Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 165
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣣द꣡ꣳ ह्यन्वोज꣢꣯सा सु꣣त꣡ꣳ रा꣢धानां पते । पि꣢बा꣣ त्वा꣣३꣱स्य꣡ गि꣢र्वणः ॥१६५॥
स्वर सहित पद पाठइ꣣द꣢म् । हि । अ꣡नु꣢꣯ । ओ꣡ज꣢꣯सा । सु꣣त꣢म् । रा꣣धानाम् । पते । पि꣡ब꣢꣯ । तु । अ꣣स्य꣢ । गि꣢र्वणः । गिः । वनः । ॥१६५॥
स्वर रहित मन्त्र
इदꣳ ह्यन्वोजसा सुतꣳ राधानां पते । पिबा त्वा३स्य गिर्वणः ॥१६५॥
स्वर रहित पद पाठ
इदम् । हि । अनु । ओजसा । सुतम् । राधानाम् । पते । पिब । तु । अस्य । गिर्वणः । गिः । वनः । ॥१६५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 165
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात इन्द्राला प्रार्थना केली आहे -
शब्दार्थ -
हे (राधानां पते) आध्यात्मिक व भौतिक धनांचे स्वामी परमालन, (इदं हि) हा भक्तीरस व कर्मरूप सोमरस (ओजसा) समस्त शक्ती व वेगाने (अनुसूतम्) आम्ही (उपासकांनी) क्रमाक्रमाने गाळला वा तयार केला आहे. (हृदय पात्रामध्ये भक्तिभाव ओसंडून वाहत आहे) (गिर्वणः) वाणीद्वारे भजनीय व याचनीय, हे देव, आपण तु) त्वरित (अस्य) हा भक्तीरस व कर्मरस (पिव) प्या, स्वीकार करा ।। १।।
भावार्थ - हे परमेश्वर, तुम्ही आध्यात्मिक व भौतिक समस्त ऋद्धी- सिद्धींचे अधिपती आहात. आपणाकडे कोणत्याही वस्तूंचे कमतरता नाही, तथापि आम्हा उपासकांविषयी प्रेमाधिक्य असल्यामुळे आपण आमच्या प्रेमोपहाराचा स्वीकार करता. हे देव, आम्ही आपल्याकरिता भक्तीरस व कर्मरस संपूर्ण यत्न करून तयार केला आहे. याचा स्वीकार करून आम्हास अनुगृहीत करा. ।। १।।
इस भाष्य को एडिट करें