Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 15
ऋषिः - शुनः शेप आजीगर्तिः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

ज꣡रा꣢बोध꣣ त꣡द्वि꣢विड्ढि वि꣣शे꣡वि꣢शे य꣣ज्ञि꣡या꣢य । स्तो꣡म꣢ꣳ रु꣣द्रा꣡य꣢ दृशी꣣क꣢म् ॥१५

स्वर सहित पद पाठ

ज꣡रा꣢꣯बोध । ज꣡रा꣢꣯ । बो꣣ध । त꣢त् । वि꣣विड्ढि । विशे꣡वि꣢शे । वि꣣शे꣢ । वि꣣शे । यज्ञि꣡या꣢य । स्तो꣡म꣢꣯म् । रु꣣द्रा꣡य꣢ । दृ꣣शीक꣢म् ॥१५॥


स्वर रहित मन्त्र

जराबोध तद्विविड्ढि विशेविशे यज्ञियाय । स्तोमꣳ रुद्राय दृशीकम् ॥१५


स्वर रहित पद पाठ

जराबोध । जरा । बोध । तत् । विविड्ढि । विशेविशे । विशे । विशे । यज्ञियाय । स्तोमम् । रुद्राय । दृशीकम् ॥१५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 15
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
आम्ही उपासकगण (विशेविरो) सर्व लोकांच्या हितार्थ (यज्ञियाय) पूजनीय अशा (रूद्राय) सत्योपदेश देणाऱ्या अविद्या, अहंकार, दु:खादीचे निवारण करणाऱ्या आणि काम, क्रोधादी शत्रूंना रडविणाऱ्या परमात्मरूप अग्नीसाठी (स्तोमम्) स्तुतीचे स्तोत्र (उपहाररूपाने सादर करीत आहोत.) हे (जराबोध) आमच्या स्तुतीला सम्यकप्रमारे जाणणा-या अथवा स्तुतीद्वारे हृदयात उद्बुद्ध होणाऱ्या परमेश्वरा, तू (तत्) आमच्या त्या स्त्रोताचा (विविडि) स्वीकार कर ।।५।। अथवा - या मंत्रशची अर्थयोजना याप्रकारेही करता येते. उपासक चिंतनस्थितीत स्वतःला उद्देशून म्हणत आहे - (जराबोध) स्तुती करणे ज्यास येते अशा हे माझे आत्मन् तू (विशे विशे) मन, बुद्धी आदी सर्व प्रजांच्या हिताकरीता (यज्ञियाय) पूजायोग्य अशा (रूद्राय) सत्योपदेश प्रदायक, दुःखनिवारक आणि आमच्या शत्रूंना रडविणाऱ्या परमात्मरूप अग्नीसाठी (तत्) त्या (दशीकम्) दर्शनीय वा महत्त्वपूर्ण (स्तोत्रम्) स्तोत्र (विविडि) कर अथति पूर्वोक्त गुणयुक्त परमात्म्याची स्तुती कर ।।५।।

भावार्थ - हे जगदीश्वर, आपण सर्वांसाठी पूजनीय आहात. आपणच आमच्या हृदयी सद्गुण ग्रहणाची प्रेरणा देता. आलस्य, अविवेक आदींना निरस्त करता, आमच्या अंत:करणात ठाण मांडून बसलेल्या कामादी शत्रूंना रडविता. म्हणून आम्ही तुम्हाला हृदयात जागृत करण्यासाठी अनेक प्रकारे अनेकानेक स्तोत्र उपहाररूपेण आणत आहोत. कुणाचे स्तोत्र हार्दिक आहेत किंवा कोणाचे कृत्रिम आहेत, हे तुम्ही नीटपणे जाणता. यामुळे आम्ही केलेल्या स्तोत्रांचे हृदयत्व, दर्शनीयत्व आणि चारूत्व ओळखून तुम्ही कृपया त्यांचा स्वीकार करा. हे माझे अंतरात्मन्, तू परमेश्वराच्या स्तुतीपासून कधीही विमुख होऊ नकोस. ।।५।।

इस भाष्य को एडिट करें
Top