Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 638
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः देवता - सूर्यः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1

उ꣡द्द्यामे꣢꣯षि꣣ र꣡जः꣢ पृ꣣थ्व꣢हा꣣ मि꣡मा꣢नो अ꣣क्तु꣡भिः꣢ । प꣢श्य꣣ञ्ज꣡न्मा꣢नि सूर्य ॥६३८॥

स्वर सहित पद पाठ

उ꣢त् । द्याम् । ए꣣षि । र꣡जः꣢꣯ । पृ꣣थु꣢ । अ꣡हा꣢꣯ । अ । हा꣣ । मि꣡मा꣢꣯नः । अ꣣क्तु꣡भिः꣢ । प꣡श्य꣢꣯न् । ज꣡न्मा꣢꣯नि । सू꣣र्य ॥६३८॥


स्वर रहित मन्त्र

उद्द्यामेषि रजः पृथ्वहा मिमानो अक्तुभिः । पश्यञ्जन्मानि सूर्य ॥६३८॥


स्वर रहित पद पाठ

उत् । द्याम् । एषि । रजः । पृथु । अहा । अ । हा । मिमानः । अक्तुभिः । पश्यन् । जन्मानि । सूर्य ॥६३८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 638
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (सूर्य) चराचर जगात अंतर्यामी असलेल्या परमेश्वरा, तूच (अक्तुभिः) प्रलयकाळातील रात्रींसह (अहा) सृष्टिरूप दिवसांची (मिमानः) निर्मिती करीत (जन्मामि) प्राण्यांच्या पूर्व-अपर जन्मांना (पश्यन्) जाणतोस, आणि तूच या (पृथु) यशोमय (रजः) लोक व (द्याम्) प्रकाशमय ब्रह्मांडाचे (उद्एषि) संचालन करतोस.।। याचप्रकारे आकाशातील सूर्यदेखील (अक्तुभिः) रात्रीसह (अहा) दिनांचे (मिमानः) निर्माण करतो. तो (जन्मानि) उत्पन्न पदार्थांना (पश्यन्) प्रकाशमय करीत (पृथु) विशाल (रजः) लोकात (घाम्) व द्यूलोकात (उदेति) उदित होतो.।।१२।।

भावार्थ - सौरलोकात परमेश्वरद्वारे संचालित सूर्यच दिवस-रात्र, पक्ष, मास, ऋतू, अयन, संवत्सर आदी चक्र-प्रवर्तन घडवितो आणि सर्वांना प्रकाशित करतो. परमेश्वरदेखील प्रलयरात्रीनंतर सृष्टिरूपब्राह्म दिनाची रचना करीत असतो तसेच तो मनुष्याने जन्म-जन्मांतरात केलेल्या शुभ-अशुभकर्मांची फळे देत असतो.।।१२।।

इस भाष्य को एडिट करें
Top