Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 154
ऋषिः - शुनःशेप आजीगर्तिः, वामदेवो वा देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

सो꣡मः꣢ पू꣣षा꣡ च꣢ चेततु꣣र्वि꣡श्वा꣢साꣳ सुक्षिती꣣ना꣢म् । दे꣣वत्रा꣢ र꣣꣬थ्यो꣢꣯र्हि꣣ता꣢ ॥१५४

स्वर सहित पद पाठ

सो꣡मः꣢꣯ । पू꣣षा꣢ । च꣣ । चेततुः । वि꣡श्वा꣢꣯साम् । सु꣣क्षितीना꣢म् । सु꣣ । क्षितीना꣢म् । दे꣣वत्रा꣢ । र꣣थ्योः꣢꣯ । हि꣣ता꣢ ॥१५४॥


स्वर रहित मन्त्र

सोमः पूषा च चेततुर्विश्वासाꣳ सुक्षितीनाम् । देवत्रा रथ्योर्हिता ॥१५४


स्वर रहित पद पाठ

सोमः । पूषा । च । चेततुः । विश्वासाम् । सुक्षितीनाम् । सु । क्षितीनाम् । देवत्रा । रथ्योः । हिता ॥१५४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 154
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
(सोमः पूषा च) चंद्र आणि सूर्य अथवा मन आणि आत्मा (विश्वासाम् सुक्षितीनाम्) सव उत्तम प्रजाजनांवर (सर्व सदाचारी लोकांवर) (चेततुः) उपकार करणे जाणतात. तसेच ते चंद्र- सूर्य (देवत्रा) विद्वज्जनांपैकी जे (रथ्योः) रथारूढ महारथीप्रमाणे प्रगती यत्नवान असतात त्यांच्यासाठी म्हणजे गुरू- शिष्य, माता- पिता, पत्नी- यजमान, स्त्री-पुरुष, शास्त्र- शासक आदींसाठी ते चंद्र- सूर्य (हिम) हितकर असतात. ।। १०।।

भावार्थ - हा इन्द्र परमेश्वराचाच महिमा आहे की त्याने निर्मिलेल्या या जगात सौम्य चंद्रमा व वैजस सूर्य तसेच मानव शरीरात सौम्य मन व तैजस आत्मा दोन्ही प्राण आदीचे दान करीत सर्व लोकांवर उपकार करीत असतात. ज्याप्रमाणे एक रथारूढ रथस्वामी आणि सारथी अथवा राजा-राणी मार्गाक्रमण करीत असतात, तद्वत जे गुरू- शिष्य, माता-पिता, पिता - पुत्र, पत्नी- अजमान, स्त्री-पुरुष, शासित - शासक आदी लोक उन्नतीसाठी यत्न करतात, चंद्र व सूर्य हे दोघे तसेच मन- आत्मा हे दोघे त्या यत्नशील सर्व जनांसाठी परम हितकारी होतात. ।। १०।। या दशतीमध्ये इन्द्र तसेच इंद्रद्वारे रचित भूमी, गौ, वेदवाणी, चंद्र, सूर्य आदीचे महत्त्व प्रतिपादित असून इंद्राकडून ऋत व मेधा यांची प्राप्तीविषयी वर्णऩ केले आहे, त्यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांनी संगती आहे, असे जाणावे.।। द्वितीय प्रपाठकातील द्वितीय अर्धातील प्रथम दशती समाप्त द्वितीय अध्ययातील चतुर्थ खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top