Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 146
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣣मा꣡ उ꣢ त्वा पुरूवसो꣣ऽभि꣡ प्र नो꣢꣯नुवु꣣र्गि꣡रः꣢ । गा꣡वो꣢ व꣣त्सं꣢꣫ न धे꣣न꣡वः꣢ ॥१४६॥
स्वर सहित पद पाठइ꣣माः꣢ । उ꣣ । त्वा । पुरूवसो । पुरु । वसो । अभि꣢ । प्र । नो꣣नुवुः । गि꣡रः꣢꣯ । गा꣡वः꣢꣯ । व꣣त्स꣢म् । न । धे꣣न꣡वः꣢ ॥१४६॥
स्वर रहित मन्त्र
इमा उ त्वा पुरूवसोऽभि प्र नोनुवुर्गिरः । गावो वत्सं न धेनवः ॥१४६॥
स्वर रहित पद पाठ
इमाः । उ । त्वा । पुरूवसो । पुरु । वसो । अभि । प्र । नोनुवुः । गिरः । गावः । वत्सम् । न । धेनवः ॥१४६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 146
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - आता उपासक गण परमेश्वराला सांगत आहेत -
शब्दार्थ -
(पुरुवसो) विद्या, सुवर्ण, सद्गुण आदी अनेक धनांचे स्वामी, हे परमात्मा, (इमाःउ) आमच्याद्वारे उच्चारित ही (गिरः) भावपूर्ण स्तुतिवचनें (त्वा अभि) आपणास उद्देशून (प्र नोनुवुः) अतिशय रूपाने पुन्हा पुन्हा शब्दायमान होत आहेत घुमत आहेत) जसे (धेनवः) आपले दूध पाजण्यासाठी उत्सुक असलेल्या (गावः) गायी (वत्सं न) आपल्या वासराला पाहून हंबरते, (तद्वव उपासक ईश्वराचा ध्यान वा त्याची स्तुती करताना भावविहृल होतात.) ।। २।।
भावार्थ - हे जगदीश्वर, ज्याप्रमाणे गायी आपल्या प्रिय वासराला पाहून त्याला आपले दूध पाजण्यासाठी हंबरतात, त्याचप्रमाणे आमची सरस स्तुतिवचने भक्तिरस उद्वेलित करती प्राणाहून प्रिय अशा आपणास तो रस पाजविण्यासाटी आपल्यासमोर अतिशयतेने शब्दायमान होत आहेत. (हृदयातील भावना तुमची स्तुती करीत अत्यंत तल्लीन झाल्या आहेत.) ।। २।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे ।। २।।