Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 139
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
सो꣣मा꣢ना꣣ꣳ स्व꣡र꣢णं कृणु꣣हि꣡ ब्र꣢ह्मणस्पते । क꣣क्षी꣡व꣢न्तं꣣ य꣡ औ꣢शि꣣जः꣢ ॥१३९॥
स्वर सहित पद पाठसो꣣मा꣡ना꣢म् । स्व꣡र꣢꣯णम् । कृ꣣णुहि꣢ । ब्र꣣ह्मणः । पते । कक्षी꣡व꣢न्तम् । यः । औ꣣शिजः꣢ ॥१३९॥
स्वर रहित मन्त्र
सोमानाꣳ स्वरणं कृणुहि ब्रह्मणस्पते । कक्षीवन्तं य औशिजः ॥१३९॥
स्वर रहित पद पाठ
सोमानाम् । स्वरणम् । कृणुहि । ब्रह्मणः । पते । कक्षीवन्तम् । यः । औशिजः ॥१३९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 139
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात वेदादी शास्त्रांचा जो अधिपती, त्या इन्द्र परमेश्वराला प्रार्थना केली आहे -
शब्दार्थ -
हे (ब्रह्मणस्पते) वेद, ब्रह्माण्ड आणि सकळ ऐश्वर्यांचे स्वामी (यः) मी की जो (औशिजः) मेघावी आचार्याचा विद्यावान पुत्र आहे, त्या माझ्यासारख्या क्रियासील व्यक्तीला (सोमानाम्) ज्ञानाचा (स्वरणम्) प्रकाश करणारा (ज्ञानात भर घालणाऱ्या) आणि ज्ञानाचा उपदेश देणारा (कृणुहि) करा. ।। ५।।
भावार्थ - गुरुकुलामध्ये विद्याध्ययन पूर्ण करून आचार्याचा विद्या पुत्र मी विद्यानुरूप कर्म करीत आहे. अशा या विद्यापुत्राला, हे परमेश्वरा, आपण मला विद्येचा प्रकाशक (शोधकर्ता, बृद्धिकर्ता आणि प्रचारक) तसेच विद्योपदेशाक करा की ज्यायोगे मीदेखील सत्पात्र व्यक्तीनां विद्यादान करू शकेन ।। ५।। या मंत्राचे विवरणकार माधव, भरतस्वामी आणि सायणाचार्य यांनी ‘औशिजः’ शब्दावरून उशिक नाम मातेचा पुत्र कक्षीवान् नामक एका ऋषीची कल्पना केली आहे आणि दीर्घतामा नाम त्याचा पिता होता, अशी कल्पना लढविली आहे. या मंत्रात त्यानी लुप्तोपमा अलंकार मानून यंत्राची अशी व्याख्या केली आहे की उशिक मातेच्या पुत्र कक्षीवान ऋषीप्रमाणे मला कीर्तीमान करा. नीट विचार केल्यानंतर लक्षात येते की त्यांनी केलेले भाष्य यथार्थ नाही. कारण की परमेश्वराने सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी वेदांचे प्रकटीकरण केले आहे. त्यामुळे त्या वेदात परवर्णे मनुष्यांचा इतिहास कसे काय येऊ शकेल ? ।। ५।। पुढील मंत्रात म्हटले आहे की परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकावी -
विशेष -
यास्काचार्यांनी निरुक्त ६/१० मध्ये या मंत्राचे भाष्य केले आहे -