ऋग्वेद - मण्डल 1/ सूक्त 11/ मन्त्र 1
ऋषिः - जेता माधुच्छ्न्दसः
देवता - इन्द्र:
छन्दः - निचृदनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
इन्द्रं॒ विश्वा॑ अवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑। र॒थीत॑मं र॒थीनां॒ वाजा॑नां॒ सत्प॑तिं॒ पति॑म्॥
स्वर सहित पद पाठइन्द्र॑म् । विश्वाः॑ । अ॒वी॒वृ॒ध॒न् । स॒मु॒द्रऽव्य॑चसम् । गिरः॑ । र॒थिऽत॑मम् । र॒थीना॑म् । वाजा॑नाम् । सत्ऽप॑तिम् । पति॑म् ॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रं विश्वा अवीवृधन्त्समुद्रव्यचसं गिरः। रथीतमं रथीनां वाजानां सत्पतिं पतिम्॥
स्वर रहित पद पाठइन्द्रम्। विश्वाः। अवीवृधन्। समुद्रऽव्यचसम्। गिरः। रथिऽतमम्। रथीनाम्। वाजानाम्। सत्ऽपतिम्। पतिम्॥
ऋग्वेद - मण्डल » 1; सूक्त » 11; मन्त्र » 1
अष्टक » 1; अध्याय » 1; वर्ग » 21; मन्त्र » 1
अष्टक » 1; अध्याय » 1; वर्ग » 21; मन्त्र » 1
विषय - या सूक्तात इन्द्र शब्दाने ईश्वराची स्तुती, निर्भयता संपादन, सूर्यलोकाचे कार्य, शूरवीर गुणांचे वर्णन, दुष्ट शत्रूंचे निवारण, प्रजेचे रक्षण व ईश्वराच्या अनन्त सामर्थ्याने कारणापासून जगाची उत्पत्ती इत्यादी विधानाने या अकराव्या सूक्ताची संगती दहाव्या सूक्ताच्या अर्थाबरोबर लावली पाहिजे. ॥ या सूक्ताचाही सायणाचार्य इत्यादी आर्यावर्तवासी व युरोपदेशवासी विल्सनसाहेब इत्यादींनी विपरीत अर्थ केलेला आहे
भावार्थ - या मंत्रात श्लेषालंकार आहे. परम ऐश्वर्ययुक्त संपूर्ण वेदवाणी सर्वत्र राहणाऱ्या, सर्व जागी रमण करणाऱ्या, सत्य स्वभावी व धर्मात्मा सज्जनांचा विजय करवून देणाऱ्या परमेश्वराला प्रकट करते व धर्मबलाने दुष्ट माणसांना जिंकणाऱ्या धर्मात्मा सज्जन पुरुषांचे रक्षण करणाऱ्या माणसांना प्रकाशित करते. याप्रकारे परमेश्वर वेदवाणीने सर्व माणसांना आदेश देतो. ॥ १ ॥
इस भाष्य को एडिट करें