Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 159
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
अ꣣यं꣡ त꣢ इन्द्र꣣ सो꣢मो꣣ नि꣡पू꣢तो꣣ अ꣡धि꣢ ब꣣र्हि꣡षि꣢ । ए꣡ही꣢म꣣स्य꣢꣫ द्रवा꣣ पि꣡ब꣢ ॥१५९॥
स्वर सहित पद पाठअ꣣य꣢म् । ते꣣ । इन्द्र । सो꣡मः꣢꣯ । नि꣡पू꣢꣯तः । नि । पू꣣तः । अ꣡धि꣢꣯ । ब꣣र्हि꣡षि꣢ । आ । इ꣣हि । ईम् । अस्य꣢ । द्र꣡व꣢꣯ । पि꣡ब꣢꣯ ॥१५९॥
स्वर रहित मन्त्र
अयं त इन्द्र सोमो निपूतो अधि बर्हिषि । एहीमस्य द्रवा पिब ॥१५९॥
स्वर रहित पद पाठ
अयम् । ते । इन्द्र । सोमः । निपूतः । नि । पूतः । अधि । बर्हिषि । आ । इहि । ईम् । अस्य । द्रव । पिब ॥१५९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 159
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात इन्द्राला रमपानासाठी आमंत्रित केले जात आहे -
शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमैश्वर्यवान परमात्मन्, (अयम्) हा (सोमः) श्रद्धारस (तुभ्यम्) तुमच्यासाठी (बर्हिषि अधि) हृदयरूप अंतरिक्षात (मिपूतः) पूर्णतः पवित्र केला गेला आहे. (सहि) तुम्ही या (ईम्) या रसाकडे (द्रव) दौडत या आणि (अस्म्) याचा बराच वा काही भाग (पिव) सेवन करा. ।। ५।।
भावार्थ - जसे अंतरिक्षस्य मेघजन पवित्र असते, तद्वत हृदय अंतरिक्षात स्थित श्रद्धारस मी म्हणजे तुझ्या उपासकाने, पूर्णपणे पवित्र करून घेतला आहे. मी पवित्र केलेल्या त्या श्रद्धा रसाचे पान करण्याकरिता, हे परमेश्वरा, तू त्वरित ये आणि उत्कंठित होऊन तो रस तू पी, की ज्यामुळे मी कृतकृत्य होईन. या ठिकाणी हे समजून घेतले पाहिजे की परमेश्वर सव़र्व्यापी आणि निरवयव (अंगरहित) असल्यामुळे त्याच्याविषयी येणे, जाणे, पिणे या क्रिया संभवत नाहीत. म्हणून येथे आगमनाचा प्रकट होणे (अनुभूत होणे) आणि ङ्गपिणेफ याचा अर्थ स्वीकार करणे, असा अर्थ लक्षणा वृत्तीद्वारे घेणे आवश्यक आहे. ।। ५।।
इस भाष्य को एडिट करें