Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 72
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - अग्निः
छन्दः - त्रिपाद विराड् गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
अ꣣ग्निं꣢꣫ नरो꣣ दी꣡धि꣢तिभिर꣣र꣢ण्यो꣣र्ह꣡स्त꣢च्युतं जनयत प्रश꣣स्त꣢म् । दूरे꣣दृ꣡शं꣢ गृ꣣ह꣡प꣢तिमथ꣣व्यु꣢म् ॥७२॥
स्वर सहित पद पाठअ꣣ग्नि꣢म् । न꣡रः꣢꣯ । दी꣡धि꣢꣯तिभिः । अ꣣र꣡ण्योः꣢ । ह꣡स्त꣢꣯च्युतम् । ह꣡स्त꣢꣯ । च्यु꣣तम् । जनयत । प्रशस्त꣢म् । प्र꣣ । श꣢स्तम् । दू꣣रेदृ꣡श꣢म् । दू꣣रे । दृ꣡ष꣢꣯म् । गृ꣣ह꣡ प꣢तिम् । गृ꣣ह꣢ । प꣣तिम् । अथव्यु꣢म् । अ꣣ । थव्यु꣢म् ॥७२॥
स्वर रहित मन्त्र
अग्निं नरो दीधितिभिररण्योर्हस्तच्युतं जनयत प्रशस्तम् । दूरेदृशं गृहपतिमथव्युम् ॥७२॥
स्वर रहित पद पाठ
अग्निम् । नरः । दीधितिभिः । अरण्योः । हस्तच्युतम् । हस्त । च्युतम् । जनयत । प्रशस्तम् । प्र । शस्तम् । दूरेदृशम् । दूरे । दृषम् । गृह पतिम् । गृह । पतिम् । अथव्युम् । अ । थव्युम् ॥७२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 72
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात हे सांगितले आहे की, सर्व मनुष्यांनी परमेश्वररूप अग्नी हृदयात कशाप्रकारे प्रदीप्त करावा. -
शब्दार्थ -
(नर:) आपण सर्व उपासकजनांनी (हस्तच्युतम्) हात, पाय, नेत्र, कर्ण आदी अवयवांची आवश्यकता नसलेल्या अवयवरहित अशा (प्रशस्तम्) प्रशंसनीय (दूरेदृशम्) दूरदर्शी तसेच (गृहपतिम्) ब्रह्मांडरूप गृहाचा जो स्वामी पालनकर्ता (अव्ययम्) व अचल स्थिरभती (अग्निम्) अशा परमात्मरूप अग्नीला आपल्या (दीधितिभि:) ध्यानरूप अंगुलींद्वारे (अरण्यो:) मन व आत्मारूप अरणींच्या मध्ये (जगयत) प्रकट करा. ।।१०।।
भावार्थ - ज्याप्रमाणे अरणीच्या दोन लाकडांमध्ये घर्षण वा मंथन कर्म करून यज्ञाग्नी प्रकट केला जातो, तद्वत उपासकाने घर्षणाने परमात्म्यास आपल्या हृदयात प्रकाशित केले पाहिजे. ।।१०।। या दशतीमध्ये परमेश्वराचा महिमा वर्णित असून त्याच्या पूजेकरीता त्याच्या ज्योतीचा साक्षात्कार करण्यासाठी तसेच ध्यानरूप मंथन क्रियाद्वारे त्या अग्नीला प्रकाशित करण्यासाठी मनुष्यांना त्याविषयी प्रेरणा केली आहे. त्यामुळे या दशतीच्या विषयाची संगती पूर्वीच्या दशतीशी आहे, असे जाणावे. ।। प्रथम प्रपाठकातील द्वितीय अर्थाची द्वितीय दशती समाप्त प्रथम अध्यायात सप्तम खण्ड समाप्त ।।
विशेष -
श्लेष अलंकाराद्वारे या मंत्राची अर्थयोजना यज्ञाग्नीविषयीदेखील केली पाहिजे. ।।१०।।