुविवारित कर्मेत्वरित करणारा, तसेच अहिंसित व अपराजित आहे. पापरहित आहे. सज्जनांवर क्रोध न करणारा आहे. दुर्जनांवर कोप करणारा, जमत् व्यवस्थापक तसेच सर्व मंगलकारा आहे. सर्वांची त्याची श्रद्धेने उपासना केली पाहिजे. ।।८।। या दशतीमध्ये अग्नी, यूप, द्रविणोदस आणि बृहस्पती या नावाने परमेश्वराच्या गुणांचे वर्णन केले आहे. तसेच त्याच्याप्रत आत्मसमर्पणाचे लाभ वर्णित केले आहेत. यामुळे या दशतीच्या विषयांची संगती या पूर्वीच्या दशतीच्या विषयांशी आहे, असे जाणावे. ।। प्रथम प्रपाठकातील द्वितीय अर्थाची प्रथम दशति समाप्त प्रथम अध्यायातील सहावा खंड समाप्त

इस भाष्य को एडिट करें
Top