Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 145
ऋषिः - श्रुतकक्षः आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣡पा꣢दु शि꣣प्र्य꣡न्ध꣢सः सु꣣द꣡क्ष꣢स्य प्रहो꣣षि꣡णः꣢ । इ꣢न्द्रो꣣रि꣢न्द्रो꣣ य꣡वा꣢शिरः ॥१४५॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡पा꣢꣯त् । उ꣣ । शिप्री꣢ । अ꣡न्ध꣢꣯सः । सु꣣द꣡क्ष꣢स्य । सु꣣ । द꣡क्ष꣢꣯स्य । प्र꣣होषि꣡णः꣢ । प्र꣣ । होषि꣡णः꣢ । इ꣢न्दोः꣢꣯ । इन्द्रः꣢꣯ । य꣡वा꣢꣯शिरः । य꣡व꣢꣯ । आ꣣शिरः ॥१४५॥


स्वर रहित मन्त्र

अपादु शिप्र्यन्धसः सुदक्षस्य प्रहोषिणः । इन्द्रोरिन्द्रो यवाशिरः ॥१४५॥


स्वर रहित पद पाठ

अपात् । उ । शिप्री । अन्धसः । सुदक्षस्य । सु । दक्षस्य । प्रहोषिणः । प्र । होषिणः । इन्दोः । इन्द्रः । यवाशिरः । यव । आशिरः ॥१४५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 145
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपर) (शिप्री) सर्वव्यापी (इन्द्रः) परमात्म (सुदक्षस्य) अतिकुशल (प्रहोषिणः) विशेषरूपेण आत्मसमर्पण रूप हवीचा होम करणाऱ्या (इन्दोः) चंद्राकम सौम्य उपासकाच्या (यवाशिरः) यव धान्याप्रमाणे सात्त्विक आणि जो ज्ञान आणि कर्म यांच्या समन्वयामळे परिपक्व झालेल्या (अन्धसः) भक्तिरूप सोमरसाचा (अपात् उ) अवश्वमेव सेवन करतो. अर्थात ज्ञान- कर्माद्वारे केलेल्या भक्तीचा अवश्य स्वीकार करतो. द्वितीय अर्थ - (राजापूर) (शिप्री) राजमुकुटधारी (इन्द्रः) राजा (सुदक्षस्य) सधन व कुशल (प्रहेषिजः) राज कर रूपाने राज्याकरिता जो देय भाग आहे, तो देणाऱ्या (इन्दोः) राष्ट्राला साधन समृद्ध करणाऱ्या प्रजाजनांकडून (यवाशिरः) जव, गहू, तीळ, तांदूळ, मूग, उडीद आदी धान्यांसह (अन्धसः) खाद्य, पेय पदार्थ, वस्त्र, सोने, चांदी, मुद्रा आदी रूपाने राज कर (अपात् उ) अवश्य ग्रहण करतो (राजा प्रजेकडून जो कर ग्रहण करतो, ते कर धान्य, वस्त्र वा धातू रूपानेही देता येते, हे सांगितले आहे.) तृतीय अर्थ - (सूर्यपर) - (शिप्री) किरणवान (इन्द्रः) सूर्य (सुदक्षस्य) अति समृद्ध असून तो (प्रहेषिणः) आपल्या जतरूप हवीचा होम करणाऱ्या भूमंडळाच्या (यवाशिरः) संयोग वियोग कधी ताप वा उष्णतेद्वारे पक्व होऊन वाष्य रूपात परिवर्तित होणाऱ्या (अन्धसः) भोज्यरूप (इन्दोः) जलाचे (अपात् उ) अवश्य पान वा सेवन करतो. ।। १।।

भावार्थ - या मंत्रावर भाष्य लिहिताना सायणाचार्य यानी ‘सुदक्ष’ शब्दाचा अर्थ ‘सुदक्ष नामाचा एक ऋषी’ असा केला आहे. त्यांनी केलेला हा अर्थ अन्य भाष्यकारांनी केलेल्या अर्थाहून विपरीत असल्यामुळे स्वतःहून खोडला गेला आहे. विवरणकार माधव याने ङ्गसुदक्षफ शब्दाचा अर्थ ‘चांगल्या प्रकारे उत्सादित’ असा केला असून भरतस्वामीने या शब्दाचा अर्थ ‘अतिशय बलवान’ असा केला आहे. सायणाचार्यांच्या पद्धतीप्रमाणे ‘सुदक्ष’सारख्या प्रसिद्धार्थक शब्दांनाही नाम शब्द मानले गेले. मग तर वेदातील सर्व सुबन्त पदांना कोणत्या तरी ऋषीचे वा राजाचे नाव मानले जाईल (तात्पर्य अशा शब्दांना नाम शब्द न मानता त्याचा यौगिक अर्थ केला पाहिजे.)

इस भाष्य को एडिट करें
Top