Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 76
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः देवता - अग्निः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

इ꣡डा꣢मग्ने पुरु꣣द꣡ꣳस꣢ꣳ स꣣निं꣡ गोः श꣢꣯श्वत्त꣣म꣡ꣳ हव꣢꣯मानाय साध । स्या꣡न्नः꣢ सू꣣नु꣡स्तन꣢꣯यो वि꣣जा꣢꣫वाग्ने꣣ सा꣡ ते꣢ सुम꣣ति꣡र्भू꣢त्व꣣स्मे꣢ ॥७६॥

स्वर सहित पद पाठ

इ꣡डा꣢꣯म् । अ꣣ग्ने । पुरुदँ꣡स꣢म् । पु꣣रु । दँ꣡स꣢꣯म् । स꣣नि꣢म् । गोः । श꣣श्वत्तम꣢म् । ह꣡व꣢꣯मानाय । सा꣣ध । स्या꣢त् । नः꣣ । सूनुः꣢ । त꣡न꣢꣯यः । वि꣣जा꣡वा꣢ । वि꣣ । जा꣡वा꣢꣯ । अ꣡ग्ने꣣ । सा । ते꣣ । सुमतिः꣢ । सु꣣ । मतिः꣢ । भू꣣तु । अस्मे꣡इति꣢ ॥७६॥


स्वर रहित मन्त्र

इडामग्ने पुरुदꣳसꣳ सनिं गोः शश्वत्तमꣳ हवमानाय साध । स्यान्नः सूनुस्तनयो विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥७६॥


स्वर रहित पद पाठ

इडाम् । अग्ने । पुरुदँसम् । पुरु । दँसम् । सनिम् । गोः । शश्वत्तमम् । हवमानाय । साध । स्यात् । नः । सूनुः । तनयः । विजावा । वि । जावा । अग्ने । सा । ते । सुमतिः । सु । मतिः । भूतु । अस्मेइति ॥७६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 76
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) सर्वांचे अग्रनायक परमात्मन् आपण (हवमानाय) अग्निहोत्र करणाऱ्या आणि आत्मसमर्पणरूप हवि आपणास देणाऱ्या मला (इडाम्) भूमी, अन्न, वाणी तसेच (गो:) गायींच्या (पुरुदंसम्) अनेक यज्ञकर्म पूर्ण करण्यास उपयोगी अशा (सनिम्) दूध, दही, लोणी आदी पदार्थांचे दान (शश्वतमम) सतत (साध) प्रदान करीत राहा. (न:) आमचा (सूनु:) पुत्र (तनय:) वंश, धन, सुख व कीर्तीचा विस्तार करणारा तसेच (विजाना) विषयी व यशस्वी आणि अनेक ऐश्वर्य उत्पादन करणारा (स्मात्) व्हावा. हे (अग्ने) ज्योतिप्रदायक परमात्मन् (ते) आपली (सा) ती (सुमति:) अनुग्रहपूरित बुद्धी (अस्मे) आम्हास (भूतु) प्राप्त व्हावी. (अशी आम्ही प्रार्थना करतो.) ।।४।।

भावार्थ - हे परमपिता परमात्मा, अग्निहोत्ररूप देवयज्ञ करणाऱ्या आणि आपली स्तुती, उपासना प्रार्थना, समर्पण या स्वरूपातील ब्रह्मयज्ञ करणाऱ्या मला आपण कृपा करून कृषी व साम्राज्यासाठी भूमी द्या. भोजनासाठी भोज्य पदार्थ द्या. ज्ञान प्रसारासाठी प्रशंसनीय वाणी आणि शरीराच्या पुष्टीकरीता तसेच दान देण्याकरीता गौधृत, गौदुग्ध आदी प्रदान पदार्थ प्रदान करा. आमच्या संतानास वंश, धन, धर्म, सुख, सामर्थ्य, न्याय, कीर्ती, चक्रवर्ती राज्य आदीचा विस्तार करणारा करा. असे करा की ज्यायोगे तो आमची संतती सर्व शत्रूंवर विजय मिळविणारी होईल. ।।४।।

इस भाष्य को एडिट करें
Top