Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 161
ऋषिः - त्रिशोकः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣣भि꣡ त्वा꣢ वृषभा सु꣣ते꣢ सु꣣त꣡ꣳ सृ꣢जामि पी꣣त꣡ये꣢ । तृ꣣म्पा꣡ व्य꣢श्नुही꣣ म꣡द꣢म् ॥१६१॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣भि꣢ । त्वा꣣ । वृषभ । सुते꣢ । सु꣣त꣢म् । सृ꣣जामि । पीत꣡ये꣢ । तृ꣣म्प꣢ । वि । अ꣣श्नुहि । म꣡द꣢꣯म् ॥१६१॥


स्वर रहित मन्त्र

अभि त्वा वृषभा सुते सुतꣳ सृजामि पीतये । तृम्पा व्यश्नुही मदम् ॥१६१॥


स्वर रहित पद पाठ

अभि । त्वा । वृषभ । सुते । सुतम् । सृजामि । पीतये । तृम्प । वि । अश्नुहि । मदम् ॥१६१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 161
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपर) - हे (वृषभ) सुख आणि शांतीची वृष्टी करणारे परमेश्वर, (युते) या उपासना- यज्ञामध्ये (पीतये) तुम्ही पिण्यासाठी अर्थात उपासना स्वीकार करण्यासाठी (सुतम्) निष्पादित ( पिळून काढलेल्या) भक्तिरस (त्वा अभि) आपणास (मृजामि) मी समर्पित करीत आहे. आपण याचा स्वीकार करून (तृम्प) तृप्त व्हा, तुम्ही तुमच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या भक्ताने भक्तिपूर्ण द्वदम पाहून (मदम्) आनंद (वि अश्नुहि) प्राप्त करा. जसे एक पिता आपल्या पुत्राला पाहून आनंदित होतो, तसे तुम्हीही आनंदित व्हा. द्वितीय अर्थ - (आचार्यपर) एक पिता आपल्या पुत्राला गुरू कुलात प्रविष्ट करताना आचार्याला उद्देशून म्हमत आहे - हे (वृषभ) ज्ञान वर्षक आचार्य प्रवर, (सुते) या अध्ययन- अध्यापन सत्रात गुरूकुलात प्रविष्ट झाल्यानंतर (पीतये) विद्या- रस पान करण्यासाठी (सुतम्) मी (एक पिता) माझ्या मुलाला (त्वा अभि) तुमच्याकडे (सृजामि) सोडून जात आहे. अर्थात तुमच्या अधीन करीत आहे. पुढे पिता आपल्या पुत्राला म्हणतो - हे पुत्रा, तू आचार्याकडे राहून (तृम्य) ज्ञानरस प्राप्त करून तृप्त हो. (मदम्) आनंदप्रद सदाचारददेखील (वि अश्नुहि) धारण कर. अशा प्रकारे विद्या अध्यायन आणि ्रतपालन शिक्षा ग्रहण करून तू विद्यास्नातक व व्रतरनातक हो. ।। ७।।

भावार्थ - ज्याप्रमाणे परमेश्वर पृथ्वीवर मेघजलाची आणि उपासकांच्या हृदयात सुख शांतीची वृष्टी करतो, तसेच आचार्यदेखील शिष्याच्या हृदयात विद्या आणि सदाचाराचा पाूस पाजतो. यामुळे सर्वांनी परमेश्वराची उपासना आणि आचार्याची सेवा अवश्य केली पाहिजे. ।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top