Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 172
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
ये꣢ ते꣣ प꣡न्था꣢ अ꣣धो꣢ दि꣣वो꣢꣫ येभि꣣꣬र्व्य꣢꣯श्व꣣मै꣡र꣢यः । उ꣣त꣡ श्रो꣢षन्तु नो꣣ भु꣡वः꣢ ॥१७२॥
स्वर सहित पद पाठये꣢ । ते꣣ । प꣡न्थाः꣢꣯ । अ꣣धः꣢ । दि꣣वः꣢ । ये꣡भिः꣢꣯ । व्य꣢श्वम् । वि । अ꣣श्वम् । ऐ꣡र꣢꣯यः । उ꣣त꣢ । श्रो꣣षन्तु । नः । भु꣡वः꣢꣯ ॥१७२॥
स्वर रहित मन्त्र
ये ते पन्था अधो दिवो येभिर्व्यश्वमैरयः । उत श्रोषन्तु नो भुवः ॥१७२॥
स्वर रहित पद पाठ
ये । ते । पन्थाः । अधः । दिवः । येभिः । व्यश्वम् । वि । अश्वम् । ऐरयः । उत । श्रोषन्तु । नः । भुवः ॥१७२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 172
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात असे म्हटले आहे की सर्व प्रजननांनी अंतरिक्ष मार्गाने पृथ्वी आदी लोकांपर्यंत प३वास करम्याची तसेच विमान निर्मिती विज्ञानाची माहिती योग्य प्रकारे करून घेतली पाहिजे.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (परमात्मपर) - हे (इन्द्र) लोक लोकान्तरांचे व्यवस्थापक परमेश्वर, (ते) तुम्ही निर्मियलेले (ये) हे जे (पन्थाः) मार्ग (दिवः) द्युलोकाच्या (अधः) खाली म्हणजे अंतरिक्षात आहेत (की द्युलोक - अंतरिक्षात तुम्ही) (येभिः) ज्या (व्यश्म्) अश्वाशिवाय चालणाऱ्या पृथ्वी, चंद्र, मंगळ, बुध आदी ग्रह- उपग्रह समूहाचे (ऐरयः) संचालन करीत आहात, त्या मार्गांविषयी (नः) आमच्या (भुवः) भूलोकवासी प्रजेन देखील (श्रोषन्तु) ऐकावे आणि जाणून घ्यावे.।।
द्वितीय अर्थ - (राजापर) - हे इन्द्र राजन् (ते) तुमचे निर्धारित (पन्थाः) आकाश मार्ग (ये) जे (दिवः) द्युलोकाच्या (अधः) खाली म्हणजे भूमी, समुद्र व अंतरिक्षात आहेत आणि ज्या मार्गावर (व्यश्वम्) अश्वाविनाच चालणारे यान, भूयान, जलयान आणि विमान यान आपण (ऐरयः) चालवीत आहात, त्या भूमी, सागर, आकाश येथील मार्गांविषयी (नः) आमच्या (भुवः उत) जन्मलेल्या राष्ट्रवासी नागरिकांनी देखील (श्रोषन्तु) ऐकावे, वैज्ञानिकांकडून त्याचे तंत्रज्ञान समजून घ्यावे आणि मग भूमिमान, जलयान, विमान, कृत्रिम उपग्रह आदी यानांच्या निर्मिती व संचालनाची विद्या योग्य प्रकारे जाणून घ्यावी. ।। ८।।
भावार्थ - परमेश्वर अंतरिक्ष मार्गात सूर्याचे संचालन करीत असून भूमंडळ, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी आदी ग्रह- उपग्रहांना त्यांच्या त्यांच्या धुरीवर व नेमक्या भ्रमण कक्षेत फिरवीत आहे. तसेच राष्ट्राचा कुशल राजा भूमान, जलयान, विमान, कृत्रिम उपग्रह आदींचा निपुण वैज्ञानिकांद्वारे संचालन वा व्यवस्थापन करतो. या साऱ्या यान विद्या राजाने राष्ट्रवाकी जनांना शिकवावी आणि त्यांच्या प्रयोगाची पद्धतदेखील शिकवावी (अशी व्यवस्था करावी) ।। ८।।
विशेष -
अंतरिक्षातील मार्गांचे वर्णऩ अथर्व वेदाच्या एका मंत्रात या प्रकारे आले आहे - विद्वान लोकांनी ज्या मार्गाने प्रवास करावा, असे अनेक मार्ग द्युलोकात व पृथ्वी लोकात निर्मित आहेत. ते मार्ग माझ्यासाठी सुलभ व्हावेत का? तर त्या मार्गाने यात्रा करीत मी विदेशात दूध - तूप आदीची विक्री करून पुष्कळ द्रव्य संग्रहीत करू शकेन. (अथर्व - ३/१५/२) समुद्र आणि अंतरिक्षात चालणाऱ्या बऱ्याच यानांचे वर्णऩ वेदांमध्ये आढळते. यथा ‘‘हे ब्रह्मचर्याने परिपुष्ट झालेल्या युवका, तुझ्यासाटी सुवर्णाप्रमाणे चमकणाऱ्या ज्या नौका आहेत, म्हणजे नावेच्या आकृतीचे जे जमपोत व विमान समुद्रावर व आकाशात चालतात, त्याद्वारे मात्रा करीत तू सूर्यपुत्री उषाप्रमाणे ब्रह्मचारिणी कन्येला विवाहाकरिता प्राप्त करण्यासाठी जातोस.’’ (ऋ ६/५८/३) घोड्याशिवाय चालणाऱ्या अशा एका वेगवान यानाचे वर्णन वेदात अन्यत्र देखील आले आहे. यथा ‘‘तीन चाकांचा एक रथ आहे, ज्यामध्ये घोडे जुंपलेले नाहीत, लगाम नाही, तो रथ अत्यंत प्रशंसनीय असून आकाशातील एका लोकाची परिक्रमा करतो.।। (ऋ ४/३६/१) ।।