Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 16
ऋषिः - मेधातिथिः काण्वः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

प्र꣢ति꣣ त्यं꣡ चारु꣢꣯मध्व꣣रं꣡ गो꣢पी꣣था꣢य꣣ प्र꣡ हू꣢यसे । म꣣रु꣡द्भि꣢रग्न꣣ आ꣡ ग꣢हि ॥१६॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣡ति꣢꣯ । त्यम् । चा꣡रु꣢꣯म् । अ꣣ध्वर꣢म् । गो꣣पीथा꣡य꣢ । प्र । हू꣣यसे । मरु꣡द्भिः꣢ । अ꣣ग्ने । आ꣢ । ग꣣हि ॥१६॥


स्वर रहित मन्त्र

प्रति त्यं चारुमध्वरं गोपीथाय प्र हूयसे । मरुद्भिरग्न आ गहि ॥१६॥


स्वर रहित पद पाठ

प्रति । त्यम् । चारुम् । अध्वरम् । गोपीथाय । प्र । हूयसे । मरुद्भिः । अग्ने । आ । गहि ॥१६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 16
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(त्यम्) आम्ही करीत असलेल्या त्या (चारूम्) श्रेष्ठ (अध्वरम्) हिंसा, अधर्म आदी दोषांपासून मुक्त अशा आमच्या उपासनायज्ञ अथवा जीवनयज्ञा (प्रवि) कडे तसेच (गोपीथाय) विषय वनात भटकणाऱ्या आमच्या इंद्रियरूप गायींच्या रक्षणासाठी अथवा आमच्या श्रद्धारूप सोमरस पानासाठी (प्र हूवसे) आम्ही तुम्हाला बोलावित आहोत (अग्ने) हे ज्योतिर्मय परमात्मन्, आपण (मरूद्भि:) प्राणद्वारे म्हणजे प्राणायमादी क्रियांद्वारे केल्या जाणाऱ्या (आगहि) आमच्या यज्ञात या. ।।६।।

भावार्थ - हे परमात्मन् जसा पवनाने प्रज्वलित झालेला यज्ञाग्नी नाना ज्वाळासमुहाच्या रूपात नृत्य करीत आमच्यासमोर यज्ञवेदीत उपरिक्त होतो, तद्वत प्राणायामादी वायूद्वारे प्रज्वलित आमच्या या जीवनयज्ञात वा उपासनायज्ञात आपण या. आणि आमच्या मन, वाणी, चक्षु आदी इंद्रियांना विषयांपासून सतत दूर ठेवीत आमच्या हृदयातील श्रद्धारसाचे मनसोक्त पान करा. ।।६।।

इस भाष्य को एडिट करें
Top