Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 623
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
ह꣡री꣢ त इन्द्र꣣ श्म꣡श्रू꣢ण्यु꣣तो꣡ ते꣢ ह꣣रि꣢तौ꣣ ह꣡री꣢ । तं꣡ त्वा꣢ स्तुवन्ति क꣣व꣡यः꣢ पु꣣रु꣡षा꣢सो व꣣न꣡र्ग꣢वः ॥६२३
स्वर सहित पद पाठह꣡री꣢꣯ । ते꣣ । इन्द्र । श्म꣡श्रू꣢꣯णि । उ꣣त꣢ । उ꣣ । ते । हरि꣡तौ꣢ । हरी꣣इ꣡ति꣢ । तम् । त्वा꣣ । स्तुवन्ति । कव꣡यः꣢ । प꣣रुषा꣡सः꣢ । व꣣न꣡र्ग꣢वः ॥६२३॥
स्वर रहित मन्त्र
हरी त इन्द्र श्मश्रूण्युतो ते हरितौ हरी । तं त्वा स्तुवन्ति कवयः पुरुषासो वनर्गवः ॥६२३
स्वर रहित पद पाठ
हरी । ते । इन्द्र । श्मश्रूणि । उत । उ । ते । हरितौ । हरीइति । तम् । त्वा । स्तुवन्ति । कवयः । परुषासः । वनर्गवः ॥६२३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 623
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - इन्द्र देवता। इन्द्र नावाने परमेश्वराचे वर्णन
शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमैश्वर्यशाली परमेश्वर (ते) तुझ्याद्वारे निर्मित (श्मश्रूणि) आणि मिशाप्रमाणे भासणाऱ्या सूर्यकिरणें (हरी) मालिन्य हरण करणाऱ्या आहेत. (उत) आणि (ते) तू रचित केलेल्या (हरितौ) पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण व ऊर्ध्व रूप सहा दिशा (हरी)देखील (आमच्या मनातील व वातावरणातील) मालिन्य दूर करणाऱ्या आहेत. (तं त्वा) अशाप्रकारच्या तुझ्या स्वरूपाची (वनर्गवः) वनवासी वानप्रस्थगण आणि (करयः पुरुषासः) समाजातील मेधावी पुरूष (स्तुवन्ति) स्तुती करतात.।।९।।
भावार्थ - परमेश्वराद्वारे निर्मित सूर्य, चन्द्र, तारका, दिशा, विदिशा आदी सर्व पदार्थ विलक्षण अद्भुत असून त्याचा महिमा प्रकट करीत आहेत.।।९।।
विशेष -
या मंत्रात ‘हरी’ शब्दाच्या आवृत्तीत यमक आणि ‘हरी, हरी, हरी’ यामधे वृत्त्यनुप्रास आहे. येथे सूर्यकिरणांना श्मश्रू (मिशा) म्हटले आहे म्हणजे असम्बन्धात असम्बन्ध दाखविला आहे. यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार आहे.।।९।।