Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 64
ऋषिः - उपस्तुतो वार्हिष्टव्यः देवता - अग्निः छन्दः - जगती स्वरः - निषादः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

चि꣣त्र꣢꣫ इच्छिशो꣣स्त꣡रु꣢णस्य व꣣क्ष꣢थो꣣ न꣢꣫ यो मा꣣त꣡रा꣢व꣣न्वे꣢ति꣣ धा꣡त꣢वे । अ꣣नूधा꣡ यदजी꣢꣯जन꣣द꣡धा꣢ चि꣣दा꣢ व꣣व꣡क्ष꣢त्स꣣द्यो꣡ महि꣢꣯ दू꣣त्यां꣢३꣱च꣡र꣢न् ॥६४॥

स्वर सहित पद पाठ

चि꣣त्रः꣢ । इत् । शि꣡शोः꣢꣯ । त꣡रु꣢꣯णस्य । व꣣क्षथः꣢ । न । यः । मा꣣त꣡रौ꣢ । अ꣣न्वे꣡ति꣣ । अ꣣नु । ए꣡ति꣢꣯ । धा꣣त꣢꣯वे । अ꣣नूधाः꣢ । अ꣣न् । ऊधाः꣢ । यत् । अ꣡जी꣢꣯जनत् । अ꣡ध꣢꣯ । चि꣣त् । आ꣢ । व꣣व꣡क्ष꣢त् । स꣣द्यः꣢ । स꣣ । द्यः꣢ । म꣡हि꣢꣯ । दू꣣त्य꣢꣯म् । च꣡र꣢꣯न् ॥६४॥


स्वर रहित मन्त्र

चित्र इच्छिशोस्तरुणस्य वक्षथो न यो मातरावन्वेति धातवे । अनूधा यदजीजनदधा चिदा ववक्षत्सद्यो महि दूत्यां३चरन् ॥६४॥


स्वर रहित पद पाठ

चित्रः । इत् । शिशोः । तरुणस्य । वक्षथः । न । यः । मातरौ । अन्वेति । अनु । एति । धातवे । अनूधाः । अन् । ऊधाः । यत् । अजीजनत् । अध । चित् । आ । ववक्षत् । सद्यः । स । द्यः । महि । दूत्यम् । चरन् ॥६४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 64
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (यज्ञाग्नीपरक) (शिशो:) नवजात बालक असूनही जो (तरूणस्तय) तरूण आहे तरूणाप्रमाणे कार्य करणारा आहे त्या यज्ञाग्नीचे (वक्षथ:) हवी वहन करण्याचे गुण खरोखर (चित्र: इत्) अद्भूत आहे. (य:) जो यज्ञाग्नी (धातवे) दूध पिण्यासाठी (मातरौ) माता पिताद्वारे सारख्या असणाऱ्या अरणींचे (न अन्नेति) अनुसरण करीत नाही. (अनूधा:) ऊधस्रहित माता अरणी (यत्) जेव्हा यज्ञाग्नीला (अजीजनत्) उत्पन्न करते (अधचित्) त्यानंतरच ती यज्ञाग्नी त्रित (महि) महान (दूत्यम्) दूत कर्म करीत (आववक्षत्) होम केलेल्या हवीचे वहन करणे (यज्ञवेदीतून वर वा सर्व दिशांत पसरविणे) आरंभ करतो. द्वितीय अर्थ : (परमात्मपरक) - (शिशो:) शिशुसारखे प्रिय आणि (तरूणस्य) युवकाप्रमाणे महान कर्म करणाऱ्या परमेश्वराचे (वक्षय:) सृष्टीचा भार सहन करण्याचे गुण खरोखर (चित्र:) आश्चर्यकारी आहे. (य:) जो परमात्मा अन्य प्राण्याप्रमाणे (धातवे) दूध पिण्यासाठी म्हणजे पुष्टी वा वृद्धी प्राप्त करण्यासाठी (मातरौ) माता पित्याला (न अन्वेति) प्राप्त करीत नाही, तो स्वत: परिपुष्ट आहे. (अनूधा:) ऊधस् रहित प्रकृती (यत्) जेव्हा (अजीजनत्) या सृष्टीला उत्पन्न करते (अध चित्) त्यानंतरच (सद्य:) त्वरित (महि) महान (दूत्यम्) दूतकर्म करीत तो परमात्मा (आ ववक्षत्) जगाचा भार सहन करणे आरंभ करतो. ।।२।।

भावार्थ - शिशु असताना काषणीही कोणते शक्तिसाध्य कार्य करू शकत नाही, पण आईचे दूध पिऊन आणि पित्याच्या संरक्षणामुळे पुष्ट, बलवान होऊन कोणतेही मोठे कार्य करू शकतो, पण हे महदाश्चर्य आहे की अरणीरूप माता पित्याने उत्पन्न यज्ञाग्नी शिशु असतानाही हवि वह्य रूप दुष्कर दूतकर्म करू लागतो. त्याचप्रकारे परमेश्वरदेखील शिशु असतानाही युवक आहे, कारण तो भक्तांना शिशुप्रमाणष प्रिय आहे आणि युवाप्रमाणे या जगाचा भार पेलण्याने अतिमहामहान कार्य करण्यास समर्थ आह. सर्वजण माता पित्याकडून रसपान करून शरीरात शक्ती संचित करतात. पण परमेश्वर त्यांच्याकडून रसपान न करतानही स्वभावेन परम बलवान आहे आणि प्रकृतीपासून उत्पन्न विशाल ब्रह्मांडाचा भार उचलत आहे. खरेच परमेशाचे हे सामर्थ्य आणि कर्म अतिशय अद्भुत आहे. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top