Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 630
ऋषिः - सार्पराज्ञी देवता - सूर्यः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1

आ꣡यं गौः पृश्नि꣢꣯रक्रमी꣣द꣡स꣢दन्मा꣣त꣡रं꣢ पु꣣रः꣢ । पि꣣त꣡रं꣢ च प्र꣣य꣡न्त्स्वः꣢ ॥६३०॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । अ꣣य꣢म् । गौः । पृ꣡श्निः꣢꣯ । अ꣣क्रमीत् । अ꣡स꣢꣯दत् । मा꣣त꣡र꣢म् । पु꣣रः꣢ । पि꣣त꣡र꣢म् । च꣣ । प्रय꣢न् । प्र꣣ । य꣢न् । स्व३रि꣡ति꣢ ॥६३०॥


स्वर रहित मन्त्र

आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः । पितरं च प्रयन्त्स्वः ॥६३०॥


स्वर रहित पद पाठ

आ । अयम् । गौः । पृश्निः । अक्रमीत् । असदत् । मातरम् । पुरः । पितरम् । च । प्रयन् । प्र । यन् । स्व३रिति ॥६३०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 630
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सूर्यपूर)-अयम्) हा पृश्विगौः) विविध-रंगी सूर्य (आ अक्रमीत्) चारही दिशांना अक्ष-परिभ्रमण करीत आहे. (पुरः) समोर स्थित (मातरम्) आमच्या मातृभूमीपर्यंत हा सूर्य (असदत्) आपल्या किरणांच्या साह्याने पोहचतो. (च) आणि (पितरम्) आम्हाला पितृतुल्य असलेल्या (स्वः) अंतरिक्षापर्यंत देखील हा सूर्य (प्रयन्) किरणांद्वारे प्राप्त होतो.।। द्वितीय अर्थ - (भू मंडळपर) (अयम्) हे (पुश्विः गौः) रंगी-बेरंगी (गौः) भूमंडळ (आ अक्रमीत) आपल्याभोवती अक्ष-परिभ्रमण करीत आहे. आणि (पुरः) पश्चिमेकडून पूर्वेकडे (पितरम्) आपल्या पित्याच्या म्हणजे (स्वः) सूर्याच्याभोवतीदेखील (प्रयन्) गति करीत (मातरम्) अंतरिक्षरूप मातेच्या कुशीत (असदत्) स्थित आहे. पृथ्वीच्या भ्रमणानेदेखील सूर्याचे महत्त्वच स्पष्ट होत आहे, म्हणून भूमंडळपक्षी मंत्र देवता सूर्य असल्यामुळे काही दोष येत नाही.।। तृतीय अर्थ - (परमेश्वरपर) (असम्) हा (पृश्निः) ज्योतिर्मय (गौः) सर्वज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वर (आ अक्रमीत) शरीरात व ब्रह्मांडात सर्वदेशांपर्यंत पोहचलेला आहे म्हणजे अंतर्यामी आहे. तो (मातरम्) विश्वयात्मक ज्ञानाची जननी जी बुद्धी, त्या बुद्धीच्या (पुरः) पुढे (असदत्) स्थित असतो (म्हणजे त्यास ज्ञानाद्वारे जाणता येते.) (च) आणि (पितरम्) पालनकर्ता (स्वः) सुखाचा भोक्ता जो आत्मा, त्या आत्म्यास (प्रयन्) प्राप्त होतो.।। चतुर्थ अर्थ - (जीवात्मापर) (अयम्) हा (पृश्विः) चित्र-विचित्र संस्कारानी युक्त असा (गौः) प्रयत्नशीलए विज्ञाता जीवाला (आ अक्रमीत) कर्माप्रमाणे मनुष्यशरीर प्राप्त करतो (पुरः) आधी तो (मातरम्) मातेच्या गर्भति (असदत्) देतो वा प्राप्त होतो (च) आणि जन्मानंतर (स्वः) विज्ञान-प्रकाशाने युक्त (पितरम्) पिता (प्रयन्) प्राप्त करतो (जीवात्म्यास कर्माप्रमाणे आईवडील प्राप्त होतात.।। पंचम अर्थ - (स्तोतापर) अयम्) हा (पृश्विः) आश्चर्यमय गुणांनी युक्त (गौः) ज्ञान-ज्योतीद्वारे सूर्यवत् भासमान स्तोता (उपासक) (आ अक्रमीत्) सर्वदृष्ट्या पुरुषार्थ करतो आणि (पुरः) पुढे पुढे प्रगती करीत (मातरम्) वेदवाणीरूप मातेला (असदत्) प्राप्त करतो. (वेदज्ञान पूर्णपणे ज्ञात होते) (च) आरि (स्वः) प्रकाशमान (पितरम्) परमात्मरूप पित्यास (प्रयन्) प्राप्त करण्याचा यत्न करतो.।। (निघंटु३/१५प्रमाणे गौ शब्द स्तोताचा वाचक आहे)।।४।।

भावार्थ - सूर्याचे स्थानांतर गती नाही, तो स्वतःच्या धुरीवर भ्रमण करतो आणि पृथ्वी व इतर ग्रह-उपग्रह, सोम, मंगळ, बुध, गुरू आदींना आपल्या किरणांद्वारे प्रकाशित करतो. पृथ्वीची गती दोन प्रकारची आहे, पहिली गती म्हणजे ती स्वतःभोवती फिरते आणि त्यामुळे दिवस-रात्र होतात. पृथ्वीचे दुसरे भ्रमण सूर्याभोवती होते, ज्यामुळे संवत्सर-चक्र चालते. परमेश्वर सर्वव्यापक असल्यामुळे शरीरात स्थित आत्मा, मन, बुद्धी आदीचे तसेच ब्रह्मांडात स्थित सूर्य, चंद्र व पृथ्वी आदीचे संचालन करतो. जीवात्मा त्याच्या शुभ-अशुभ कर्मानुसार मातेच्या गर्भात जातो व जन्म घेतो आणि परमेश्वराचा स्रोता पुरुषार्थाद्वारे वेदवाणी रूप माता व परमात्मरूप परमपिता प्राप्त करतो.।।४।।

इस भाष्य को एडिट करें
Top