Loading...
यजुर्वेद अध्याय - 40

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 8
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - स्वराड्जगती स्वरः - निषादः
    1

    स पर्य॑गाच्छु॒क्रम॑का॒यम॑व्र॒णम॑स्नावि॒रꣳ शु॒द्धमपा॑पविद्धम्।क॒विर्म॑नी॒षी प॑रि॒भूः स्व॑य॒म्भूर्या॑थातथ्य॒तोऽर्था॒न् व्यदधाच्छाश्व॒तीभ्यः॒ समा॑भ्यः॥८॥

    स्वर सहित पद पाठ

    सः। परि॑। अ॒गा॒त्। शु॒क्रम्। अ॒का॒यम्। अ॒व्र॒णम्। अ॒स्ना॒वि॒रम्। शु॒द्धम्। अपा॑पविद्ध॒मित्यपा॑पऽविद्धम् ॥ क॒विः। म॒नी॒षी। प॒रि॒भूरिति॑ परि॒ऽभूः। स्व॒यम्भूरिति॑ स्वय॒म्ऽभूः। या॒था॒त॒थ्य॒त इति॑ याथाऽत॒थ्य॒तः। अर्था॑न्। वि। अ॒द॒धा॒त्। शा॒श्व॒तीभ्यः॑। समा॑भ्यः ॥८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् । कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूर्याथातथ्यतोर्थान्व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सः। परि। अगात्। शुक्रम्। अकायम्। अव्रणम्। अस्नाविरम्। शुद्धम्। अपापविद्धमित्यपापऽविद्धम्॥ कविः। मनीषी। परिभूरिति परिऽभूः। स्वयम्भूरिति स्वयम्ऽभूः। याथातथ्यत इति याथाऽतथ्यतः। अर्थान्। वि। अदधात्। शाश्वतीभ्यः। समाभ्यः॥८॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 8
    Acknowledgment

    व्याखान -

    (सः, पर्यगात्) ईश्वर हा आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक आहे. (शुक्रम्) तो सर्व जगाचा कर्ता आहे. (अकायम्) तो कधीही शरीर धारण करीत नाही कारण तो अखंड व निर्विकार आहे त्याच्यापेक्षा कोणताही पदार्थ मोठा नाही. त्यामुळे देह धारण करण्याची त्याला आवश्यकता नाही. (अव्रणम्) तो अखंड व एकरस आहे. ज्याचा भेद करता येत नाही व छेद करता येत नाही. असा तो निष्कंप व अचल आहे. त्याच्यामध्ये अंशाभिभावही नाही. कारण त्याच्यामध्ये कधीही छिद्र पडू शकत नाही. (अस्नाविरम्) तो नाडीच्या बंधनात अडकत नाही. सुक्ष्म असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे आवरण नाही. (शुद्धम्) तो सदैव निर्मळ असून अविद्या इत्यादी दोष व जन्म मरण, हर्षशोक, क्षुधा, तृष्णा इत्यादी उपाधींनी रहित आहे. शुद्धाची उपासना करणारा शुद्ध व मलीनाचा उपासक कमलीनच होतो. (अपापविद्धम्) परमेश्वर कधीही अन्याय करीत नाही तो सदैव न्यायीच आहे. (कविः) तो त्रिकाला आहे [सर्ववित्] महाविद्वान आहे. त्याच्या विद्येचा अंत कोणालाही कधीही लागू शकत नाही. (मनीषी) ता सर्व जीवांचे मनोविज्ञान जाणणारा आहे. व सर्वांच्या मनाचे दमन करणारा आहे. (परिभूः) तो सर्व दिशांमध्ये व सर्व स्थानी ओतप्रोत भरलेला आहे व सर्वत्र विद्यमान आहे. (स्वयंभूः) माता, पिता, इत्यादी ज्याचे आदिकारण नाही परंत तो मात्र सर्वांचे आदिकारण आहे. (याथातथ्यतोऽर्थान्व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः) सर्व माणसांच्या कल्याणासाठी ईश्वराने सत्य व सत्यविद्या असलेल्या चार वेदांचा उपदेश केलेला आहे. त्या दयाळू पित्याने आपल्या कृपेने अविद्येचा अंधःकार नष्ट करण्यासाठी वेदविद्यारूपी सूर्य प्रकाशित केलेला आहे. परमेश्वर सर्वांचे आदिकारण आहे हे निश्चित मानले पाहिजे. तसेच विद्येचेही आदिकारण परमेश्वरच आहे हे निश्चितच. ईश्वराने त्याच्या कृपेनेच विधेचा उपदेश कलेला आहे. कारण सर्व माणसांसाठी त्याने सर्व पदावांचे दान केलेले आहे. तेव्हा विवेचे दान कसे करणार नाही? त्याने सर्वोत्कृष्ट विद्येचे दान केलेले आहे. वेदाशिवाय कोणतेहि पुस्तक या जगात ईश्वरोक्त नाही. ईश्वर जसा पूर्ण विद्यायुक्त आहे आणि न्यायी आहे तसेच वेद हे पुस्तक आहे. दुसरे कोणतेही पुस्तक ईश्वरकृत किंवा वेदाप्रमाणे नाही. एवढेच नव्हे तर वेदाहून चांगले पुस्तकहीं कोणतेच नाही. या विषयाचा अधिक विचार “सत्यार्थप्रकाश” या माझ्या ग्रंथात पहावा.॥२॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top