Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 640
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः
देवता - सूर्यः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
स꣣प्त꣡ त्वा꣢ ह꣣रि꣢तो꣣ र꣢थे꣣ व꣡ह꣢न्ति देव सूर्य । शो꣣चि꣡ष्के꣢शं विचक्षण ॥६४०॥
स्वर सहित पद पाठस꣣प्त꣢ । त्वा꣣ । हरि꣡तः꣢ । र꣡थे꣢꣯ । व꣡ह꣢꣯न्ति । दे꣣व । सूर्य । शोचि꣡ष्केश꣢म् । शो꣣चिः꣢ । के꣣शम् । विचक्षण । वि । चक्षण ॥६४०॥
स्वर रहित मन्त्र
सप्त त्वा हरितो रथे वहन्ति देव सूर्य । शोचिष्केशं विचक्षण ॥६४०॥
स्वर रहित पद पाठ
सप्त । त्वा । हरितः । रथे । वहन्ति । देव । सूर्य । शोचिष्केशम् । शोचिः । केशम् । विचक्षण । वि । चक्षण ॥६४०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 640
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 14
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 14
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - पुन्हा सूर्याचे/जीवात्म्याचे/परमात्म्याचे वर्णन
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (जीवात्मापर) हे (देव) दिव्यशक्तिसंपन्न, (विचक्षण) विविध ज्ञान-संपन्न, (सूर्य) शरीर रथाला सुव्यवस्थितपणे चालविणाऱ्या जीवात्मा, (शोचिष्केशम्) ज्याला तिजरूप केश आहेत, अशा (त्वा) तुला (सप्त हरितः) गायत्री आदी सात छंदानी समृद्ध अशी वेदवाणी (रथे) उपासकाच्या रमणीय हृदयात (वहन्ति) पोहचवितात.।
द्वितीय अर्थ - (भौतिक सूर्यपर) भौतिक सूर्य ही (देवः) प्रकाशमान असून (विचक्षणः) विविध पदार्थांचे दर्शन घडविणारा तसेच (शोधिष्केशः) किरणरूप केश असणारा आहे. (सप्त) सात (हरितः) दिशा (रथे) आकाशरूप रथात बसवून (वहन्ति) त्याला यात्रा घडवीत आहेत.।
येथे सूर्य हा शिशू व दिशा या त्याच्या माता, असा अर्थ ध्वनित होत आहे. जसे माता शिशुला बद्या-गाडीत बसवून फिरायला नेतात, तसेच दिशा सूर्याला आकाश-रथात बसवून यात्रेवर नेत असतो.।।
दिशा चार आहेत. तसेच सर्वज्ञात आहे, पण शास्त्रात पाच, सहा, सात, आठ, दहा आदी विभिन्न संख्येत असलेल्या सांगितल्या आहेत. ङ्गसात दिशा असून अनेक सूर्य आहेतफ (ऋ.९/१४/३) या श्रुति-उक्तीप्रमाणे दिशा सात प्रमाणित होतात. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, या चार दिशा, ऊर्ध्वव अध या दोन दिशा व एक मध्यदिशा. याप्रकारे दिशांची संख्या सात ठरते.।।१४।।
भावार्थ - जसे एखाद्या प्रतापी पुरुषाला सात घोड्यांच्या रथामधे बसवून न्यावे, तसेच किरणरूप केस असलेल्या सूर्याला दिशा आकाश-रथात नेत असतात. तसेच तेजरूप केस असणाऱ्या जीवात्मारूप पुरुषाला इन्द्रियरूप घोडे शरीर-रथात वहन करून नेतात आणि ज्ञानरूप केस असणाऱ्या परमात्मरूप पुरुषाला वेदांचे सात छंद उपासकाच्या हृदय रथावर बसवून नेत असतात.।।१४।। या दशतीमधे अग्नी नाम परमेश्वराकडून पावित्र्य, दुःखनाश आदीविषयी प्रार्थना केली असून सूर्य नावाने भौतिक सूर्य, जीवात्मा व परमात्म्याचे वर्णन असल्यामुळे या दशतीच्या विषयांशी पूर्वदशतीच्या विषयाची संगती आहे।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. शोचीवर (किरणांवर) केसांचा आरोप शब्दावर आधारित असून ‘शाब्द’ आहे व सूर्यावर पुरुषाच्या आरोप अर्थ (अर्थावर आधारित) असल्यामुळे येथे एकदेशविवर्ति रूपक अलंकारही आहे.।।१४।।