Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 171
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
स꣡द꣢स꣣स्प꣢ति꣣म꣡द्भु꣢तं प्रि꣣य꣡मिन्द्र꣢꣯स्य꣣ का꣡म्य꣢म् । स꣣निं꣢ मे꣣धा꣡म꣢यासिषम् ॥१७१॥
स्वर सहित पद पाठस꣡द꣢꣯सः । प꣡ति꣢꣯म् । अ꣡द्भु꣢꣯तम् । अत् । भु꣣तम् । प्रिय꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯स्य । का꣡म्य꣢꣯म् । स꣣नि꣢म् । मे꣣धा꣢म् । अ꣣यासिषम् ॥१७१॥
स्वर रहित मन्त्र
सदसस्पतिमद्भुतं प्रियमिन्द्रस्य काम्यम् । सनिं मेधामयासिषम् ॥१७१॥
स्वर रहित पद पाठ
सदसः । पतिम् । अद्भुतम् । अत् । भुतम् । प्रियम् । इन्द्रस्य । काम्यम् । सनिम् । मेधाम् । अयासिषम् ॥१७१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 171
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात परमेश्वर, सभाध्यक्ष, नृपती, आचार्य या सर्वांना प३ार्थना केली आहे तसेच मेधाविषयी याचना केली आहे.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (परमात्मपर) - (अद्भुतम्) आश्चर्यकारी गुण- कर्म- स्वभाव असणाऱ्या (इन्द्रस्य) शरीराचा जो अधिष्ठाता जीवाला त्याला (प्रियतम्) जो प्रिय आणि (काम्यम्) उपासकांचा स्पृहणीय असलेल्या (सनिम्) कृत पाप पुण्यरूप कर्मांचे फळ देणाऱ्या (सदसः पतिम्) हृदयरूप अथवा ब्रह्मांडरूप यज्ञसदनाचा स्वामी असलेल्या परमेश्वराकडे (मेधाम्) मी धारणावती बुद्धीची (अमासिषम्) याचना करतो।। (मी- एक उपासक)
द्वितीय अर्थ - (सभाध्यक्षपर) - (अद्भुतम्) इतरांपेक्षा विशिष्ट असे गुण- कर्म- स्वभाव असलेल्या (इन्द्रम्) परमेश्वराला जो (प्रियम्) प्रिय आणि (काम्यम्) प्रजाजनांचा जो चाहता आणि (सनिम्) राष्ट्रात धनाचा योग्य संविभाग करणाऱ्या, सत्कृत्यांबद्दल प्रजाजनांना पुरस्कृत करणाऱ्या आणि दुष्कृत्यांचा दंड देणाऱ्या (सदसः प्रतिम्) राष्ट्रसभेचा अध्यक्ष असलेल्या राजाकडून (मेधाम्) विद्याप्रचार आणि धनाची (अयासिषम्) मी याचना करीत आहे ।। (मी- एक नागरिक)
तृतीय अर्थ - (आचार्यपर) (अद्भुतम्) ज्ञान - विज्ञानाचा अद्भुत भंडार (इन्द्रस्य) विद्या प्रचारक राजाचा जो (प्रियम्) प्रिय आणि (काम्यम्) सर्व विद्यार्थी ज्यास चाहतात (सनिम्) विविध विद्या व व्रतांचे दाता त्या (सदसः पतिम्) विद्यार्थी- कुलाचे अध्यक्ष असलेल्या आचार्याकडून (मेधाम्) विद्याबोधाची (अयासिषम्) याचना करीत आहे ।। (मी - एक शिष्य) ।। ७।।
भावार्थ - जे लोक अद्भुत गुण- कर्म- स्वभाव असलेलया अद्भुत ज्ञान - विज्ञान- राशी, न्यायकारी अशा प्रिय परमेश्वर, सभाध्यक्ष राजाचे आणि आचार्यांचे शरण ग्रहण करतात, ते मेधावी, शास्त्रवेत्ता, पुण्यकर्ता आणि धनवान होऊन अवश्य सुखी होतात. ।। ७।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे ।। ७।।